देवनागरी
Roman
Press F12 to toggle

रेल्वे

खिडकीत सोमवार, १४ नोव्हेंबर २०११, २२:४१ (+०५:३०)

आल्हादक प्रतिबिंब!

रोज होते तशीच सकाळ आजही झाली. रोज जातात तसेच आजही ते वेळेवर ऑफिसला निघून गेले. रोज वाजतात तसेच आजही साडेदहा वाजले. आणि ती तीचे लांबसडक केस विंचरत खिडकीत येऊन उभी राहिली. महामुंबईतल्या कुठल्या तरी बारक्या उपनगरातली म्हाडाची वसाहत. त्यांच्या सर्वात शेवटच्या मजल्यावरील घरातून दूरवरची रेल्वे लाईन दिसे. रोज सकाळी अनिमिष नेत्रांनी लोकल्स आणि स्टेशनवरची अफाट गर्दी ती बघत बसे. ...

प्लॅटफॉर्मवर राहून ट्रेनशीच वैर !!! टाट... सोमवार, २१ मार्च २०११, २०:२८ (+०५:३०)

Ameya Girolla दिलसे...

'पाण्यात राहून माशांशी वैर बाळगू नये' असं मराठीत म्हंटलं जातं. मात्र सध्या दादर, वाशी तसेच इतर प्रमुख रेल्वेस्थानकांवर नजर फिरवली असता यात थोडासा बदल करून 'प्लॅटफॉर्मवर राहून ट्रेनशीच वैर बाळगू नये' असं म्हणावसं वाटतंय. आपणापैकी कोणी गेल्या काही दिवसांत मुंबईच्या लोकल रेल्वे स्थानकांवर नजर फिरवली असल्यास जिकडे-तकडे टाटाच्या इंडिका इ व्ही 2 या गाडीच्या जाहिराती ...

प्रजासत्ताक दिन शुक्रवार, २८ जानेवारी २०११, ०५:३३ (+०५:३०)

महेंद्र काय वाटेल ते........

प्रजासत्ताक दिन झाला काल.  प्रजासत्ताक म्हणजे नेमकं काय? प्रजेवर नेत्यांनी सत्ता गाजवायचा दिवस? की प्रजेने नेत्यांवर ??   असे अनेक प्रश्न ...

ड्रीम डेस्टीनेशन........ रविवार, २१ नोव्हेंबर २०१०, २३:१४ (+०५:३०)

Vikrant Deshmukh... Toss The Feathers..........

(काही वेळा आपली प्रतिभा उगाचंच सैरावैरा धावत असते. मन काहीच्या काही कल्पनाचित्रे उभी करते हो... संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या अमोघ अश्या शैलीत ’ज्ञानेश्वरी’ ग्रंथात सहाव्या अध्यायात ...

घाम ! गुरुवार, १२ ऑगस्ट २०१०, ०८:०० (+०५:३०)

अजय आ सेतू....

मी ठाणे स्टेशन जवळ घर मिळाल्यामुळे स्वत:ला फारच भाग्यवान समजतो. घरुन सक्काळी सक्काळी कॉलेजला जाताना रिक्षा वाल्याच्या मुजोरिचा सामना करावा लागत नाही कि महानगरपालिकेच्या कृपेने खड्डेमय झालेल्या रस्त्यांवरुन जावे लागत नाही ! घराबाहेर निघताच लगेच फलाट क्रमांक एक वरुनच गाडी मिळते. पण काही कारणाने एक वरुन निघणारी गाडी चुकली तर ? तर मात्र त्याच नशिबाला दोष ...

रेल्वे आणि मराठी (ले० वाचकमित्र बिंदुमा... रविवार, ०१ ऑगस्ट २०१०, २१:५७ (+०५:३०)

अमृतयात्री अमृतमंथन

"प्रत्येक गावाला, शहराला एक नाव असतं आणि ते नाव त्या ठिकाणाचे व्यक्तिमत्व असतं. त्या नावामागे काही इतिहास असतो, काही आठवणी असतात, काही भावना असतात. पूर्वी साम्राज्यविस्ताराच्या काळात जेत्यांनी पराजितांच्या देशातील ठिकाणांची नावे बदलण्यामागे तेथील संस्कृतीच्या खुणा आणि ...

लोकलचा ’फर्स्ट क्लास’ मंगळवार, १३ जुलै २०१०, २२:२९ (+०५:३०)

Santosh काहीतरी... कधीतरी... उगीचच...

लहानपणी मोठेबाबांकडे जाण्यासाठी जेव्हा जेव्हा लोकल ट्रेनने प्रवास करायचो तेव्हा तेव्हा ’फर्स्ट क्लास’चा रिकामा डब्बा पाहुन त्या डब्ब्यात प्रवास करावा असं वाटत राहयचे! पण त्याकाळच्या परिस्थितीत ते शक्य नव्हतं! पण जसा नोकरीला लागलो नि पगार वाढत गेला तेव्हा प्रथम दर्जाचा मासिक पास काढावासा वाटला नि हा विचार लगेच अंमलात आणला. लोकलच्या ’द्वितीय दर्जा’ ते ’पहला दर्जा’ ह्या ...

अशोक ‘सिंग’ चौहानांना उत्तरेकडील सदिच्छ... शनिवार, १९ डिसेंबर २००९, ०१:२७ (+०५:३०)

अमृतयात्री अमृतमंथन

आपले मराठी-अभिमानी मित्र (ऍक्सिस बॅंकेला नमवून मराठी बोलायला लावणारे) डॉ० श्रीपाद पांडे यांनी महाराष्ट्राच्य़ा सध्याचे मुख्यमंत्री माननीय अशोकराव चव्हाण यांच्या ...

स्वप्न मंगळवार, २० ऑक्टोबर २००९, १५:१९ (+०५:३०)

आल्हाद alias Alhad आल्हादक प्रतिबिंब!

एक गिधाड होतं तिथे
टकलं, पिसं झडलेलं
लूत भरलेलं गिधाड
ती तर गरूडाची जागा होती ना?
मग तिथे गिधाड का?

सुवाच्य अक्षरात लिहीलेला शब्द
’आत्महत्या’
’त्या’ चा काना लिहून निब मोडलेलं पेन
सावल्या कागदावर पसरतायत
उजेड कमी होत चाल्लाय

रेल्वेचे रूळ
त्यांना फुटणारे असंख्य फाटे
मग ट्रेन्स, एका मागोमाग एक
प्रचंड वेगात, क्षणोक्षणी ट्रॅक बदलत

नियमितपणे अनियमित येणारी पुण्याची लोकल शुक्रवार, २४ जुलै २००९, २२:५१ (+०५:३०)

hemantpali हेमंत आठल्ये

आजकाल घड्याळ वापरणे रेल्वे खात्याने पूर्णपणे बंद केले आहे की काय अशी शंका यायला लागली आहे. रोज मी ८:२१ ची लोकल पकडतो. पण मला काही कधी मागच्या एका वर्षात अस दिसल नाही की लोकल बरोबर ८:२१ ला आली किंवा निघाली. आजचेच उदहारण घ्या. आज मी संध्याकाळी ७ च्या लोनावाला लोकल साठी पूणे स्टेशनवर ६:४० ला आलो. बघतो तर काय  गाड़ी १५ मिनिटे उशिरा येणार. ३५ मिनिटे करायचे काय म्हणुन आज पूणे ...