हातिमने त्याच्या बंदिवासात दोन आठवडे अन्नपाण्यावाचून काढल्यावर सेवकांनी त्याला राजापुढे नेले, तेथे त्याच्यापुढे उत्तमोत्तम फळे, पाणी वगैरे ठेवण्यात आली. भुकेलेल्या हातिमने प्रथम काहीएक न बोलता आपली क्षुधा शांत केली. त्यानंतर ’लग्न करणार आहेस का नाही?’ असे अस्वलराजाने विचारले असता हातिमने काहीही उत्तर दिले नाही. तेव्हा पुन्हा त्याला कैदेत टाकण्यात आले.
पुढे एके ...