देवनागरी
Roman
Press F12 to toggle

Pollution

पायाखालचे पाणी शनिवार, १३ मार्च २०१०, १६:२६ (+०५:३०)

chandrashekhara अक्षरधूळ

1990च्या दशकात झालेल्या हरित क्रांतीमुळे भारत अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला असे म्हटले तरी ते फारसे वावगे ठरू नये. या वाढीव कृषी उत्पादनामधे, उत्तर हिंदुस्थानातील राजधानी दिल्ली जवळचा भाग, पंजाब, राजस्थान व हरियाणा या राज्यातील शेतकर्‍यांचा खूपच मोठा वाटा आहे. अंदाजे 4,38,000 वर्ग किलोमीटर आकाराच्या या भूभागाला, सिंधु नदीचा पठारी प्रदेश अशी भौगोलिक संज्ञा आहे. या भागातील ...

सायकलच पण बांबू व अंबाडीची! शनिवार, ०९ जानेवारी २०१०, १५:५३ (+०५:३०)

chandrashekhara अक्षरधूळ

क्रेग कॅल्फी हा अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यात रहाणारा एक इंजिनीअर. शर्यतीत भाग घेण्यासाठी ज्या खास सायकली वापरल्या जातात त्या बनवणारा तो एक कुशल तज्ञ आहे. कार्बन फायबर व अल्युमिनियम वापरून बनवलेल्या त्याच्या सायकली, Tour de France सारख्या जगप्रसिद्ध सायकल रेसमधे वापरल्या गेलेल्या आहेत. प्रशांत महासागराच्या किनार्‍यावरच कॅलिफोर्नियामधे या क्रेग कॅल्फीचे स्वत:चे ...

पिवळे प्रदुषण बुधवार, ०६ जानेवारी २०१०, १८:१४ (+०५:३०)

chandrashekhar चायना डेस्क (Ch...

पीत नदी (Yellow River) ही चीनमधली दुसर्‍या क्रमांकाची सर्वात लांबवर वहात जाणारी नदी आहे. तिबेटच्या उत्तरेला असलेल्या चिंघाई प्रांतातल्या बायेनहार पर्वतात ती उगम पावते व 5464 किलोमीटरचा पूर्व दिशेला प्रवास करून समुद्राला मिळते.

या नदीचे खोरे 7,45000 वर्ग किलोमीटरचे असून या खोर्‍यात अंदाजे 12 कोटी लोक रहातात. या सगळ्या वर्णनावरून, ही नदी चीनच्या दृष्टीने किती ...

एक आगळी वेगळी युनिव्हर्सिटी रविवार, २० डिसेंबर २००९, १३:०७ (+०५:३०)

chandrashekhara अक्षरधूळ

2007 सालचा नोबल शांतता पुरस्कार, संयुक्त राष्ट्र संघटनेच्या, पृथ्वीवरील हवामान बदलाच्या संबंधित, एका आंतर्राष्ट्रीय पॅनेलला दिला गेला होता. हा पुरस्कार, या पॅनेलच्या वतीने, अमेरिकेचे माजी उपराष्ट्रपती अल-गोअर आणि एक प्रसिद्ध भारतीय संशोधक श्री. राजेंद्र के. पचौरी या दोघांनी स्वीकारला होता . श्री. पचौरी हे हवामान बदल, भू ताप वृद्धी, पर्यावरण, प्रदूषण आणि उर्जा बचत या ...

जय गंगे भागिरथी ! गुरुवार, २६ नोव्हेंबर २००९, ०८:१३ (+०५:३०)

chandrashekhara अक्षरधूळ

गंगा नदीला भारतीय संस्कृतीमधे अनन्यसाधारण महत्व आहे. गंगाजल हे अतिशय पवित्र मानले जाते. माणसाच्या अखेरच्या क्षणी, त्याच्या मुखामधे गंगाजलाचे थेंब टाकण्याची प्रथा आहे. गंगेमधे स्नान करण्याने माणसाची सर्व पापे धुवून निघतात असे म्हणतात. उत्तर भारतातील लोक तर गंगेला, गंगामैय्या म्हणजे आईच मानतात. कदाचित युगानुयुगे सर्वांची पापे धूत असताना, गंगामैय्याने बहुदा ती ...

पुढे काय? नॅनो का रेवा मंगळवार, २५ ऑगस्ट २००९, ०७:२५ (+०५:३०)

chandrashekhara अक्षरधूळ

भारतातल्या कोणालाही, जर सध्याची भारतातली सर्वात हॉट किंवा प्रसिद्धीच्या झोतात असलेली मोटर कार कोणती? असा प्रश्न विचारला तर हजारापैकी नउशे नव्याण्ण्व लोक अर्थातच नॅनो असे उत्तर देतील. य़ाला अर्थातच मुख्यत: नॅनोची किंमत हे कारण आहेच. या शिवाय नॅनो, दिसायलाही मोठी छान आहे आणि तंत्रज्ञान वगैरे एकदम लेटेस्ट आहे,  ही कारणे आहेतच. हे सगळे जरी खरे असले तरी शेवटी, नॅनो एक ...

रासायनिक कारंजी शनिवार, ०१ ऑगस्ट २००९, १२:५८ (+०५:३०)

chandrashekhara अक्षरधूळ

पश्चिम महाराष्ट्रातल्या सोलापूर जिल्ह्यातल्या उजनी या गावाजवळ, भीमा नदीवरचे एक अतिशय मोठे धरण आहे. उजनी धरण या नावाने ओळखल्या जाणार्‍या या धरणाची पाणी साठविण्याची क्षमता 1517 गिगालिटर्स (GigaLitres) एवढी प्रचंड आहे. क्षमतेच्या बाबतीतला या धरणाचा क्रमांक कोयना व जायकवाडी यांच्यानंतर तिसरा लागतो. या धरणात पोचणारे पाणी थेट पुण्याच्या मुळामुठा सारख्या अनेक नद्यांमधून येत ...

नंदनवनातील भूलोक शुक्रवार, ३१ जुलै २००९, १३:५५ (+०५:३०)

chandrashekhara अक्षरधूळ

चाळीस एक वर्षांपूर्वी, विद्यार्थीदशेत असताना, मी दोन तीन महिने, श्रीनगरमधे काही प्रशिक्षणासाठी तीन सहाध्यायींबरोबर रहात होतो. या काळात, श्रीनगर आणि काश्मिर खोर्‍यात मनमुराद भटकण्याची मिळालेली कोणतीही संधी आम्ही सोडत नसू. त्या काळात श्रीनगर खूप गजबजलेले नव्हते आणि मुख्य म्हणजे अतिरेक्यांची किंवा बॉम्बस्फोटांची वगैरे कसलीही भिती तेंव्हा नव्हती. मनात आले आणि ...

रोग चालेल पण औषध नको शुक्रवार, २४ जुलै २००९, १२:१९ (+०५:३०)

chandrashekhara अक्षरधूळ

दुपारी एकच्या सुमारास मी जेंव्हा रोज घरी येतो तेंव्हा घराच्या कोपर्‍यावर एक भंगारवाला त्याच्या हातगाडीसह मला दिसतो. या भंगारवाल्याच्या गाडीवर रिकाम्या बाटल्या, डबे यासारखे काहीच कधी दिसत नाही. त्याच्या हातगाडीवर असतात जुने संगणक, जुने कॅथोड रे ट्युबवाले मॉनिटर, टीव्ही आणि मोडके प्रिन्टर. रोज एवढे संगणक त्याच्याकडे येतात तरी कसे? असे कुतुहुल मला नेहमीच वाटत आले ...