देवनागरी
Roman
Press F12 to toggle

ललित लेख

जनरेशन गॅप आणि संस्कृती की काय म्हणतात ... सोमवार, ३० जानेवारी २०१२, १८:०४ (+०५:३०)

"ऐसी अक्षरे मेळविन ! "

“आजकाल सगळंच उलटं-सुलटं झालय. सगळे संदर्भ बदलले आहेत. आमच्यासारख्यांनी हरी-हरी करत शांत बसावं हेच खरं!” देशपांड्यांनी आपला नेहमीचा डायलॉग टाकला आणि सगळा कट्टा एकमेकाकडे पाहात डोळे ...

दासी मंथरेमधला विकल्प मंगळवार, २४ जानेवारी २०१२, १४:४९ (+०५:३०)

जीवनाच्या रगाड्यातून

दासी मंथरेमधला विकल्प

 

                     रामायण अप्रतीम कथानक आहे. आजतागायत ते अजरामर होऊन राहीले. काव्य असो वा इतिहास. प्रसंगाची गोडी केवळ अविट आहे. घडणाऱ्या घटनामध्यें दैवी चमत्कार ह्या बाबींचा शिरकाव करुन मनोरंजनाची सिमा खूप ऊंचावली गेली. कदाचित् आजच्या अधुनिक विज्ञान युगांत असल्या प्रसंगाना सत्याच्या मोजमापात मान्यता मिळणे कठीण आहे. परंतु जेव्हां ...

चतुर दूरदर्शी राजकारणी कैकयी रविवार, ०८ जानेवारी २०१२, १२:३० (+०५:३०)

जीवनाच्या रगाड्यातून

चतुर दूरदर्शी राजकारणी कैकयी

रामायण वाचताना वा ऐकताना, रामाबद्दल आदर, प्रेम भाव  निर्माण होतो. त्याच वेळी    त्याच्या सावत्र आई कैकयी विषयी अनादर व राग मनांत उत्पन्न होतो. अर्थात ह्या दोन्ही भावनिक बाबी आहेत. हा ज्याचा त्याचा वैयक्तीक समजण्याचा भाग आहे. आपण ह्याच्या विश्लेशनाच्या मागे सतर्कतेने जात नसतो.

आगदी बाल वयांतच रामायणातील कथा आपणास सांगितल्या गेल्या. ...

शांतता ( Silence ) गुरुवार, ०५ जानेवारी २०१२, १६:५१ (+०५:३०)

जीवनाच्या रगाड्यातून

शांतता ( Silence )

शांतता हा ईश्वरी गुणधर्म आहे. ईश्वरी देण आहे. जसे चैत्यन्य तशीच शांतता. ही मुळ शक्ती समजली जाते. प्रथम निर्माण झाली ती शांतता. नंतर आला तो आवाज (Sound). ह्याचा अर्थ आवाजाच्या निर्मीतीआधी शांतता होती. आवाजाच्या वा ध्वनीच्या नष्ट होण्यानंतर असेल ती पून्हा शांतता. दोन आवाजामधली विश्रांती भरुन काढते ती शांतता. आवाज ऐकण्यासाठी देखील हवी असते शांतता. ...

जन्म-मृत्युचे चक्र. शनिवार, ३१ डिसेंबर २०११, ११:२५ (+०५:३०)

जीवनाच्या रगाड्यातून

जन्म-मृत्युचे चक्र.

खेळाच्या एका मैदानावर कोपऱ्यात बसलो होतो. समोर काहीं मुलांचे खेळ चालू होते. ते बघण्यात मी स्वतःची करमणूक करीत होतो. अचानक माझे लक्ष्य शेजारी गेले. बऱ्याच मुंग्यांची तेथे जा ये चालू होती. कदाचित् जवळपास कांहीतरी त्यांचे खाद्य पदार्थ पडलेले असतील. म्हणून ती मुंग्यांची वर्दळ असावी.

माझ्या विचारांना एकदम खंड पडली, ती एका मुंगीने माझ्या ...

