देवनागरी
Roman
Press F12 to toggle

चालक

परीस्पर्श बुधवार, ३० जून २०१०, ०१:१९ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

कस सांगू यार, परीचा स्पर्श झाल्यापासून सगळंच खूप छान वाटत आहे. परवा कंपनीची बससाठी मी नेहमीप्रमाणे उभा होतो. माझ्या रुटला दोन बसेस आहेत. एक माझ्या कंपनीच्या मुख्य इमारतीसाठी आणि दुसरी जिथे मी काम करतो. मी आणि ‘परी’ त्या दुसर्या बसमधून जात असतो. त्या दिवशी पहिली बस आली. पण त्याचा चालक दुसर्या बसचा म्हणजे ज्या बसने मी नेहमी जातो त्या बसचा. परी आणि मी ती माझीच बस म्हणून त्यात चढलो तर ...

अपघात मंगळवार, ०९ मार्च २०१०, २३:३७ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

आज रात्री कंपनीच्या बसने घरी येताना डांगे चौकात एक लहान टेम्पो चौकातील मधोमध असलेल्या खड्यात गेलेला दिसला. आता तो काही एवढा मोठा नव्हता. पण टेम्पो पूर्ण वाकडा झालेला बघितला. तिथून पुढे बस चिंचवडच्या जुन्या नाक्यावर थांबली. तिथ सुद्धा लोकांचा घोळका. म्हटलं आता काय झाल तर एका कारवाल्याची आणि दुचाकीवाल्याची भांडणे. सध्याला चाफेकर चौकापासून ते जुना नाक्या पर्यंत पुलाचे काम ...

गाव रविवार, २१ फेब्रुवारी २०१०, २३:५६ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

नगर जिल्हातील वांबोरी नावच गाव आहे. या शनिवारी सकाळी शिवाजीनगरहून नगर बस पकडली. ‘विनाथांब’ बस होती. सहाच प्रवासी बसमध्ये. एक चालक, एक वाहक पकडून आठ. व्ही.आय.पी असल्याप्रमाणे वाटत होत. पुणे नगर महामार्गाचे काम पूर्ण झालेले आहे. सव्वा दोन तासात नगरला. नगरहून ‘वांबोरी’ बस पकडली. घरी गेल्यावर नेहमी प्रमाणे ‘वीज’ नव्हती. संध्याकाळी माझ्या गावातील मित्रांसोबत बाहेर फिरायला गेलो. ...

गाणी गुरुवार, १५ ऑक्टोबर २००९, ००:२७ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

आज सकाळी नेहमीप्रमाणे लोकल चुकली. बस स्थानकात आलो तर बस मिळेना. शेवटी खाजगी वाहनाने येरवडा गेलो. आता खाजगी म्हटल्यावर हिरो लोक असणारच एकाचा एमपीथ्री प्लेअर सुरु. सकाळी उशीर झाला होता म्हणून आधीच वैतागालेलो. त्यात त्याच ‘पेहली पेहली बार मोहब्बत कि है‘. आता त्याच्या एकूणच अवताराकडे बघून हे गाणे एकदम विरुद्ध वाटले. पण गाणे छान लावले होते. कंपनीत माझ्या सिनिअरने ‘मन का ...