काल भावाला पहायला पाहुणे आले होते. खरं तर पद्धतीनुसार आम्हीच त्यांच्याकडे जायला हवं, पण वेळेचं गणित जुळवता जुळवता त्यांनीच आमच्याकडे यायचं ठरलं. फोटो मध्ये मुलगी चांगली दिसत होती, पण प्रत्यक्षात ती काही खास वाटली नाही. हे आता नेहमीचंच होऊन गेलं आहे. फोटो चांगला असतो, पण प्रत्यक्षात रुप काही निराळंच असतं. चांगला निघालेला फोटो देणं हे विचाराला सुसंगतच आहे, पण काही जण ...