देवनागरी
Roman
Press F12 to toggle

विक्रम

सचिनचे शतकांचे शतक हुकले :( शुक्रवार, २५ नोव्हेंबर २०११, ११:०२ (+०५:३०)

Brijesh Marathe मनातलं जनात, ब्रिजेश उवाच

सचिनच्या सर्व चाहत्यांचा प्रचंड हिरमोड झालेला आहे. आजच्या दिवसाच्या तिकीटाचा वानखेडेवर विक्रमी काळाबाजार झाला होता. १०० चे तिकीट ६०० ते ७०० रूपयांपर्यंत विकले गेले होते. सर्व चाहत्यांचा उत्साह आज परमोच्च होता. आपल्या लाडक्या सचिनला ‘महविक्रमादित्य’ ही पदवी ...

दुचाकी बुधवार, २२ जून २०११, १३:१९ (+०५:३०)

याम याच

जगातील समस्त रस्त्यावर धावणाऱ्या ‘तेलचर’ प्राण्यामध्ये वेगवान आणि गडबड गोंधळ करणारा वंश प्राणी. निदान भारतात तरी सर्वात जास्त अपघात घडवण्याचा ‘विक्रम’ नेहमी हाच वंश करीत असतो. रस्त्यावर ज्याची धूम असते असा हा दुचाकी ‘वंश’. आता ती गोष्ट वेगळी की वंशातील प्राणी थोड्या फार प्रमाणात वेगळे आणि उपद्रवी असले तरी सर्वांची उपद्रव आणि गोंधळ घालण्याची मूळ प्रवृत्ती काही केल्या जात ...

[आघात] : एक उल्लेखनीय प्रयत्न मंगळवार, १८ जानेवारी २०११, १६:२९ (+०५:३०)

m.e.r.C.u.r.y तरंग

अलीकडेच विक्रम जोशी दिग्दर्शित 'आघात' हा चित्रपट पाहण्याचा योग आला. ज्यांना तो पाहायचा होता त्यांनी आत्ता पर्यंत तो पहिला असेलच असे गृहीत धरून मी विषयाला हात घालणार आहे. आजकाल अनेक ठिकाणी रुग्णाच्या नातेवाईकांनी केलेल्या इस्पितळाच्या तोडफोडीच्या अनेक घटना आपण ऐकतो. त्यावर त्यांच्या असंस्कृतपणाबद्दल त्यांना बोलही लावतो. मात्र त्यातील रुग्णांचे किंवा ...

रुब्रिक क्यूब आणि मोटोरोला ड्रॉईड रविवार, ०९ मे २०१०, १५:५९ (+०५:३०)

विक्रम गॅजेट-कीडा

नुकताच एक व्हिडीयो पाहण्यात आला, ज्यात मोटोरोलाचा नवीन आणि महत्वाकांक्षी मोबाईल हँडसेट 'मोटो ड्रॉईड' एका रोबोटला जोडण्यात आला होता, आणि त्याच्या कॅमेर्‍याचा वापर करून, रुब्रिकचा ठोकळा सोडवण्याचा प्रयत्न केला गेला.

आलेले निकाल खरोखर धक्कादायक आहेत. मोटोड्रॉईडला रुब्रिकक्यूब सोडवायला केवळ २४ सेकंद लागले.

जोडलेला व्हिडीयो पहा.

कॉल ऑफ ड्यूटी मालिकेतला नवीन 'मॉर्... रविवार, ०७ मार्च २०१०, १५:११ (+०५:३०)

विक्रम गॅजेट-कीडा

नुकताच मी कॉल ऑफ ड्यूटी मालिकेतला सर्वात नवीन खेळ खेळून संपवला. 'मॉर्डन वॉरफेअर - २' हा अतिशय सुंदर बनवलेला गेम आहे. इंन्फीनिटी वार्डने अगोदरच्या कॉल ऑफ ड्यूटी मालिकेपासून(COD -1, COD -2 United Offensive etc.) पासून खूपच सुधारणा केली आहे. पहिले गेम्स खेळलेल्यांना माहित असेल, की त्यांची रचना 'घडनाक्रमावर अनुसरून' (event based) होती. या नवीन खेळात मात्र अत्यंत व्यवस्थित ठरवण्यात आलेला व 'कार्य अनुसरून' (action based) असा ...

