देवनागरी
Roman
Press F12 to toggle

मराठी ब्लॉगर्स

हौशी लेखनाचे नवे पर्व गुरुवार, ०६ ऑक्टोबर २०११, १३:३७ (+०५:३०)

नागेश देशपांडे मी एक हौशी लेखक

नमस्कार,

सर्व वाचकांना, मित्र-मैत्रिणींना व हितचिंतकांना "विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!"

आज विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर "मी एक हौशी लेखक" हा ब्लॉग स्व:त च्या संकेतस्थळावर विराजमान झाला आहे.

नवीन वर्षाच्या शुभेच्छा... शुक्रवार, ३१ डिसेंबर २०१०, १३:०८ (+०५:३०)

मी एक हौशी लेखक

संपले हे वर्ष उरल्या फक्त आठवणी
नवीन वर्षाची स्वप्न आहे मनी,

विरले आता काळे ढग
समोर आहे मोकळे आकाश

अंधारलेल्या दिशा ही नाही
दिसतो आहे नवा ...

सँडविच आणि मैत्री बुधवार, ०८ डिसेंबर २०१०, १३:३५ (+०५:३०)

मी एक हौशी लेखक

स्वयंपाक मला जमत नाही आणि स्वयंपाक करणे किती अवघड आहे हे मला जोहान्सबर्गला आल्यावर कळालं. गेल्या रविवारी मी बनविलेल्या सँडविचमुळे मला १२ वर्षापुर्वीचा एक किस्सा आठवला. दोन्ही वेळी मला एक चांगला मित्र मिळाला त्यामूळे हे दोन्ही दिवस मी आयुष्यात कधीही विसरणार नाही.



सौजन्य: आंतरजाल
 अंदाजे १२ वर्षापुर्वी जेव्हा मी कॉलेजध्ये होतो त्याच वेळी माझा मित्र वैभव नांदेडला ...

जालना ते जोहान्सबर्ग सोमवार, ०६ डिसेंबर २०१०, ०२:०९ (+०५:३०)

मी एक हौशी लेखक

१० नोव्हेंबर २०१० कधीही विचार न केलेला दिवस उजाडला तेव्हा मी आकाशात २० हजार फूटावरती होतो. सकाळी ११ (भारतीय वेळेनुसार) मी जोहान्सबर्ग विमानतळावर पोहोचलो. पहिलीच परदेशवारी आणि पहिलाच विमान प्रवास त्यामूळे मी खूप उत्साही होतो, आनंदही गगनात मावत नव्हता. विमानतळावर मला घ्यायला ऑफीसचा ड्रायवर आला होता मी माझी बॅग घेतली आणि माझा या शहराचा अनुभव घ्यायला सुरुवात केली. जोहान्सबर्ग हे ...

आम्ही मराठी ब्लॉगर्स! गुरुवार, ३० सप्टेंबर २०१०, १८:१९ (+०५:३०)

मी एक हौशी लेखक

प्रिय वाचक

आम्ही सर्व आहोत मराठी ब्लॉगर्स आपला ब्लॉग लोगो येथे ...

सादर करत आहोत मराठी मंडळी.कॉम, मराठी ब्... शुक्रवार, २६ फेब्रुवारी २०१०, ०१:१२ (+०५:३०)

भुंगा ...भुंगा!

ज्ञानेश्वरांच्या”परि अमृताच्याही पैजा जिंके” नंतर कुण्या पोर्तुगीज फादर स्टीफन्सने लिहिलेल्या या ओळीच मराठीचा गोडवा सांगण्यास पुरेशा आहेत. आहेच आमची मऱ्हाटी वाणी अशी की… कुणालाही ऐकताना भुरळ पडावी. कुणी मनापासून कौतुक केले की कानात सतारीच्या तारा छेडल्याचा भास व्हावा आणि अगदी मनापासून शिवी हासडली तर कानात उकळते तेल ओतल्यागत जाळ अंतर्मनात निघावा अशी आमची मराठी. ...

सादर करीत आहोत: "मराठीमंडळी.कॉम&qu... गुरुवार, २५ फेब्रुवारी २०१०, १९:०२ (+०५:३०)

विशाल तेलंग्रे सुरूवात...

सादर करीत आहोत, मराठी ब्लॉगर्सचे हक्काचे व्यासपीठ, मराठीमंडळी.कॉम
यंदाच्या धुळवडीच्या दिवशी, १ मार्च २०१० रोजी.फाल्गुन कृष्ण द्वितिया, शके १९३१.रात्रौ: १०:०३ मि. (भारतीय प्रमाणवेळेनुसार)आपली ऑनलाईन
उपस्थिती नोंदवा.
अधिक माहितीसाठी जरुर लिहा अथवा चॅट करा
pankajzarekar@gmail.com
mebhunga@gmail.com
aniket.com@gmail.com
vikrant.deshmukh888@gmail.com
vishaltelangre@gmail.com

’ मराठी ब्लॉगर्स ’ चा डंका सिडनीत बुधवार, ०३ फेब्रुवारी २०१०, १५:४५ (+०५:३०)

sureshpethe येss रे मना येरेss मना !

’ दावणगिरी ’ पासून सुरू झालेला आपल्या ’ मराठी ब्लॉगर्स ’ चा डंका सिडनीतही पोचलाय ! माझी अशी ’ श्रध्दा ’ आहे की ही चळवळ आता थांबणे नाही कारण नवीन नवीन मराठी ब्लॉगर्स आपल्याला येऊन मिळणारच !

नमस्कार काका,
मी श्रद्धा कुलकर्णी -मोकाशी. मुळची मुंबई ची आणि संगणक अभियन्ति. तुमचे ब्लोग्स बर्याच दिवसा पासून वाचत आहे. मी स्वत ब्लोग्स लिहित नाही पण इंग्लिश मध्ये काही ...

मराठी ब्लॉगर्स : आता एका कुटुंबाच्या दि... शनिवार, ३० जानेवारी २०१०, २३:२१ (+०५:३०)

Tushar Phatak Drushtikon

बरेच दिवस काही महत्वाच्या कामांमुळे ब्लॉगकडे थोडेसे दुर्लक्ष झाले. पण तरीपण मराठी ब्लॉगविश्वात राहण्याचा प्रामाणिक प्रयत्न झाला, या काळात वेळ मिळेल तेंव्हा इतरांचे ब्लॉग वाचले, त्यावर Comments पण दिल्या . . काही मित्रांना स्वतःचा ब्लॉग सुरु करण्यासाठी प्रवृत्त केले आणि त्यासाठी मदत केली . . मग लक्षात आले कि या ब्लॉगविश्वाशी एक प्रकारचे वेगळे नाते निर्माण झाले आहे । .

नुकत्याच हाती आलेल्या बातम्या... शुक्रवार, २२ जानेवारी २०१०, २२:५० (+०५:३०)

विशाल तेलंग्रे सुरूवात...

ठळक घडामोडी पुढीलप्रमाणे:

१) तीव्र शीतलहरीचा फटका काही मराठी ब्लॉगर्संना... अनेकांचे ब्लॉग थंडीमुळे मृतावस्थेत आढळले...
२) चोरांचा धूमाकूळ सुरूच... महेंद्रजींच्या ब्लॉगवरील लाखो रूपये किंमतीची मालमत्ता दिवस-ढवळ्या लंपास...
३) मराठी ब्लॉग विश्व, मिसळपाव, उपक्रम, अन मनोगत यांचा पुढील "मराठी ब्लॉगर्स" स्नेह मेळाव्यास तीव्र विरोध...
४) ब्लॉगर अन वर्डप्रेस यांनी एकत्रितपणे ...