देवनागरी
Roman
Press F12 to toggle

अनेक

ट्रिक्स बुधवार, ०२ नोव्हेंबर २०११, ११:५३ (+०५:३०)

Bhushan Fegade काहीपण....

1)या ट्रिक्स चा वापर फक्त शैक्षणीक हेतूसाठीच करावा. 2) या ट्रिक्स मुळे जर तुमचे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले तर यासाठी मी जबाबदार राहणार नाही . . काही निराळ्या तर काही उपयोगी ...

नाही शुक्रवार, १६ जुलै २०१०, १४:२३ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

संपली एकदाची उत्कंठा! तिला बघायला काल गेलो होतो. लुक सोडला तर बाकी सगळ छान आहे. असो, आई-वडिलांना ते स्थळ योग्य वाटत आहे. त्यामुळे आज सकाळपर्यंत मी फारच गोंधळून गेलो होतो. ‘प्रत्येकात काही ना काही कमी असते. कुठे ना कुठे काही तरी तडजोड करावीच लागेल’ अस वडील म्हणत होते. पण खर सांगू का, तिला पाहून काहीच वाटत नव्हते. काही तरी इच्छा निर्माण व्हायला हवी ना!

रात्री आईसोबत या विषयावर बोललो. ...

मजेदार भाषांतर बुधवार, २३ जून २०१०, १५:१३ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

शुद्ध मराठी खूप मजेदार आहे. विशेषतः ज्यावेळी आपण भाषांतर करतो. म्हणजे ‘बिल गेट्स’चे मराठीत ‘शुल्क पत्रकाचे दार’, जॉर्ज बुश चे मराठीत भाषांतर ‘झाडी हवाबाज’, बराक हूसेन ओबामा चे भाषांतर ‘धन्य एक सुंदर तुला’, ‘इंडिया’चे भाषांतर ‘पाण्याचे शरीर’, ‘टाईम्स ऑफ इंडिया’चे मराठीत ‘भारताची वेळ’ होईल . असे अनेक मजेदार प्रकार आपण रोजच्या जीवनात वापरतो.

उदाहरणार्थ दात घासायला ‘ब्रश’ ...

आला आला वारा.. गुरुवार, ०३ जून २०१०, ०२:४८ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

दोन दिवस असा पुण्यात पाऊस पडला की काय सांगावे. कधी आला आणि किती वेळ पडला हे देखील कळले नाही. पण त्या टी-ट्वेंटी२० पेक्षा अधिक जास्त धुमाकूळ घालून गेला. काल सकाळी कंपनीत बसमधून जातांना सहजच रस्त्यांच्या बाजूला असलेले जाहिरातींचे मोठ मोठे फ्लेक्स बोर्ड पहिले तर फाटलेले. काही काही तर तुटून पडलेले. हिंजवडी, बालेवाडी, चिंचवड, शिवाजीनगर, चतुश्रुंगी, पिंपरी, निगडी, पुणे स्टेशन आणि ...

आंधळे आणि पांगळे शुक्रवार, २१ मे २०१०, ०१:१७ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

एका गावात दोन मित्र रहात असतात. एकाचे आडनाव आंधळे. आणि दुसऱ्याचे आडनाव पांगळे. आंधळे शाळेत हुशार असतो, तर पांगळेला अभ्यासात बिलकुल रसच नसतो. दिवसभर मारामाऱ्या आणि भांडणात त्याचा दिवस जात असतो. अस असून देखील दोघांची दोस्ती पक्की. हळहळू दोघेही मोठे होतात. आंधळे वकिलीचे शिक्षणासाठी मोठ्या शहरात निघून जातो. पांगळे राजकारणात पडतो. इकडे आंधळे शिक्षण पूर्ण करून वकील बनतो. तर तिकडे ...

कुटुंब बुधवार, ०५ मे २०१०, ०१:१९ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

हुश्श !!! काय पटापटा दिवस जात आहेत. मागील महिन्यात सुट्टीला माझे कोकणातील आणि येथील भाऊ बहिण आले आहेत. मज्जाच मज्जा चालू आहे. त्यामुळे वेळच मिळत नाही आहे. मागील आठवड्यात माझे वडील आणि माझा बंधुराज येऊन काल पुन्हा गावी गेले. काय बोलाव आणि काय नाही अस झालं आहे. स्वर्गच उतरलं की काय असा भास होतो आहे. सगळे ‘मिनी आठल्ये’ घरी आहे. असो, मागील काही दिवसात खूप काही घडल. रोज अशा घटना घडल्या की ...

विंडोजच्या आईचा घो बुधवार, २४ मार्च २०१०, ०१:१८ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

आई कोणाला नाही माहित? बाबा विंडोज आणि आई हे तर सगळ्यांनाच माहिती आहेत. संगणक नावाच्या घरात दोघेही सुखाने राहतात. दोघांचा ‘बग’ नावाचा लाडका मुलगा. असा ‘आम्ही दोघे आमचा एक’ संसार. कुठल्या संगणक घरात राहत नाहीत ते सांगा. तिघे मिळून घरमालकाचे चांगलेच ‘वेलकम’ करीत असतात. जगातील सर्वात मोठ्या ‘मायक्रोसॉफ्ट’ बिल्डरच्या इमारतीत राहणारे कुटुंब. बाबा विंडोज रोज आपल काम फारच संथ गतीने ...

राशी आणि स्वभाव सोमवार, २२ मार्च २०१०, ०१:४८ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

माणसावरून राशी स्वभाव की राशीवरून माणसाचा स्वभाव हा प्रश्न असा आहे, की अंडे आधी की कोंबडी. माझा एक मित्र आहे. सध्याला नगरला असतो. आम्ही नगरला असतांना सोबत संगणकाचा कोर्स केला होता. तेव्हापासून त्याला पाहतो आहे. त्याचा स्वभाव अगदीच रुष्ट. म्हणजे एकदा काय झालं, क्लासमध्ये तो एका स्टुलावर बसून संगणकावर काम करत होता. आमच्या शिक्षिकेने त्याला बघून म्हणाल्या की खुर्ची घेऊन बस. तीन ...

अपघात मंगळवार, ०९ मार्च २०१०, २३:३७ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

आज रात्री कंपनीच्या बसने घरी येताना डांगे चौकात एक लहान टेम्पो चौकातील मधोमध असलेल्या खड्यात गेलेला दिसला. आता तो काही एवढा मोठा नव्हता. पण टेम्पो पूर्ण वाकडा झालेला बघितला. तिथून पुढे बस चिंचवडच्या जुन्या नाक्यावर थांबली. तिथ सुद्धा लोकांचा घोळका. म्हटलं आता काय झाल तर एका कारवाल्याची आणि दुचाकीवाल्याची भांडणे. सध्याला चाफेकर चौकापासून ते जुना नाक्या पर्यंत पुलाचे काम ...

महिला आरक्षण सोमवार, ०८ मार्च २०१०, ०२:२३ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

घरी येतांना अनेक ठिकाणी ‘महिला दिनाचे’ फ्लेक्स बघितले. चिंचवडमध्ये महिलांनी बनवलेल्या वस्तूंची ‘प्रदर्शन व विक्री’ सुरु आहे. हे राजकारणी ना कशाचा स्वतःसाठी कुठेही वापर करून घेतील. सगळीकडे ‘महिला दिनाच्या शुभेच्छा’च्या नावाखाली स्वतःचे हसमुख फोटो लावले आहेत. काल मी शिवाजीनगरला मित्रांना भेटायला बस मधून जाताना लेडीज सीटवर बसून प्रवास केला. बऱ्याच दिवसांनी असा लेडीज सीट ...