देवनागरी
Roman
Press F12 to toggle

लोक

मिस कॉल, मित्र, वैताग, पोटदुखी शनिवार, १८ डिसेंबर २०१०, २०:२७ (+०५:३०)

रोहन जगताप कथा ना व्यथा

आज कुठेतरी बाहेर फिरयला जावं म्हटलं, तर मित्राचा मोबाईल स्विच ऑफ. दुसर्‍या नंबरवर दोनदा फोन केला तर उचलला नाही. थांबा! आत्ताच त्याला फोन करुन याबाबत जाब विचारतो. कसला विचारतोय!? अजूनही बंदच आहे! नाहीतरी दुपारी सुखाने झोपलेलो असताना फ्रेंड्स अवर मध्ये हमखास याचे फोन असतात. माझा मोबाईल नेहमी व्हायब्रेशेनवर असतो. पण याच्या दुपारच्या फोनवेळीच तो जनरल मोडवर कसा काय राहतो!? ..आणि समजा ...

दादांची वाढदिवसाची भेट गुरुवार, २२ जुलै २०१०, १३:१८ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

‘जाणता पुतण्याचा’ फोन वाजला. डोळे चोळत अंथरुणातून पुतण्याने कुणाचा पहिला तर ‘काकांचा’. गडबडून गजराचे घड्याळ बघितली आणि ताबडतोप फोन उचलून ‘काका बोला’. तिकडून  ‘आले वाढदिवसाच्या शुभेच्छा!’. पुतण्या ‘तुमचे आशीर्वाद आहेत. पण काका माझा वाढदिवसाला अजून एक आठवडा बाकी आहे. तुम्ही तर आत्ताच शुभेच्छा दिल्यात’. तिकडून आवाज आला ‘आले, तुला माहिती आहे ना, मी कायम घड्याळाच्या पुढे चालणारा ...

माझा आकड्यांचा प्रवास, वाचकसंख्या रविवार, ०४ जुलै २०१०, २०:२३ (+०५:३०)

रोहन जगताप 2know.in

मी नवीन नवीन ब्लॉग लिहायला सुरुवात केली, तेंव्हा सारं काही माझ्यासाठी अगदी नवीन होतं. मी माझ्या ब्लॉगवर वाचकसंख्या समजावी म्हणून गुगल ऍनॅलिटिक्सचा कोड टाकला, माझ्या ब्लॉगपासून कमाई व्हावी म्हणून ...

१०० शुक्रवार, ०६ नोव्हेंबर २००९, ००:४१ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

आज फ्लूने शतक केल पुण्यात. आता सचिनने देखील केल म्हणा. कदाचित शंभर म्हटलं की क्रिकेटच आठवेल. पण पुण्यात सावळा गोंधळ चालू आहे. आता मी काही त्या हिंदी बातम्यांच्या वाहिन्यांचा प्रतिनिधी नाही, की ‘फ्लू का आतंक’ म्हणायला. पण सुरवात आणि शतक पुण्यातच घडल. मुळात त्या स्वाइन फ्लू बद्दल काय बोलाव तेच कळत नाही. ना त्यावर योग्य उपाय ना लोकात जागरुकता. प्रत्येक जण तोंडाला ...

मास्कचे शहर पूणे मंगळवार, ११ ऑगस्ट २००९, ००:३५ (+०५:३०)

hemant athalye हेमंत आठल्ये

आज सकाळी आवरून निघायला उशीर झाला. त्यात लोकल जाते की काय याच टेंशन. घराला कुलुप लावून बाहेर निघालो तर जिकडे तिकडे सगळे हिरवे पांढरे मास्क घालून चाललेले लोक. आधी छोटी मुले त्यांच्या आई वडिलांबरोबर पाठीवर दप्तर, आणि त्यांच्या हातात हात. अशी आरडा ओरडा करत चाललेली नेहमी बघत आलेलो. बघून खुप छान वाटायचे. त्यांचे निरागस चहरे आणि कर्ण मधुर आवाज. सकाळ अगदी छान होवून जायची. पण ...