भारतीय नागरिकांचा घास रोज अडतो ओठीसैनिकहो तुमच्यासाठी...सैनिकहो तुमच्यासाठी...
गाणे तर ऐकले असेलच ना तुम्ही? गदिमांनी लिहिलेल्या या गाण्यात त्यांच्या मनातील देशाविषयी, सैनिकांविषयीची कृतज्ञता सहजपणे उतरली आहे. आज इतकी वर्षे होऊनही स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिनी न चुकता कुठे न कुठे गाणे ऐकू येते आणि या दोन दिवशीच ऐकू येते. एरवी आपण ऐकतो का हे गाणे? ह्याच गाण्यातील ...
‘ने मजसी ने परत मातृभूमीला’ जणू काही ते त्यांचा सगळा भावनिक आघात सागरावर करीत आहेत – त्या सागरावर रागावलेला – रूसलेला हा मातृभूमीचा प्रियपुत्र म्हणतो – ‘सागरा, तू खरं तर माझा भूमातेचे पाय धुणारा सेवक आहेस.
भूमातेच्या चरणतला तुज धूता ।
मी नित्य पाहिला होता
त्यावेळेला मी तिथे असताना तू मला मैत्रीने म्हणालास – मित्र मित्राला म्हणतो तसा – की चल जरा फिरायला जाऊ
दुस-या ...
भीमा आणि इंद्रायणीच्या संगमावर छत्रपति संभाजी राजांना औरंग्याने अत्यंत क्रुरपणे ठार मारले. राजांच्या देहाचे अक्षरशः तुकडे तुकडे करुन नदी काठावर व पाण्यात फेकुन देण्यात आले. खरे तर इतर वेळी दुनियाभरातील पापे करणारी पापी मंडळी आपले पाप प्रक्षलन करण्यासाठी अशा पवित्र नद्यांच्या संगमावर येतात. परंतु त्या नद्याच आज संभाजी महाराजांच्या देहाच्या मासाच्या फेकल्या गेलेल्या ...
संभाजी महाराजांचे चरित्र एका व्यक्तिशिवाय पुर्णच होवु शकत नाही आणि ती व्यक्ति म्हणजे कवी कलश. खरे तर कवी कलशांना बखरकारांनी खुपच बदनाम केलेले दिसते. कवी कलशांना बदनाम करण्यामध्ये त्याच लोकांचा हात आहे ज्यांनी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावर बहिष्कार टाकला. राजांच्या अभिषेकासाठी महाराष्ट्रातील एकही भट ब्राह्मण पौरोहित्य करण्यास तयार झाले नाही. तेंव्हा राजांनी ...
१९०७ साली लंडन येथे १८५७ साली झालेल्या स्वातंत्र्य संग्रामाला ५० वर्षे झालेली होती. या सुवर्णमहोत्सवी दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी १८५७ च्या हुतात्म्यांना उद्देशुन वक्तव्य केल होतं. सावरकरांनी केलेल वक्तव्य मुंबईच्या सावरकर सदन येथे आजही लिहिलेल आढळते.
"भारताच्या रणांगणावर तुम्ही स्वातंत्र्य संग्रामातील पहिली मोहिम सुरु केलीत ती १८५७ या नित्यस्मरणीय वर्षी! जो ...
बरोबर १०० वर्षांपूर्वी पंचविशीतील सावरकर स्वातंत्र्यप्राप्तीच्या ऐतिहासिक कार्यात लंडनमध्येच गढून गेले होते. ब्रिटिशांनी काढून घेतलेले शस्त्र मिळवून ते त्यांनी भारतीय तरुणांच्या हातात दिले, जे तरुण स्वतंत्र भारताची उत्तम प्रकारे सेवा करू शकतील त्यांना हुडकून भारतनिष्ठ आणि सक्षम बनवण्याचे काम त्यांनी केले आणि संधी मिळताच ब्रिटनविरुद्ध युद्ध छेडण्याच्या दृष्टीने ...
स्वा. सावरकरांना घडवणारे शिल्पकार
क्रांतीवीर गणेश दामोदर तथा बाबाराव सावरकर हे स्वा. विनायक दामोदर सावरकर यांचे थोरले बंधू. त्यांनीच स्वा. सावरकरांना पितृतुल्य प्रेम देऊन, अत्यंत हालअपेष्टा सोसून लहानाचे मोठे केले आणि त्यांच्या बरोबरीने क्रांतीकार्यातही भाग घेतला.
बाबारावांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील भगूर या गावी १३ जून १८७९रोजी झाला. लहानपणी त्यांची प्रकृती ...
त्रिवर्ग सावरकर क्रांतीकारक बंधूंमध्ये डॉ. नारायणराव सावरकर हे धाकटे. बुद्धीमत्ता, प्रतिभा, उत्कट देशभक्ती आणि कर्तृत्व यांमध्ये मात्र ते वडील बंधूंहून थोडेही उणे नव्हते. एकाच ध्येयाने प्रेरित असे हे तिघे बंधू सशस्त्र क्रांतीच्या एकाच मार्गाने `अभिनव भारत' संघटनेत आणि पुढे `हिंदुमहासभा' या एकाच राजकीय पक्षात कार्य करीत राहिले.
विद्यार्थीदशेपासूनच क्रांतीचे विचार !
मी नथुराम गोडसे बोलतोय. हे नाटक मी एके दिवशी पाहिलं आणि मला शिकवला गेलेला इतिहास आणि स्वतःहुन माहिती करुन घेतलेला यामध्ये प्रचंड तफावत आढळली. आपल्याला शिकवलेला इतिहास हा नेहमीच कॉंग्रेस प्रणित असतो हेच माझ्या लक्षात आले. गांधी हत्येबद्दल कॉग्रेस प्रणित इतिहास एका नथुराम गोडसे नावाच्या हिंदु माथेफिरुने केलेली हत्या असेच वर्णन ऐकले होते. पण गोळी झाडाणारा नथुराम कोणहोता? ...