देवनागरी
Roman
Press F12 to toggle

युद्ध

विश्वासघात- 2 मंगळवार, २२ नोव्हेंबर २०११, ०७:१३ (+०५:३०)

chandrashekhar ब्लॉगर अक्षरधूळ Blogger Akshardhool

1913 या साली, ब्रिटिश भारत, तिबेट व चीन या तीन देशांच्या प्रतिनिधींची शिमला येथे एक बैठक झाली. या बैठकीच्या अखेरीस एका कराराच्या मसुद्याला मान्यता देण्यात आली. हा करार शिमला करार म्हणून ओळखला जातो. या करारान्वये, भारत, तिबेट व चीन या तिन्ही देशांच्या मधल्या परस्पर संबंधाचे स्वरूप व सीमा निश्चित करण्यात आली. या कराराच्या कागदपत्रांवर, चिनी प्रतिनिधी ...

चीन युद्धातील चुका आणि घोडचुका सोमवार, २१ नोव्हेंबर २०११, ११:३१ (+०५:३०)

लेख संग्रह ...

मेजर जनरल(निवृत्त) शशिकांत पित्रे, सौजन्य – सकाळ सप्तरंग

 

भारत आणि चीन यांच्यातील कुरापती सुरू होत्या, त्या चीनच्या बाजूकडूनच. सातत्याने सीमेवर कुरबुरी करून भारताला डिवचण्याचे चीनचे उद्देश सुरूच होते. चीनने आपल्याला हवे ते साध्य करण्यासाठी आपल्याला हवे तेव्हा युद्ध पुकारले आणि हवे तेव्हा थांबवले. 1962 च्या कटू आठवणींचा व तो सारा इतिहास या वेळी. मागील अंकात भारत-चीन ...

विश्वासघात- 1 शुक्रवार, १८ नोव्हेंबर २०११, ०९:४२ (+०५:३०)

chandrashekhar ब्लॉगर अक्षरधूळ Blogger Akshardhool

एक भारतीय नागरिक म्हणून तुमच्या आयुष्यात आलेला सर्वात अपमानास्पद व लाजिरवाणा प्रसंग कोणता? असा प्रश्न जर मला कोणी विचारला तर निर्विवादपणे मी 1962 च्या युद्धात चीनने भारताचा केलेला सपशेल व दारूण पराभव हेच उत्तर देईन. माझी खात्री आहे की माझ्या वयाचे किंवा माझ्यापेक्षा मोठे असे सर्व ज्येष्ठ नागरिक सुद्धा हेच उत्तर देतील. एखाद्या फुग्याला टाचणी लावावी तसे काहीसे चीनने आम्हा ...

सीमावाद भारत-चीनचा रविवार, १३ नोव्हेंबर २०११, १३:३१ (+०५:३०)

लेख संग्रह ...

शशिकांत पित्रे, सौजन्य – सकाळ सप्तरंग

आपल्या शेजारी देशांशी चांगले संबंध ठेवण्याचा प्रयत्न भारताकडून नेहमीच केला जातो; पण विस्तारवादी वृत्तीच्या चीनकडून त्यामध्ये अडथळे आणले जातात. चीनचा हा पवित्रा आजचा नाही. अरुणाचल प्रदेशाबाबत चीन अनेक वर्षापासून कुरापती काढत आहे. माओ- त्से- तुंग यांच्या काळापासून भारताशी वैरभाव बाळगणाऱ्या चीनबरोबर 1962 ला झालेल्या युद्धात ...

युद्धज्वर नकोच… रविवार, ०८ मे २०११, ११:३० (+०५:३०)

दीपक लेख संग्रह ...

सुरेश द्वादशीवार, सौजन्य – लोकमत

राष्ट्रे भावनांवर उभी होतात हे खरे;
पण त्यांच्या प्रगतीच्या प्रेरणा
आर्थिक हितसंबंधात व लष्करी वास्तवात
दडलेल्या असतात.
या वास्तवाचे भान गंभीर नेतृत्वाला
बाळगावेच लागते.
टी.आर.पी. वाढवण्याकरता युद्धज्वराचा भडका
उडवणाऱ्या प्रकाशमाध्यमांना हे भान
असेलच असे नाही.

