आज पहाटे जरा लवकरच जाग आली. जाग आल्यावर लक्षात आले की आपली एक नाकपुडी पूर्ण चोंदलेली आहे. त्या बाजूने श्वास सुद्धा घेणे कठिण जाते आहे. मग शिंका सुरू झाल्या. मधून मधून खोकलाही येऊ लागला. आता डोळ्यावरची झोप केंव्हाच पळाली होती. उठून दिनक्रमाला लागलो. मनात ही भिती होतीच की आपल्याला सर्दी झाली आहे की काय़? पण तास दोन तासांनी श्वास नेहमीसारखा घेता येऊ लागला. सर्दीची सर्व ...