देवनागरी
Roman
Press F12 to toggle

ज्ञानवर्धक

यापेक्षा तिसरे महायुद्ध परवडेल… गुरुवार, १७ डिसेंबर २००९, २२:५८ (+०५:३०)

╚» विशाल तेलंग्रे «╝ कळत नकळत

कित्येक दिवसांपासून चालू असलेली “कोप टू होप” अश्या प्रकारची जाहीरात बहुतेक जणांनी टिव्हीवर पाहिली असेल. पहिले-पहिले तर मला या जाहिरातीचा नेमका अर्थच कळत नव्हता. पण एकदा १५ दिवसांपूर्वी सहजच याहू वरील न्युज वाचत होतो, तेव्हा कुठे मला कळालं की नेमकं काय प्रकरण आहे ते…

तुम्हाला मालदीवने समुद्रामध्ये तर नेपाळने माउंट एव्हरेस्टवर घेतलेली कॅबिनेटची बैठक आठवत ...

मला त्यांनी असं सांगितलं होतं…! सोमवार, २१ सप्टेंबर २००९, १०:२८ (+०५:३०)

╚विशाल╝ कळत नकळत

मला इ-मेल द्वारे मिळालेली एक मजेशीर आणि उपदेशपर गोष्ट:

एकदा एका मोठ्या खोलीत छताला काही फळे टांगून ठेवण्यात आली. त्यानंतर फळांपर्यंत पोहोचणारी एक शिडी तेथे ठेऊन त्या शिडीतून वीजेचा प्रवाह सोडण्यात आला. त्या खोलीत नंतर पाच माकडे आणली गेली व त्यांना तेथेच सोडून देण्यात आले.

भूक लागल्यामुळे माकड जेव्हा फळे खायला जात आणि शिडीला त्यांचा स्पर्श होताच त्यांना वीजेचा ...

विश्वाचे प्रसरण –भाग ३ गुरुवार, १० सप्टेंबर २००९, २०:२२ (+०५:३०)

╚विशाल╝ कळत नकळत

विश्वाचे-प्रसरण- भाग २ पासून पुढे…

’आर्नो पेंझियास’ आणि ’रॉबर्ट विल्सन’

महास्फोटाचा (big bang) सिद्धांत

विश्व प्रसरण पावत आहे ते केव्हापासून ? समीकरणे सोडवून असे दिसते, की प्रसरण विश्वाच्या आदिकाळापासून चालू आहे. आदिकाळात जसजसे आपण विश्वनिर्मिती क्षणाजवळ जाऊ तसतसे प्रसरणाचा वेग आणि हबलचा स्थिरांक वाढत जातील. ...

व्हॉट इज पीस ऑफ माईंड ? गुरुवार, ०३ सप्टेंबर २००९, १७:१४ (+०५:३०)

╚विशाल╝ कळत नकळत

युरोपातील एक विद्यार्थी प्राचीन धनुर्विद्या शिकण्यास्तव भारतात आला. एका गुरूपाशी तो पोहोचला व त्याने गुरूला प्रश्न केला, “गुरूजी, आपण मला धनुर्विद्या शिकवाल का ?”

गुरू उत्तरले, “माझे अवलोकन कर व त्यावरून शिक. ज्ञानार्जन करणे म्हणजेच आपल्यातील अवलोकन क्षमतेची कसोटी असते हेच सत्य आहे“.

गुरूंनी आपल्या नेमबाजीचे प्रात्यक्षिक त्यास दाखविले. त्यानंतर ...

विश्वाचे प्रसरण- भाग २ मंगळवार, ०१ सप्टेंबर २००९, २१:११ (+०५:३०)

╚» विशाल तेलंग्रे «╝ कळत नकळत

विश्वाचे-प्रसरण- भाग १ पासून पुढे…

हबलचा शोध

सन १९२९ मध्ये अमेरिकेतील कॅलिफोर्नियातील माउंट विल्सन वेधशाळेतील २.५ मीटर (१०० इंच) व्यासाची दुर्बिण वापरून ’एडविन हबल’ याने महत्वाचा शोध लावला. त्याची पूर्वपीठिका अशी होती, सन १९१४ पासून ’व्ही. एम. स्लायफर’ आणि इतर काही निरीक्षकांना काही तेजोमेघांच्या वर्णपटात ताम्रसृती दिसून येत होती. आपण लोलकातून (prism) ...

“परमेश्वरा ! मला वाचव रे !” रविवार, ३० ऑगस्ट २००९, २१:५१ (+०५:३०)

╚» विशाल तेलंग्रे «╝ कळत नकळत

रात्र झाली तसा पावसाचा जोर अधिकच वाढला. गावात पुराच्या पाण्याची पातळी चढत होती. ’त्या’ भक्ताचे घरसुध्दा याला अपवाद उरलेले नव्हते. पाण्याची पातळी वाढली म्हणून तो घराच्या छपरावर चढला व परमेश्वराची आराधना करू लागला. गावातील, शेजार-पाजारचे लोक बोटीतून निघाले होते. त्यांनी त्यास छपरावर चढलेला पाहून बोटीत घेण्याचा प्रयत्न केला. “अरे बाबा, असा छपरावर ताटकळत बसू नकोस, ...