देवनागरी
Roman
Press F12 to toggle

दैनंदिनी

पाऊसप्रवासी : दैनंदिनी २७ जुलै २०१० मंगळवार, २७ जुलै २०१०, १४:५० (+०५:३०)

nileshsakpal तेजोमय

कधीतरी पावसात भिजवून मन रमवणारे पाऊसवेडे चातक बरेच आहेत… अगदी रोजच्या घडीला कितीतरी वेळा हे असे पाऊसप्रवासी नजरेसमोर मुसळधार पावसामध्ये विरघळताना दिसत असतात… कुणी आपल्या संसाराच्या गाठोड्याला खांद्यावरून त्याची होडी करुन पाण्यामध्ये सोडून देतो तर कुणी उद्या काय होणार या सामान्य प्रश्नाला कवटाळून पावसामध्ये आपले चिंतांचे कापसी ओझे भिजवून रस्त्यावरून सरपटताना दिसतो… ...

मीच का? बुधवार, ०९ जून २०१०, १६:२४ (+०५:३०)

भुंगा ...भुंगा!
  • एका भिकार कंपनीचे शेअर्स घेण्यासाठी वारंवार मेसेजेस येताहेत. मेसेज तोच... मात्र दर वेळी नविन नावानं...न थकता.... मला वाटतं हा उगाचच पैसे वाया घालवतोय.. त्या कंपनीचे शेअर्स कुणी घेत नाही आणि हा असे मेसेज वर पैसे उधळतोय... कंपनी गाशा गुंडाळणार दसतयं?
  • "वर्क फ्रॉम होम" वाल्यांचे मेसेजेस - अहो इथं घरीच्यांसाठी वेळ नाही आणि त्यातही घरुन काम म्हणे! - अरे मेड्म... नही होना... बिल्कुल नही ...

हिवाळा मंगळवार, १६ फेब्रुवारी २०१०, ००:३० (+०५:३०)

eksakhee एक सखी

यंदाचा हिवाळा अतिशय कडक आहे असे जाणवते आहे. ज्या राज्यांमध्ये गेले कित्येक वर्षे बर्फ पडला नाही तेथे यंदा बर्फ पडला आहे. अमेरिकेत अनेक ठिकाणी ...

प्रगती : दैनंदिनी –१६, १७, १८, १९ आणि २... बुधवार, २१ ऑक्टोबर २००९, १५:१५ (+०५:३०)

nileshsakpal तेजोमय

नेहमी प्रश्न पडतो की भारताची प्रगती ही सामान्य माणसांपर्यंत का पोहचत नाही? या प्रश्नाचे कंगोरे खूपच विस्तृत आहेत.. अन आपल्यापैकी बर्‍याचजणांना त्याची कल्पनाही असेलच… माझ्यामते सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा की भारताची प्रगती होतेय असे म्हणण्यापेक्षा Indiaची प्रगती होत आहे असे जास्त उचित अन योग्य ठरेल.. हे सगळ्यांना मान्य आहे.. अन कदाचित यातच आपल्या प्रश्नाचे उत्तरही ...

अनिश्चितता –दैनंदिनी –१५ ऑक्टोबर २००९ शुक्रवार, १६ ऑक्टोबर २००९, २०:५५ (+०५:३०)

nileshsakpal तेजोमय

अनिश्चितता कुणाला हवी असते? कदाचित ती कुणाच्याच अखत्यारित नसते अन म्हणूनच सगळ्यांच्या वाट्याला कोणत्या ना कोणत्या स्वरुपात तिचा भाग येत असतो… बर्‍याचदा शक्यतांच्या वेगवेगळ्या हिंदोळ्यावर येणारी चाहुल गटांगळ्या खात असते… जर सुखाची चमचम चांदणी असेल तर मनाला बागडायला नभाचे रान अपुरे पडते तेच जर एखाद्या अशुभ घटनेची किणकिण असेल तर मात्र एका टिंबात सारे विश्व ...

