देवनागरी
Roman
Press F12 to toggle

कारणे

हिंदूंचे जागरण मंगळवार, १४ सप्टेंबर २०१०, २०:५९ (+०५:३०)

दीपक लेख संग्रह ...

मंगला सामंत, सौजन्य – लोकसत्ता

अनेक भाषा, असंख्य जाती, त्यामुळे हिंदूंची एकजूट ही मोठी अडचण असावी. त्यामुळे गोहत्या, मंदिर-मस्जिद वाद, हिंदूंचे धर्मांतर हे तकलादू मुद्दे समस्त हिंदूंच्या भावना भडकविण्याची सामायिक शस्त्रे म्हणून वापरले जातात. धर्मांतरामागोमाग लगेच जोडून येणारा विषय म्हणजे ‘हिंदूंचे जागरण!

‘ ‘जागरण‘ म्हणजे काय, ते नेमके कोणी करायचे, या जागरणाचे ...

धम्म चळवळीची निष्पत्ती शुक्रवार, १० सप्टेंबर २०१०, २०:११ (+०५:३०)

दीपक लेख संग्रह ...

सुहास पळशीकर, सौजन्य – मटा

(लेखक पुणे विद्यापीठात राज्यशास्त्राचे प्राध्यापक आहेत.)

धर्मांतर हा तसा हिंदू समाजाच्या दृष्टीने नाजूक मुद्दा असतो. ‘बाहेरून’ आलेल्यांनी धर्मांतरं घडवून आणली, असं दु:ख कुरवाळीत बसणाऱ्या संघटनांची काही कमी नाही. पण धर्मांतरं का होतात, याबद्दल हिंदू समाजाने कधी फारशा गंभीरपणाने विचार केलेला नाही. ज्या हिंदुत्ववादी संघटनांना ...

जग उलथवू शकणारी.. तरफ बुधवार, १८ ऑगस्ट २०१०, २१:१० (+०५:३०)

दीपक लेख संग्रह ...

डॉ. अभय बंग, सौजन्य – दै.लोकमत (मंथन पुरवणीतुन, १५ ऑगस्ट २०१०)

उंच होत जाणाऱ्या पिरॅमिडच्या रुंद तळाशी  गोरगरिबांची, स्त्तिया आणि आदिवासींची ऊर्जा सामावलेली आहे. या माणसांना सबळ होण्यासाठी साधने पुरवणे, त्यांचे प्रश्न शोधून, त्यांना सोबत घेऊन उत्तरे शोधणे हे मोठे आव्हान आहे. ती सामान्य वाटणाऱ्या अडाणी माणसांकडे असते…त्यांच्याकडे जा ...

डॉ. आंबेडकर आणि भारतीय मुस्लिम मंगळवार, २९ जून २०१०, २३:५१ (+०५:३०)

दीपक साळुंके लेख संग्रह ...

हुसेन जमादार,  सौजन्य – मटा


इस्लाममधील समतावादी तत्वामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मनात इस्लामविषयी आदरभाव होता, परंतु भारतात तो समाजवादी आशय लोप पावल्यामुळे त्यांना दु:खही झाले होते. इस्लाममध्ये वंश आणि वर्ग यांच्या सीमा ओलांडून विविध लोकांना बंधुत्वाच्या भावनेने एकत्र बांधण्याची क्षमता असली तरी भारतीय ...

“आम्हाला साहित्यिकांकडून कालभेदी दृष्टी... रविवार, २७ जून २०१०, २०:३७ (+०५:३०)

दीपक साळुंके लेख संग्रह ...

- डॉ. अभय बंग, सौजन्य – अनुभव मासिक

पुण्यात झालेल्या 83व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने “आजचा काळ, आजचे साहित्य’ या विषयावरील “युनिक फीचर्स’ने संपादित केलेल्या स्मरणिकेचं प्रकाशन डॉ. अभय बंग यांच्या हस्ते झालं.

या भाषणात त्यांनी साहित्यिकांकडून समाजाला असलेल्या अपेक्षा मांडल्या आहेत, मात्र “तंबाखूने रंगवलेला पैसा संमेलनात ...

