पंधरा वीस दिवसांपूर्वी, घाना देशातला एक सतर्क नागरिक, तिथल्या अन्नपदार्थ आणि औषधे नियंत्रकाच्या (Ghana Foods and Drug Board(FDB)) ऑफिसमधे त्याला शंकास्पद वाटणार्या एका औषधाच्या काही गोळ्या घेऊन गेला. प्रथमदर्शी या गोळ्या, नोव्हार्टिस(Novartis) या कंपनीने बनवलेल्या कोऍर्टेम (Coartem) या औषधाच्या दिसत होत्या. मलेरियावर हे औषध अत्यंत प्रभावी मानले जाते आणि विकसनशील देशांत याचा खूप वापर होतो. ...