देवनागरी
Roman
Press F12 to toggle

दिवस

एक दिवस नियमांचा गुरुवार, १५ जुलै २०१०, २३:०३ (+०५:३०)

मी एक हौशी लेखक

जर सकाळी उठल्या उठल्या "आजचा हा दिवस तुम्हा सर्वांना मी (देव) व सरकारने बनविलेले सर्व नियम पाळायला लागतील" अशी एखादी आकाशवाणी झाली तर काय गंमत येईल ना. माझा हा दिवस कसा असेल याचे एक चित्र तयार करायचा असा प्रयत्न केला.

मी सकाळीच लवकर उठून अगदी भल्या पहाटे अभ्यंग स्नान वगैरे करुन देवाची पुजा, काकड आरती केली नंतर सर्व मोठ्यांचे आशिर्वाद घेऊनच दिवसाची सुरुवात केली. बायको ...

असेच काही फोटो –२ बुधवार, ३१ मार्च २०१०, १२:१६ (+०५:३०)

JaguarNac मुक्ताफळे

आज परत एकदा लिहायला असं काही सुचत नाहीये म्हणून हे काही फोटो…

वळण

या महिन्याच्या सुरुवातीला सॅन फ्रान्सिस्कोच्या ट्रिपला गेलो होतो तेव्हा काढलेला हा फोटो. आम्ही निवडलेल्या टूरमधे ट्विन पीक्स हे एक ठिकाण होतं. तिथून सॅन फ्रान्सिस्कोचा असा छान देखावा दिसतो.

खारूताई

तिकडच्या बोटॅनिकल गार्डनमधे भरपूर ...

चित्रपटपूर्ण रविवार सोमवार, २९ मार्च २०१०, १२:३९ (+०५:३०)

JaguarNac मुक्ताफळे

आजच्या दिवसात मी “आरोग्याला अपायकारक” इतका टीव्ही पाहिलाय. सकाळी घराची स्वच्छता केली, आठवड्याचा बाजार आणला, (म्हणजे फक्त ब्रेड, सिनामन रेझिन व्हीट), जेवलो, आणि नंतर हातात लॅपटॉप घेऊन प्रोग्रॅमिंग आणि समोर अविरत टीव्ही असा सुखद आळस सुरू झाला. नेटफ्लिक्स हे एक वरदान आहे. बरेच चित्रपट सीडीवर आणि ऑनलाईन बघण्यास उपलब्ध आहेत.

व्हांटेज पॉइंट, चिट्टी चिट्टी बॅंग बॅंग, स्कूबी डू आणि ...

पोस्ट : अशी का तशी? शनिवार, १३ मार्च २०१०, १३:४८ (+०५:३०)

JaguarNac मुक्ताफळे

कधीकधी अचानक जोरात पोस्ट लागलीय असं वाटू लागतं पण तेव्हा नेमकं ऑफिसमधे किंवा बसमधे असल्याने बसता येत नाही. घरी येऊन निवांत बसावं म्हणलं तर तोवर पोस्ट सोयिस्करपणे जिरलेली असते… कधी बसल्यानंतर कळतं की फॉल्स आलार्म होता… थोडंसं लिहून तो ड्राफ्ट सेव होतो आणि कधीतरी आपण पूर्ण होऊ ही आशा धरून तशीच बसून राहते. अशा बऱ्याच जिरलेल्या किंवा विझलेल्या पोस्ट्सनंतर जेव्हा एखादी पोस्ट ...

ताप बुधवार, १० मार्च २०१०, १३:२२ (+०५:३०)

JaguarNac मुक्ताफळे

पावसानं खरंच वैताग आणलाय. काल थोडासा काय भिजलो आणि रात्री लगेच हुडहुडी भरून अंग दुखून कसकस जाणवायला लागली. मग काय, गपचूप झोपलो क्रोसीन घेऊन. घरापासून इतकं दूर असताना बरं नाहीसं वाटण्याचा हा माझा पहिलाच अनुभव. आई आणि आजीची फार आठवण आली. आज दिवसभर घरीच होतो, त्यात दुपारी एक मस्त भयाण स्वप्न पडलं… मज्जा आहे.

आज दिवसभर तरी बरं वाटलं. दुपारी थोडं काम केलं, थोडी विश्रांती घेतली आणि ...

भन्नाट सरी मंगळवार, १४ जुलै २००९, ००:४५ (+०५:३०)

hemantpali हेमंत आठल्ये

सकाळी चांगलेच उन पडले होते, पण जस जसा दिवस संपायला  लागला तस तसा अंधार आनाखिनच गडद व्हायला लागला. त्यात कामावरून निघायला मला उशीर झाला. कशी बशी एकदाची सात वाजताची लोकल मिळाली. पण दुर्दैव लोकल होती सातची आणि निघाली ७:३० ला. राग आणि निराशा दोघेही एकाच वेळी आल्यावर काय होत ते मला आज समजल. एक तर गेटवर जागा मिळाली, पण ती देखिल दुसर्या क्रमांकाची. खर तर मुंबईवरुन  आल्या पासून ...