पावसाळ्याचा दिवस असतो. एक ओला गारवा जाणवत असतो. थंडगार वारेही सुटलेले असतात. अशावेळी तुम्हाला कसली आठवण येत असेल ते मला माहीत नाही. मला मात्र अशा वेळी आठवण येते मस्तपैकी आले घालून उकळलेल्या चहाची. तो गरम गरम घसा भाजत जाणारा चहा प्यायला की थंडी, वारे, गारवा सगळे पळूनच जाते. हा चहा घरीच प्यायला पाहिजे असे काही नाही. रस्त्याच्या कडेला असलेल्या एखाद्या टपरीत मिळणारा ...