जीवन रंगभूमिवरील यशस्वी कलाकार . शनिवार, ०३ डिसेंबर २०११, १२:३३ (+०५:३०)

जीवनाच्या रगाड्यातून

जीवन रंगभूमिवरील यशस्वी कलाकार .

              वसंता माझा बालमित्र! शाळकरी जीवनांतला. कॉलेज मध्येही एकत्र होतो. दोघेही वैद्यकीय महाविद्यालयांत मिळून शिकलो. आज दोघेही ज्येष्ठ नागरिक म्हणून सत्तरी ओलांडलेले. तो त्याच्या गांवी  मराठवाड्यांत स्थायीक झाला. तर मी शासकिय नोकरीत राहून अनेक गावांचे पाणी चाखू लागलो.

मी त्याच्या गांवी अनेक वेळा गेलो होतो. मात्र गेल्या २५ ...

जीव ( प्राण-आत्मा ) गुरुवार, २४ नोव्हेंबर २०११, १२:५३ (+०५:३०)

जीवनाच्या रगाड्यातून

जीव ( प्राण-आत्मा )

 

वैद्यकीय शास्त्राचा अभ्यास करीत असताना, प्राथमिक ज्ञान मिळाले. शरीरशास्त्राविषयी , निरनीराळे भाग व त्यांची मुळ रचना, ट्यिश्युचा समुह, त्यांच्या सुक्ष्म अशा सेल्स भागाची योजना जाणली. प्रत्येक आवयव व शेवटी सर्व देह सांघिक मदतीने आपआपले कार्य पूर्ण करीतो. त्याची वाढ कशी होते हे कळले. निसर्गाची एक अप्रतिम योजकता ह्या ...

मला समजलेले कर्मफळ शुक्रवार, ११ नोव्हेंबर २०११, ११:५७ (+०५:३०)

जीवनाच्या रगाड्यातून

 मला समजलेले कर्मफळ

 

प्रत्येक व्यक्तीला जीवनाच्या चक्रामध्ये सतत कोणते ना कोणते काम करावेच लागते. त्याची प्रत्येक हालचाल हे छोटेसे कर्म बनत जाते. प्रत्येक क्षण हा कर्माने बांधलेला असतो. कर्माववर सभोवताल, परिस्थिती आणि व्यक्तीच्या चेतना ह्याचा परिणाम होत असतो.  व्यक्तीचे अंतरंग व बाह्यांग प्रत्येक कर्माचे परिणाम ठरवतात. ते चांगले वा ...

वर्तमान काळांत जगा. गुरुवार, ०३ नोव्हेंबर २०११, ११:२८ (+०५:३०)

जीवनाच्या रगाड्यातून

वर्तमान काळांत जगा.

काळाला तीन भागांत विभागले जाते. भविष्य, भूत आणि वर्तमान काळ. भविष्य काळ अर्थात येणारा भावी काळ आणि भूत काळ गेलेला अर्थात मागचा काळ. दोन्ही काळाच्या मध्यभागी येणाऱ्या व जाणाऱ्या सिमा रेषेवर ज्याचे अस्तित्व मानले गेले तो वर्तमानकाळ. त्यामुळे वर्तमानकाळाचे मोजमाप किती वेळेचा तो काळ ह्याचे परीमाण ठरवीणेकेवळ शक्य नाही. येणारा काळ जो ...

नदीच्या पाण्यातील ओंडके. सोमवार, ३१ ऑक्टोबर २०११, १०:२५ (+०५:३०)

जीवनाच्या रगाड्यातून

नदीच्या पाण्यातील ओंडके.

अमेरीकेला कांही महीने राहण्याचा योग आला होता. मुलाकडे गेलो होतो. छोटेसे, सुंदर आणि अद्यावत शहर. नदीच्या तीरावर वसलेले सर्वत्र नैसर्गिक सौंदर्य. फक्त एकच खंत जाणवत होती. ती म्हणजे मन मोकळे करुन गप्पा मारण्यासाठी कुणी मित्र नव्हते. येथील लोक त्यांच्या आपसांत देखील गप्पा मारताना दिसत नव्हते. बागेत एकटे वा एखादा लहानसा कुत्रा बाळगणे. ...