टाटा मोटर्स बनवत असलेल्या नॅनो कारला आता खरीखुरी स्पर्धक निर्माण झाली आहे. नॅनो ही गाडी भारतातली सर्वात स्वस्त मोटरगाडी आहे व तिची किंमत 1 ते सव्वा लाख रुपयांच्या घरात आहे. जगात द्वितिय क्रमांकावर असलेले मोटर सायकल उत्पादक बजाज ऑटो लिमिटेड या कंपनीने बनवलेली आपली नवीन कार किंवा ऑटोरिक्षा आज लोकांना प्रदर्शित केली. य़ा कारचे नाव त्यांनी RE 60 असे ठेवले असून या गाडीट असणारे इंजिन ...