देवनागरी
Roman
Press F12 to toggle

अवर्गीकृत

माणुसकी शनिवार, १० सप्टेंबर २०११, ११:२६ (+०५:३०)

नॅकोबा मुक्ताफळे

शाळेत असताना मूल्यशिक्षण नावाचा एक विषय होता. ग्रेड वाला विषय, त्यामुळे महत्व जवळजवळ शून्यच. एक कोणतीतरी वही काहीतरी खरडून भरायची की किमान ‘बी’ नक्की. अक्षर बरं असेल तर ए वगैरे. अशा या विषयात माणुसकी वगैरे काहीतरी शिकल्याचं पुसट पुसट आठवतंय. भूतदया जरा जास्त लक्षात आहे. प्राणिमात्रांवर दया वगैरे. त्यात जे शिकलो ते असं काहीसं होतं:

कृती: पप्पूने कुत्र्याला दगड मारला.
अर्थ: ...

माईनक्राफ्ट रविवार, २९ मे २०११, १४:५८ (+०५:३०)

नॅकोबा मुक्ताफळे

माईनक्राफ्ट. एक गोंडस गेम.

असा असतो :

बरेच दिवस यावर लिहावं असं मनात ...

कप मंगळवार, १७ मे २०११, ११:५८ (+०५:३०)

नॅकोबा मुक्ताफळे

काल माझा एक कप फुटला. खळ्ळ् असा. त्या आधी ब्ळ्यबॅक ब्ळ्यबॅक असा एक पानचट आवाज झाला. कपात चहा होता. जर कोणी अज्ञात इसम माझ्यावर पाळत ठेवून माझ्या कारवायांकडे बारकाईनं लक्ष देत असता तर  ब्ळ्यबॅक ब्ळ्यबॅक आणि खळ्ळ यांच्या काहीसं मध्ये ऐ च्ची ** असंही काहीसं त्याला ऐकू आलं असतं. पण तसं कोणी पाळत ठेवून नव्हतं. किंवा असलंच तरी त्यानं मला सांगितलं नव्हतं.

असा मी रविवार सकाळचा रम्य ...

इंद्रधनू मंगळवार, १९ एप्रिल २०११, ०९:२३ (+०५:३०)

नॅकोबा मुक्ताफळे

दूर नभाच्या त्या क्षितिजावर

इंद्रधनूचा अलगद वावर

 

ढगाळ संध्याकाळ

इंद्रधनुष्य

तेच इंद्रधनुष्य

पुन्हा एकदा

 

संध्याकाळी घरी आलो, पाहतो तर काय?
समोरच्या इमारतीच्या छतामागून चक्क इंद्रधनुष्य डोकावत होतं.

शिर्षकच एवढं मोठ्ठं द्यायचं की वाचूनच ल... शुक्रवार, १५ एप्रिल २०११, ०८:५१ (+०५:३०)

नॅकोबा मुक्ताफळे

हे म्हणजे असं झालं की पोटभर जेवायचं अन् म्हणायचं की आता मस्तपैकी लंचला जावं कुठेतरी. आता तुम्हाला वाटेल की हुश्श बुवा संपलं एकदाचं शीर्षक. आता पोष्ट. एकदा वाचून झाली की आपण सुटलो. वगैरे. पण तसं नसतं. ब्यादेचं नाव कळलं तरी ब्याद काही जात नाही. ब्याद ही ब्याद असते. अन् तिला यमक जुळवायचंच म्हणून ही ओळ बाद असते. आता बाद चा विषय निघालाच आहे म्हणून सांगावसं वाटतं की सद्यस्थितीत डोकं हा ...

अदृश्य गुरुवार, २४ मार्च २०११, ०७:०७ (+०५:३०)

नॅकोबा मुक्ताफळे

आज संध्याकाळी घरी आलो तोच अत्यंत दम्याभाग्या अवस्थेत. खरं तर मला दमल्याभागल्या म्हणायचं होतं. पण दमल्याभागल्या हा शब्द जरा मोठा वाटतो. श्रांतक्लांत हा जरा वेगळा शब्द पण मी यापूर्वी तो भलत्याभलत्या संदर्भांसहित वाचलाय त्यामुळे तो वापरताना जरा दडपणच येतं… तरी सांगायचा मुद्दा असा की गेले काही दिवस (आठवडे) कामाची बेक्कार शाळा चालू आहे. म्हणजे भरपूर काम आहे. खूप भरपूर. म्हणजे ...

डास, ढेकूण आणि राजकारणी सोमवार, २८ फेब्रुवारी २०११, ०८:३० (+०५:३०)

नॅकोबा मुक्ताफळे

इस कहानी के सभी पात्र और घटनाऐं (और कीटक) काल्पनिक है.
अगर इस कहानी की किसी जिवित अथवा मृत व्यक्ती या घटना (या कीटक) से समानता होती है
तो इसे मात्र ऐक संयोग कहा जाएगा.

 

वगैरे.

 

एकदा एक आटपाट नगर असतं.

त्यात भरपूर डास आणि ढेकूण असतात.

गाढ झोपेत असलेल्यांचं शोषण करणं आणि पोट भरणं ह्यावरच त्यांची गुजराण चालू असते.

एक दिवस अचानक काहीतरी बिनसतं अन् डास आणि ...

कैच्याकैच्याकैच्याकैकैकैकैकैकैकै(प्रतिध... बुधवार, २३ फेब्रुवारी २०११, ०९:३१ (+०५:३०)

नॅकोबा मुक्ताफळे

ससा गेला बोका आला
पेरूच्या बागेत अस्वल धीट
सोडावॉटर भरल्या गोणीत
बनपाव चारी मुंड्या चीत

स्पष्ट विहिरीला काचेचं दार
दाताखाली भरल्ये अवजड बाग
रहस्याच्या मताला उडवली दोरी
रबराच्या शेजारी खारूताई ...

ब्रेक के बाद सोमवार, ०७ फेब्रुवारी २०११, ०८:५५ (+०५:३०)

नॅकोबा मुक्ताफळे

बऱ्याच दिवसांनी पुन्हा एक पोष्ट. दरम्यानच्या काळात मनुष्य (म्हणजे मी) वर्ल्ड ऑफ वॉरक्राफ्टमधे तल्लीन झाला होता (होतो.) गेमिंग… व्यसन…. वाईट…..

आज दुपारी सुपरबोल नावाचा अमेरिकन प्रकार बघत बसलो होतो. अमेरिकन फुटबॉल डोक्यावरून जातो. तो समजून घेण्याचे मेंदूचे जे काही थोडेफार प्रयत्न चालले होते ते चहा आणि ...

दुधाळ वगैरे चांदिणं !!! बुधवार, १९ जानेवारी २०११, ०८:४६ (+०५:३०)

नॅकोबा मुक्ताफळे

ऑफिसातून निघालो तेव्हा सूर्य दिवसाचं काम आटपतं घेत होता. साधारण साडेसहाची वेळ. संध्याकाळच्या गारव्यात सायकलवर निवांत तरंगत घरी पोहोचलो. बाहेरच्या खोलीत सभोवार अंथरलेल्या मउ चटईवर शुभ्र प्रकाशाचा एक पट्टा पसरला होता.
आतले सगळे दिवे बंद होते केवळ सरकत्या दरवाज्याचा पडदा अर्धवट सरकवलेला.
थोडा दरवाज्याजवळ गेलो. प्रकाश कुठून येतोय ते बघायला…
संध्याकाळी साडेसहा वाजता ...