अक्षरधूळ
पश्चिम महाराष्ट्रातल्या सोलापूर जिल्ह्यातल्या उजनी या गावाजवळ, भीमा नदीवरचे एक अतिशय मोठे धरण आहे. उजनी धरण या नावाने ओळखल्या जाणार्या या धरणाची पाणी साठविण्याची क्षमता 1517 गिगालिटर्स (GigaLitres) एवढी प्रचंड आहे. क्षमतेच्या बाबतीतला या धरणाचा क्रमांक कोयना व जायकवाडी यांच्यानंतर तिसरा लागतो. या धरणात पोचणारे पाणी थेट पुण्याच्या मुळामुठा सारख्या अनेक नद्यांमधून येत ...