2011 सालच्या सुरुवातीस टीव्ही माध्यमांनी जेंव्हा Antrix-Devas घोटाळ्याच्या बातम्या प्रसृत केल्या त्या वेळी केंद्रीय सरकार, 2जी घोटाळा आणि राष्ट्रकुल खेळ घोटाळा यांमुळे प्रचंड दबावाखाली आले होते. कदाचित त्यामुळे केंद्र सरकारने त्वरित पावले उचलली व 16 फेब्रुवारी रोजी, Antrix-Devas करारच रद्दबातल करून टाकला.या नंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी दोन गट स्थापन करण्यात आले. यापैकी पहिला गट ...