खमंग फोडणी घातलेले वांग्याचे भरीत किंवा चटकदार भरली वांगी या पदार्थांची नावे ऐकून तोंडाला पाणी सुटणार नाही असा माणूस विरळाच. पण वांग्याचा फालुदा हा काय प्रकार आहे? हा प्रश्न कोणाच्याही मनात येईल. सध्या वांग्याच्या एका नवीन प्रजातीबद्दल जे काय चर्चा-चर्वण मध्यमांच्यातून चालू आहे त्याला दुसरे नाव तरी काय द्यायचे? या सगळ्या वादाच्या केंद्रस्थानी आहे Bt, Brinjal या नावाने ...