देवनागरी
Roman
Press F12 to toggle

इमेल

किती कठीण.. शुक्रवार, १० डिसेंबर २०१०, ११:३६ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

ती दुपारी ऑफिसात येते. तिचा आणि माझ्या ड्रेसचा रंग सारखा. मला तिच्याशी बोलायची खूप इच्छा असते. पण कस? सुचत नाही. कॅन्टीनमध्ये मी मित्रांसोबत जेवायला बसतो. सर्वजण गप्पात रंगलेले असतात. मी तिच्या येण्याची वाट पाहत असतो. ती येते.. ती कोमल, ती सुंदर! ती गोड, ती छान! पाहून मी सुखावतो आणि हालहाल सुरु होतात. अगदी पहिल्यांदा पहिले त्यावेळी जस झाल होत तसं! तसं हे आता ‘नेहमीचेच’. मग तिच्याच ...

कोडे सोमवार, २९ नोव्हेंबर २०१०, १२:११ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

काय बोलू यार! ती खूपच छान आहे. पण तिचे इमेल म्हणजे एक ‘कोडे’च असते. प्रत्येक वेळी मी गोंधळून जातो. म्हणजे सगळ्याच इमेल नाही. आजकाल आमच्या दोघांचे रोज एक इमेल पाठवणे चालू असते. खूप छान वाटते, ज्यावेळी तिचा इमेल येतो. आणि त्याहून आनंद होतो, ज्यावेळी ‘टू’ फक्त मीच असतो. आज एक मस्त कोडे पाठवलेल तिने! पहा जमत आहे का? मी सोडवलेल, सोप आहे. तुमची आय क़्यु चेक ...

वनवास संपला बुधवार, १७ नोव्हेंबर २०१०, १२:५३ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

किती सतावलं यार तिने! पण आता मस्त वाटत आहे. काल दुपारी मला तिने दोन इमेल पाठवले. किती मस्त. आणि आज मी आता एक इमेल तिला पाठवला आहे. आणि पिंग करून गुड मोर्निंग सुद्धा केल. कालपासून सगळंच छान वाटत आहे. दोन नोव्हेंबरला मला तिने स्वतःहून पिंग करून ‘गुड मोर्निंग’ केलेलं. त्यानंतर काल दुपारी तिचे दोन इमेल. मध्यंतरीच्या काळात का रागावली होती कुणास ठाऊक! मी तिला दिवाळीनंतर दहा तारखेला पिंग ...

विनंती शनिवार, २३ ऑक्टोबर २०१०, ०१:१७ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

‘आवरा’ साहेबांना, व सर्व ‘आवरा’ परिवाराला एक विनंती आहे. आपण सर्वज्ञानी आहात. खर तर आपणाबद्दल मी बापुडा काय बोलणार. म्हणून विनंती करीत आहे. आपण आपला इमेल आयडी खरा टाकावा. दुर्दैवाने आपण कोण आहात हे कळल्यावर खरंच मला खूप दुख झाले. पण लपून काही बोलण्यापेक्षा सरळ बोलणे कधीही चांगले. काय करणार हे वेब आहेच असे आहे, सर्वच रेकोर्ड होत जाते. आपण केलेले क्लिक पासून ते वेळेपर्यंत. त्यामुळे ...

इ मेल फॉर्वर्ड्स.. रविवार, १७ ऑक्टोबर २०१०, १०:४७ (+०५:३०)

महेंद्र काय वाटेल ते........

काल सकाळीच एक इ मेल आला. त्यात दिलं होतं की जर मोबाईल पॅंटच्या खिशात ठेवला तर शुक्राणूंची संख्या कमी ...

इमेल बुधवार, ०८ सप्टेंबर २०१०, १५:१७ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

आता दुपारी मी तिला असाच एक मेल पाठवला होता. आणि तिने त्याचा रिप्लाय देखील केला. आणि पिंग देखील केल. काय सांगू, नाचावस वाटत आहे. आजही दुपारपर्यंत दिवस जाम टेन्शनमध्ये गेला. म्हणजे अस काहीच कारण नव्हते. ती आज काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये असली छान दिसते आहे ना! तिला ‘हाय’ करणार होतो. सोडा, मी पुन्हा तेच रिपीट करतो आहे. आज दुपारी जेवायला त्या नव्या कॅन्टीनमध्ये गेलो होतो. पण तीच ...

वशिला मंगळवार, ०६ जुलै २०१०, ०१:१९ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

कोणी तरी सोडवा या ‘वशिल्या’च्या लफड्यातून. यार हे मित्र ना! ह्यांच्यापेक्षा नसलेले परवडले. काय करू, माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत. आणि ‘थोडा वशिला’ लाव म्हणतात. मागील आठवड्यात गावी चाललो होतो. बसमध्ये भेटलाच एक मित्र. घरापर्यंत माझ्या मागे जॉब लावून दे म्हणून. बर ह्याचे शिक्षण माझ्यापेक्षा जास्त. हातपाय हलवायला नको. मला म्हणाला ‘मी पुण्यात आलो की तुझ्याकडे येतो. मला तू ...

जहाल मुंगीची गोष्ट गुरुवार, २५ मार्च २०१०, ०१:१९ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

मुंगी मुंबईहून पुण्याला आली. पुण्यातील हायफाय ठिकाणी असलेल्या एका कंपनीत तिने आपले काम सुरु केले. मुंगी रोज प्रामाणिकपणे कामावर यायची आणि आपल काम करत राहायची. त्या कंपनीचा मालक एक सिंह होता. सिंहाला असे वाटले की आपले काम वेगाने व्हावे यासाठी आणखीन एकाला कामावर ठेवावे. मुंगी करते त्याच कामातील थोड काम दुसऱ्या कोणी केल तर काम आणखीन लवकर होईल या उद्येशाने त्याने एका झुरळाला ...

मुलगी पाहिजे शुक्रवार, १९ मार्च २०१०, ०१:३८ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

याहूची पुणे लोकल चाटींग रूममध्ये तीन दिवसांपासून जातो आहे. जाम मजा येते. दोन दिवसांपूर्वी ते याहू मेसेंजर संगणकावर टाकल. आणि लॉगीन केल. ती रूम उघडली आणि झालं की सुरु. कोणीही यायचं आणि ‘अल्स प्लीझ’ नाही तर डायरेक्ट ‘एम २४ पुणे’. काय मूर्खांचा बाजार असतो. हसून हसून पोट दुखायची पाळी येते. सगळीच मुले. ह्यांचे आयडी ‘लव फोरेव्हर’, ‘यु आर लकी बिकॉझ आय क्लीक्ड यु’, ‘इंडिगो चाईल्ड ५’. काय ...

वाढदिवस शनिवार, १३ मार्च २०१०, ०१:३४ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

काल माझ्या सहकारीचा वाढदिवस होता. सकाळी काम सुरु असतांना त्याला ‘वाढदिवसाच्या शुभेच्छांचा’ इमेल आला. मग ह्यानेही सगळ्या टीमला माझ्या मेजवर चॉकलेट आहे असा इमेल केला. आता मी त्याच्या शेजारीच बसलो होतो म्हणून चॉकलेट आणि त्याला शुभेच्छा ही लवकर देता आल्या. परवा माझ्या मैत्रिणीचा वाढदिवस होता. मग काय परवा दुपारी तीने मला आणि तीच्या काही मैत्रिणींना पार्टी दिली. मस्त वाटलं. ...