“मी आत्ताची नोकरी सोडू का ?”, एका विकएन्डला ‘तो’ भेटला असता मी प्रश्न विचारला, त्यावेळी माझा पहिला जॉब सुरू होऊन जेमतेम दिड वर्ष झालं असेल.
“चल थोडं फिरून येऊया”, अस म्हणत स्वारी निघाली.
त्या जुन्या वाड्यांच्या मधोमध असलेल्या सडकेवरून जाताना एका कोपऱ्यावर लॉन्ड्रीपाशी ‘तो’ थांबला, हातातले कपडे इस्त्रीसाठी देऊन एकच प्रश्न विचारला :
“काका, आपली दुकानची पूजा कधी ...