देवनागरी
Roman
Press F12 to toggle

संसार

व्हायोलिन रविवार, ०६ मार्च २०११, ०१:०६ (+०५:३०)

आल्हाद alias Alhad आल्हादक प्रतिबिंब!

त्यांच्याकडे व्हायोलिन होती. ती व्हायोलिन ते वाजवतही असत. कसलेतरी प्रच्छन्न उदास सूर काढत असल्याप्रमाणे त्या तारांवरून सावकाश बो फिरवत बसत. थरथरणार्‍या हातात बो आणि झंकारणार्‍या तारा. त्यांनी कुठूनतरी ही व्हायोलिन पैदा केल्यावर, जुडो कराटेसारखंच व्हायोलिन शिकायलाही पुस्तक आणलं. पण ते त्यांना बहुतेक जमलं नसावं.

कारण त्यांच्या खोलीतून कधीच व्हायोलिन ऐकू आलं नाही. जेमतेम ...

Happily Single?? मंगळवार, ३० नोव्हेंबर २०१०, १९:२६ (+०५:३०)

Gaurav भटकंती.....क्रिकेट......वाचन........Etc....

ऑफिस मध्ये single माणसाचे दु:ख समजुन घ्यायला दुसरा single माणुस नसेल तर ऑफिसमध्ये खुप त्रास होऊ शकतो. समविचारी मंडळी ऑफिसमध्ये भेटणे हे भाग्यच म्हणावे लागेल. जर ऑफिसात एखादा सिंगल माणुस (just) Married, would be married आणि टापलेले (याचा संदर्भ नंतर लागेल) यांच्यामध्ये एकटा सापडला तर मात्र त्याची अवस्था बिकट असते. अर्थात तो सुद्धा त्याच मार्गावर कार्यरत असतो पण त्या गोष्टींना बराच वेळ असतो त्यामुळे ...

आया मौसम ‘शादीयों’का….. शनिवार, २३ ऑक्टोबर २०१०, १२:२० (+०५:३०)

प्रज्ञा जीवनतरंग....

  दिवाळीनंतर तुलसीविवाह झाला की लग्नाचे मुहूर्त चालू होतात. एव्हाना या ‘सीझन’ मध्ये ज्यांची लग्नं होणार आहेत त्यांची गडबड चालू झाली आहे-वाणसामान व इतर खरेदी, लग्नाची ...

भविष्यकालीन जीवन सोमवार, २० सप्टेंबर २०१०, २३:१४ (+०५:३०)

ravindra माझ्या मना ...

आपल्या संस्कृतीत एकदा लग्न झाले की आपली पत्नी, मग मुल, आपला संसार यात मनुष्य गुंतून पडतो. त्यांच्यासाठी झटणे हेच माणसाचे कर्तव्य असते. पण पुढे काय वाढून ठेवले आहे हे ह्या ज्योक वरूनच लक्षात येईल.

मी दोन ...

घरोघरी मातीच्या………… रविवार, १९ सप्टेंबर २०१०, ००:०५ (+०५:३०)

ravindra माझ्या मना ...

तो घरी येतो, बेल वाजवितो, ती दार उघडते, ती स्मित हास्याने त्याचे स्वागत करते, तो आनंदित होतो. बाळ ‘बाबा आले, बाबा आले’करीत धावत त्याच्या जवळ येते, तो ‘अरे पिंट्या ये ये’ करीत त्याला उचालण्यासाठी हात पुढे करतो आणि ‘अरे काय करतो आहे, ते हात धू आधी; मग त्याला जवळ घे. किती वेळा सांगावे ह्या माणसाला लक्ष्यातच ठेवत नाही हा.’ आणि त्याचा पचका होतो. तो लागलीच हात मागे घेतो. रागे रागे बेडरूम ...

म्हातारपण- एक शिक्षा? शनिवार, १४ ऑगस्ट २०१०, १५:५३ (+०५:३०)

ravindra माझ्या मना ...

