दिग्दर्शक - दिबाकर बॅनर्जी
नावावरुन बिचकुन जाऊ नका. हे सिनेमाचं नाव जरी हिंदी वृत्तवाहीन्याच्या तृतीय दर्जीय कार्यक्रमाचं वाटत असलं तरी हा सिनेमा उथळ विषयावर आधारीत नाही आहे.
’खोसला का घोसला’ आणि ’ओय लक्की लक्की ओय’ सारखे उत्तम चित्रपट बनविणारे दिबाकर बॅनर्जी या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत, यावरुन सिनेमा उथळ नसनार अशी खात्री होती आणि अपेक्षेप्रमाणे चित्रपट खुपंच चांगला ...
दिग्दर्शक - आशुतोष गोवारीकर
अरविंद पिल्ललमरी आणि रवी कुचिमंची या एनआरआय जोडगोळींच्या कार्यावर आधारीत २००४ सालचा आशुतोष गोवारीकरांचा ’स्वदेस’ माझ्या आवडत्या हिंदी चित्रपटांच्या यादीत सर्वोच्च स्थानी आहे. देशाबद्दलची थीम असुनदेखील बेगडी देशप्रेमाला दिलेला फाटा, आणि भारताच्या सद्यस्थितीचे उत्तम केलेले अवलोकन याच्या जमेच्या बाजु. भारताने प्रगती जरी केलेली असेल तरी ...
दिग्दर्शक - रॉबर्ट झेमेकिस
बस स्टॉप वर बसची वाट पाहत बसलेला फॉरेस्ट बाजुला बसलेल्या बाईला आपल्या जीवनाची कहानी सांगायला सुरुवात करतो, ऐकनारे बदलत जातात पण आपण मात्र फॉरेस्टच्या जीवनपटात गुंग होऊन जातो. १९९४ साली आलेला आणि ऑस्कर पारितोषिके मिळवणारा ’फॉरेस्ट गम्प’ विल्सन ग्रुमच्या याच नावाच्या कादंबरीवर आधारलेला आहे.
कमी आयक्यु असलेल्या फॉरेस्टला ...