दीपक रहेजा आणि श्यामसुंदर अगरवाल हे दोन भारतीय तरूण, येमेनी मालक असलेल्या एका व्यवसायात कामाला होते. चीनमधील झेजियांग प्रांतातल्या यिवु शहरात असलेल्या ऑफिसमधे हे दोघे काम करत असत. चिनी माल खरेदी करून तो निर्यात करायचा असे साधारण यांच्या व्यापाराचे स्वरूप होते. हे दोघे काम करत असलेल्या फर्मची, स्थानिक लोकल व्यापार्यांना असलेली देणी बरीच वाढली होती व त्या बाबतीत ...