काय बोलू? सोमवार, २४ मे २०१०, ०१:२१ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

यार हा लग्न विषय ना पिच्छा सोडत नाही आहे. जो बघाल तो माझ्याशी ह्याच विषयावर बोलतो. दोन-तीन दिवसांपूर्वी एका प्रतिक्रियेतून हाच प्रश्न विचारला होता. गेल्या महिन्यापासून हेच चालू आहे. माझ्या इमारतीतील सगळे कधीही भेटले की हाच प्रश्न. आणि माझ लग्न खर बोलायचं झालं तर मोडल. आता ह्याच दु:ख माझ्यापेक्षा माझ्या नातेवाईकांनाच जास्त झाल्याची शंका येत आहे. मध्यंतरी माझ्या कोकणातील ...

प्रताप थोरात, सौजन्य – ... गुरुवार, २९ एप्रिल २०१०, १०:४० (+०५:३०)

दीपक साळुंके लेख संग्रह ...

प्रताप थोरात, सौजन्य – लोकसत्ता

महाराष्ट्राचं शहरीकरण झालंय. आता राज्य करण्यासाठी बिल्डरचा मुलगा असणं सोयीचं. एफएसआयचं गणित कळलं म्हणजे झालं. राजकीय घराण्यांनी बहुजन समाजात रमण्याचे दिवस मागेच गेले. व्यापारी, दलाल हेच सख्खे वाटतात. नेतृत्व करू पाहणाऱ्यांची मानसिकता बदललीय. येऊ पाहणारे बडे उद्योग डझनावारी आजूबाजूच्या राज्यात पळवले गेले तरी कुणातच कळ उठत नाही. ना ...

जळणारे पारधी अन् कुलूपबंद संवेदना मंगळवार, १६ मार्च २०१०, ०१:१० (+०५:३०)

दीपक साळुंके लेख संग्रह ...

अरुण करमरकर, सौजन्य-लोकसत्ता

माढा तालुक्यातील जळीतकांडात एक-दोन नव्हे आठजण जळून खाक झाले. ही आग अपघाताने लागलेली नाही, तर मुद्दामहून कोणीतरी लावलेली. आग लावणाऱ्याने ती चारी बाजूंनी धडाडून पेटेल याचा जणू कडेकोट बंदोबस्त केलेला..

सकाळीच दूरध्वनी खणखणला आणि त्यावरून माढा तालुक्यातल्या आणखी एका पारधी जळीताची दुर्वार्ता कानावर दणकली. आगीने होरपळून कोणीही ...

प्लासी ते अणुयुग गुरुवार, ०४ मार्च २०१०, ०१:२८ (+०५:३०)

दीपक साळुंके लेख संग्रह ...

गोविंद तळवलकर , सौजन्य – मटा

(लेख ३ जाने २००८ रोजी प्रकाशित झाला होता.)

इतिहासातील सनावळ्यांनी अनेक महत्त्वपूर्ण घटनांची नोंद घेतलेली असते. त्या घटनांनी अर्थातच त्या त्या काळात दूरगामी परिणाम घडवलेले असतात. मग ती ब्रिटिश साम्राज्याचा भारतात पायाघालणारी प्लासीची लढाई असो की १८५७चे भारतीय स्वातंत्रयुद्ध असो , आज तेथपासून अणुयुगापर्यंत झालेल्या प्रवासात त्या घटनांचे ...

महाराष्ट्रात हे काय चाललंय ? शनिवार, २० फेब्रुवारी २०१०, २१:२२ (+०५:३०)

दीपक साळुंके लेख संग्रह ...

उत्तम कांबळे, सौजन्य – सकाळ

डाळ महागलेली, तांदूळ महागलेला, एकूणच जगणं महागलेलं, सोबतीला पाणी आणि विजेची टंचाई आहेच. अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा मानल्या जातात, त्यांचीही पूर्तता होऊ नये, अशी स्थिती महाराष्ट्रात आहे. अशा वेळी सामान्य माणसानं ज्यांच्याकडे उत्तरासाठी पाहायचं, ती राजकीय मंडळी मात्र भावनेच्या राजकारणात मश्‍गूल आहेत. कधी भाषेची, कधी ...