आमच्या राज्यशासनाच्या नाकर्तेपणाचे, स्वाभिमानशून्यतेचे नवनवीन किस्से उघडकीला येताहेत. गेली पाच वर्षे सर्व महाराष्ट्रभर राज्यभाषा मराठीमध्ये नवीन शाळा उघडण्यावर किंवा अस्तित्वातील शाळांमध्ये पुढील वर्ग चालू करण्यावर बंदी घालणारे आमचे राज्यशासन इंग्रजी, हिंदी, उर्दू, कानडी, गुजराथी शाळांना मात्र कुठलीही तपासणी न करता मुक्तहस्ताने परवानगी देत आहे. त्यामुळे ...
पुण्य नगरी पुणे येथे नुकताच बालकमंदीर प्रवेशाचा हंगाम (pre school admission season) सुरु झाला. विशेषतः कोथरूडमधे लोकसंखेच्या तुलनेत शाळा कमी असल्याने चांगल्या शाळांचा अर्ज घेण्यासाठी पालकांना तासंतास रांगा लावाव्या लागतात.
सगळ्यात मोठे आश्चर्य म्हणजे कोथरूड सारख्या मराठमोळ्या भागात सगळ्या चांगल्या शाळा इंग्रजी माध्यमाच्या आहेत. पालक इंग्रजी माध्यमाचा आग्रह करतात म्हणून मराठी शाळा ...
"भारताच्या राज्यघटनेप्रमाणे केंद्र सरकार किंवा कुठलेही राज्य सरकार इंग्रजी भाषेच्या जोपासनेस, संवर्धनास किंवा प्रसारास मुळीच बांधील नाहीत. घटनेच्या तत्त्वाप्रमाणे कुठल्याही राज्याने प्रामुख्याने आपल्या राज्यभाषेच्या माध्यमातूनच आपल्या जनतेची शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक प्रगती साधण्यासाठी प्रयत्न करायला हवेत."
"नुसतेच स्थानिक भाषेतून शिक्षण देणे याबरोबर ...