भारतानेही अमेरिकेचा कित्ता गिरवून

नुकतीच २६/११ च्या घटनेचा दुसरा ... शनिवार, ०४ डिसेंबर २०१०, २०:५९ (+०५:३०)

Vinay माय बोली- मनाची बोली

नुकतीच २६/११ च्या घटनेचा दुसरा स्मृतीदिन होऊन गेला. ह्या निमित्ताने अनेक कार्यक्रम, सभा, देशाचं रक्षण आणि अतिरेक्यांचं उच्चाटन करण्याबद्दल भाषणं झाली. पण, सर्वांचा सपेशल राग होता तो अजमल कसाबला ...

कारगिल.. शनिवार, १३ नोव्हेंबर २०१०, ११:०० (+०५:३०)

महेंद्र काय वाटेल ते........

कारगिल च्या युद्धामधे  हौतात्म्य पत्करलेल्या  योध्यां मधे कोण  कोण होते??  खाली यादी देतोय बघा.. मिलिटरीचे अधिकारी मेजर :- १० ...

पळा पळा कोण पुढे पळे तो!- 4 शनिवार, ०९ ऑक्टोबर २०१०, १३:०० (+०५:३०)

chandrashekhara अक्षरधूळ

अरुणाचल प्रदेश किंवा NEFA च्या कामेंग विभागातली 12 ऑक्टोबरला सुरू झालेली लढाई चिनी सैन्याने 19 नोव्हेंबरला बोमडी ला सर केल्यावर थंडावली. या कालखंडात NEFA च्या इतर विभागांच्यात भारतीय व चिनी सैन्याच्या चकमकी चालूच होत्या. NEFA च्या अगदी पूर्वेच्या भागात लोहित नदीचे खोरे आहे, हे खोरे आणि आजूबाजूचा भाग, लोहित या विभागात येतो. लोहित नदीच्या खोर्‍यातून तिबेटवरून अरूणाचल प्रदेशात प्रवेश ...

पळा पळा कोण पुढे पळे तो! – 3 शुक्रवार, ०८ ऑक्टोबर २०१०, ११:५७ (+०५:३०)

chandrashekhara अक्षरधूळ

भारताची ईशान्य सीमा, चीन व भूतान या देशांच्या सीमांना, ज्या ट्राय जंक्शन पॉइंटपाशी येऊन मिळते तेथून साधारण अग्नेयेकडे, थागला रिजच्या टेकड्यांची रांग आहे. या रिजच्या दक्षिण बाजूला वहाणारी नामका चू ही नदी व पूर्वेकडून वाहणारी न्यामजान्ग चू ही नदी या रिजच्या टोकाजवळ एकमेकाला मिळतात. या नंतर न्यामजान्ग नदीचा प्रवाह उत्तर दक्षिण असा वहात असल्याने ही नदी यानंतर भारताची सीमा ...

पळा पळा कोण पुढे पळे तो! -2 मंगळवार, ०५ ऑक्टोबर २०१०, ०९:३९ (+०५:३०)

chandrashekhara अक्षरधूळ

भारताच्या ईशान्येला असलेली तिबेट बरोबरची सीमा ही एक नैसर्गिक भौगोलिक सीमा असल्याने ती ओलांडणे हे फक्त या सीमेवर असलेल्या पर्वत शिखरांच्या रांगांच्या मधे मधे असलेल्या काही खिंडीतून किंवा ही सीमा ओलांडून वाहणार्‍या तीन किंवा चार नद्यांच्या खोर्‍यांमधून व नदी पात्राला लागून असलेल्या पायवाटांनीच फक्त शक्य आहे. या अशा नैसर्गिक संरक्षणामुळे व 1959 साला पर्यंत या सीमेबद्दल ...