ब्लूम एनर्जीसर्व्हर शुक्रवार, २६ फेब्रुवारी २०१०, ०१:५९ (+०५:३०)

विक्रम गॅजेट-कीडा

परवा सचिनच्या व्दिशतकाने आपल्या सर्वाचे लक्ष एका अजून महत्वाच्या बातमीकडे गेले नाही. सिलिकॉनव्हॅलीमधील एका अनिवासी भारतीयाने (के. आर. श्रीधर) स्थापन केलेल्या ब्लूमएनर्जी या कंपनीने आपले नवीन प्रॉडक्ट जाहिर केले, ज्यामुळे भविष्यातील ऊर्जासंकट टाळणे शक्य होईल. पण ह्या प्रॉडक्टबद्दल जगात अजून प्रश्नच जास्त आहेत. पाहूया त्यातील काही प्रश्न...

१. हे एनर्जीसर्व्हर अखेर ...

किती सांगू मी सांगू कुणाला... आज आनंदी ... बुधवार, २४ फेब्रुवारी २०१०, २०:१९ (+०५:३०)

सिद्धार्थ माझ्या गजाल्या

वेडा झालोय... आज मला माझ्या नशिबावार विश्वास नाही बसत आहे. आज काय झालं आणि मी कंटाळूनच लवकर घरी आलो. जरा चिडचिडच झालेली. पण घरी येऊन पाहतो तर काय सचिन नुसता सुटलेला. तुफान.... १००, १२५, १५० आणि बघता बघता साहेब १८० वर पोहचले. मग स्वत : चा १८६ धावांचा रेकॉर्ड मागे टाकला. मग चेंडू इतके शिल्लक होते की आज काही झालं तरी २०० करतो पट्ठ्या. धडधड वाढु लागली. मग सईद अन्वरचा रेकॉर्ड मागे पडला. ...

'विंडोज मोबाईल ७' स्वागत आहे सोमवार, १५ फेब्रुवारी २०१०, २३:४७ (+०५:३०)

विक्रम गॅजेट-कीडा

आजवर मी (आणि इतरांनीही) विंडोज मोबाईलबद्दल जे बोललो होतो ते लवकरच इतिहासजमा होइल. बार्सिलोनाच्या मोबाईल वर्ल्ड कॉन्फोरन्स २०१० मध्ये मायक्रोसॉफ्ट आपला दुसरा सर्वात महत्वाकांक्षी प्रोजेक्ट दाखवणार आहे.
'विंडोज मोबाईल सेव्हन सिरीज', ही संपूर्णपणे नवी मोबाईल ऑपरेटींग सिस्टीम असणार आहे. मायक्रोसॉफ्टने ते खरोखर मुत्सद्दीपणे केले आहे. एक संपूर्ण नवीन सिस्टीम नव्याने उभी ...

विंडोज मोबाईल 7 Series रविवार, १४ फेब्रुवारी २०१०, १०:५९ (+०५:३०)

विक्रम गॅजेट-कीडा

मायक्रोसॉफ्टचे विंडोज मोबाईल ६.५ जगाला फारसे मोहात पाडू शकले नाही. पण विंडोज मोबाईलच्या पुढच्याआवृत्तीकडून मात्र खूप अपेक्षा बाळगल्या जात आहेत आणि तो क्षण जवळ आलाय.

बार्सिलोनामध्ये उद्या पासून (भारतीय वेळेनुसार) सुरू होणार्या मोबाईल वर्ल्ड कॉग्रेस २०१० मध्ये विंडोजमोबाईलचा नवा अवतार मायक्रोसॉफ्ट जाहीर करेल अशी बातमी आहे. काल मोबाईल वर्ल्ड कॉग्रेस २०१० ...

२००९ मागे वळून पाहताना शुक्रवार, २९ जानेवारी २०१०, २१:४४ (+०५:३०)

विक्रम गॅजेट-कीडा

सन २००९ मध्ये घडलेल्या गॅजेटविषयक दहा महत्त्वाच्या घटना मी आणि informationweek.com ने (वेगवेगळ्या) निवडल्या होत्या. मी माझी यादी देत आहे.

१. अँड्रोईड चा उदय - २००९ मध्ये प्रथमच, मोबाईलजगतात हार्डवेअरपे़क्षा सॉफ्टवेअरमध्ये जास्त विकास झाला. गूगलने मुक्त वापर (open-source) प्रकारात उपलब्ध केलेली मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम अँड्रोईडने, स्मार्टफोन्सच्या जगात चांगलाच जम बसवला. हा मायक्रोसॉफ्टच्या ...