ती चार चार मुलांची आई झाली तेव्हा केव्हढा आनंद झाला होता तिला. मला मालमत्ता-धन दौलत काही नको देवा. ही माझी सोन्या सारखी मुल म्हणजे माझी दौलत आहे. मी मोल मजुरी करीन आणि या माझ्या सोन्यांना मोठ करीन, खूप शिकवीन, मोठी झाली की ही सर्व माझी जीवापाड काळजी घेतील.

ती रात्रंदिवस मेहनत करून घर चालवायची. नवर्याचा फारसा काही उपयोग होत नव्हता. मुलांना वडील आवश्यक असतात म्हणूनच नाही तर. असो ...

बाय बाय नाशिक सोमवार, २६ जुलै २०१०, ००:१५ (+०५:३०)

ravindra माझ्या मना ...

या वर्षी माझी बदली होणार आहे अशी चर्चा माझ्या कानापर्यंत आली आणि अस्वस्थता वाढली होती. मला नाशिक मध्ये राहून १४ वर्ष झाली आहेत. मागील ७ वर्षापासून नाशिकातील माझ्या कार्यालयाशी तेथील कामाशी प्रेम आपुलकी निर्माण झाली आहे. ती आता नाहीशी होणार या कल्पनेने मन कासावीस होत होते. अचानक एके दिवशी एक फोन आला आणि माझी पुण्याला बदली झाली असे समजले. क्षणभरासाठी श्वास जगाच्या जागी ...

आयुष्याचे गणित रविवार, ११ जुलै २०१०, १६:२३ (+०५:३०)

ravindra माझ्या मना ...

५१ व्या वाढदिवसाला जाग आली,

आणि मनाला अचानक म्हातारपणाची जाणीव झाली,

आपण आयुष्याची ५१ वर्ष व्यतीत केली?

हे समजल्यावर धक्काच बसला.

क्षणार्धात मानसपटलावर आयुष्याची ५१ वर्ष

चलचित्र पटासारखी येऊन निघून गेली

मी थांबलो, मागे वळून पाहिले!

आयुष्यात काय करायचे राहिले?

मनात आले,

हा चित्रपट स्लो मोशन ...

मी पुणेकर होतोय! सोमवार, २१ जून २०१०, २३:५१ (+०५:३०)

ravindra माझ्या मना ...

चिमणी पाखर काही दिवस एका झाडावर घरट करुन राहतात. तेथील दानापाणी संपल की ते आपल गर सोडुन जेथे दानापाणी मिळेल तेथे जाऊन राहतात. पण नौकरदारांच अस नसत. नौकरी म्हटली की बदली ही आलीच. एकाच ठिकाणी जास्त वेळ रहाता येत नाही. माझे ही तेच झाले आहे. कालच कळले की माझी बदली पुण्याला झाली आहे. मी आनंदित झालो. पुण्यासारख्या शहरामधे रहाणे म्हनजे मागच्या जन्मी आपण काही तरी पुण्य केले असावे असेच आहे. ...

आज त्याचा वाढदिवस शनिवार, १५ मे २०१०, ०१:१४ (+०५:३०)

ravindra माझ्या मना ...

मित्रांनो १५ मे १९८७ हा त्याचा वाढदिवस. तो त्या दिवशी जन्मला आणि क्षणिक आनंद देऊन गेला. आज तो असता तर २३ वर्षाचा झाला असता. मन रडते आहे. देवा काय वाईट केले होते रे मी कि तू त्याला लगेचच बोलावून घेतले.

मित्रांनो आजच्याच दिवशी माझ्या पहिल्या मुलाचा जन्म झाला होता. पण तो आनंद देवाजीने जास्त दिवस मला उपभोगू दिला नाही.  ४ महिन्यांनी तो गेला. आणि आयुष्य भारासाठी आठवण ठेवून गेला. मनातील ...