काल माझा एक कप फुटला. खळ्ळ् असा. त्या आधी ब्ळ्यबॅक ब्ळ्यबॅक असा एक पानचट आवाज झाला. कपात चहा होता. जर कोणी अज्ञात इसम माझ्यावर पाळत ठेवून माझ्या कारवायांकडे बारकाईनं लक्ष देत असता तर ब्ळ्यबॅक ब्ळ्यबॅक आणि खळ्ळ यांच्या काहीसं मध्ये ऐ च्ची ** असंही काहीसं त्याला ऐकू आलं असतं. पण तसं कोणी पाळत ठेवून नव्हतं. किंवा असलंच तरी त्यानं मला सांगितलं नव्हतं.
असा मी रविवार सकाळचा रम्य ...