दिसामाजी काहीतरी...
आत्ताच १२ वीचा निकाल लागला. या निकालातली सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ‘लातूर Pattern’ साठी प्रसिद्ध असलेल्या जिल्ह्याची पहिल्या क्रमांकावरून झालेली उचलबांगडी आणि ती सुद्धा साधीसुधी नाही तर एकदम शेवटच्या स्थानावर. मागच्या वर्षी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण होते ८५.५१ % आणि ह्या वेळेस ते आहे ४४.८१ %….!! आता वर्षभरात विद्यार्थ्याची पातळी काही इतकी खालावत नाही. या साठी ...