देवनागरी
Roman
Press F12 to toggle

जॉब

सांगू?? बुधवार, २९ डिसेंबर २०१०, १२:५४ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

काय करू यार, जाम टेन्शन आले आहे. कस बोलू? आता नाश्त्याला येतेस का विचारू? की, कॉफीला बोलावू. कालपासून हाच विचार करतो आहे. यार, ना झोप येते ना चैन पडते आहे. फक्त मोजून तीन दिवस उरले आहेत. आता आज गेला की दोनच दिवस उरतील. झालेत सगळे सोपस्कार. आणि गोडी गोडीत त्या डीएमला देखील ‘जाऊ दे’ म्हणून मागे लागलो. यार जणू काय मी ह्याची गर्लफ्रेंड आहे, आणि ह्याने मला प्रपोज केल आहे. आणि मी नकार देतो आहे, ...

सख्खे रविवार, ०१ ऑगस्ट २०१०, १२:०० (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

आज सख्ख्यांचा पोळा. आता मित्राला सखा म्हणतात. आणि त्या ‘सखा’चे अनेकवचनी ‘सख्खे’. खर तर मित्रांमुळे मला जगातील अनेक गोष्टींचे ज्ञान मिळाले. स्पष्टच बोलायचे झाले तर, ते माझे ‘गुरु’ आहेत. रात्रीच एकाचा शिंगातून एसएमएसचा फुगा आला. हा सख्खा म्हणजे परी वाहिनीचा ‘आशिक’. खर तर असे सख्खे खूप आधीपासून मिळत गेले. यातील पहिला सख्खा, मी संगणकाचा कोर्स करीत असतांना भेटलेला. नेहमी स्वतःहून ...

माझा राग बुधवार, १८ नोव्हेंबर २००९, ००:३२ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

शनिवारी रात्री नऊ वीसच्या पुणे लोणावळा लोकलने आई वडिलांबरोबर घरी यायला निघालो. लोकलमध्ये एक बह्हादार ज्या बाजूने चढतात त्याच बाजूला बसलेला. आईला लोकलमध्ये चढताना त्याच्यामुळे अडचण झाली. ते बघून खरच माझ पित्त खवळल. खर तर आठची लोकल रद्द करण्यात आल्याने गर्दी झाली होती. त्यात ह्याने अडचण केली. त्या रागाच्या भरात त्याला मी दोन लाथा आणि गुद्दे लगावले. तो बह्हादार ...