आई: दैनंदिनी –१४ ऑक्टोबर २००९‏ गुरुवार, १५ ऑक्टोबर २००९, १६:४९ (+०५:३०)

nileshsakpal तेजोमय

आईची आठवण आल्यानंतर कोणी हळवे होणार नाही असे क्वचितच घडेल.. कोणत्याही पत्थरदिल माणासाच्या काळजाला खिंडार पाडू शकेल अशी ती माय-ममता असते…. तिच्या स्पर्शाच्या उबेला काळाचे बंधन नसते.. आजही पापण्यांचे दरवाजे मिटले की तो स्पर्श, ती प्रेमाची उब, तो अनंतकाळासाठी बांधुन ठेवणारा दैवी सुगंध अलगद अंगावर शहारे उठवुन जातो… मनाला बेकल करतो, काळाचे फासे उलटे फिरतात, आठवणींच्या ...

जात(?) –दैनंदिनी –१३ ऑक्टोबर २००९ बुधवार, १४ ऑक्टोबर २००९, १६:५१ (+०५:३०)

nileshsakpal तेजोमय

जातीचे मुख्यत्वे दोनच प्रकार पडतात.. एक म्हणजे ‘जात मानणारे’ व दुसरे ‘जात न मानणारे’! माणसाच्या अहंकारातून जातीचा जन्म होतो… मी माझा अन माझे जेव्हा टोकाला जाते तेव्हा मग हे माझ्यातले अन हे तुमच्यातले अशी सुरुवात होते… या तत्सम गोष्टी करणारे आमचे व या गोष्टी न करणारे वेगळे… सद्य काळात जातींना किती महत्व द्यायचे हे ज्याने त्याने ठरवले पाहिजे… जेव्हा विहीत ...

शक्ती –दैनंदिनी –१२ ऑक्टोबर २००९ मंगळवार, १३ ऑक्टोबर २००९, १५:१० (+०५:३०)

nileshsakpal तेजोमय

आपलंही रक्त उसळतं, उफाळून येतो जोश, त्वेषामध्ये काहीतरी होणार असं वाटत असतं, रागाने लालबुंद असतो आपण, रागाला मोकळी वाट नाही करून दिली तर काहीतरी आकरीत घडणार हे नक्की असतं… मुठी आवळल्या जातात बर्‍याचदा, हात शिवशिवतात कित्येकदा, कितीतरी वेळा दरवाजे एकमेकांवर आदळले जातात, हातातली गोष्ट फेकून दिली जाते, समोरच्याला नाही नाही ते बोलले जाते, सगळ्या यंत्रणेवर डोकं ...

दैनंदिनी –०८, ०९, १० आणि ११ ऑक्टोबर २००... सोमवार, १२ ऑक्टोबर २००९, १६:५१ (+०५:३०)

nileshsakpal तेजोमय

चुकीचा इतिहास नक्की काय करू शकतो? याचे जीवंत उदाहरण म्हणजे आपली सगळ्यांची बदललेली मानसिकता… परस्त्रीबरोबर उघड उघड संबंध ठेवणार्‍या माणसाला आपण ‘चाचा’ म्हणतो, आयुष्यभर ज्या माणसाने दारूचे अन सिगारेटचे व्यसन जोपासले त्याचा जन्मदिवस आपण ‘बालदिन’ म्हणुन साजरा करतो! ज्या माणसाने उघड उघड छत्रपती शिवरायांना ‘दहशतवादी’ म्हंटले त्याच्या नावाने आपण कितीतरी पवित्र ...

दैनंदिनी –०६ आणि ०७ ऑक्टोबर २००९ गुरुवार, ०८ ऑक्टोबर २००९, १६:५४ (+०५:३०)

nileshsakpal तेजोमय

एखाद्या प्रश्नाच्या उत्तरासाठी जर आयुष्य खर्ची करावे लागणार असेल तर? अन तरीही त्या उत्तराची शाश्वती मिळणार नसेल तर? कुणास ठाऊक एखाद्या प्रश्नाचे उत्तर म्हणजे ‘आणखी एक प्रश्न’ असायचा? प्रश्नांमध्ये भरकटणे मला कधीच जमले नाही.. प्रश्नांची सोबत असते, ती नाकारता येत नाही वा तिचे असणे गरजेचेच असते.. या शोधार्थ आयुष्य जगणेही उचित असते… पण कोणता प्रश्न स्वीकारायचा अन ...