गेल्या आठवड्यात दोन मान्यवरांनी आणखी दोघा मान्यवरांना वेड्याच्या इस्पितळाकडे जाण्याचा सल्ला दिला आहे. यापैकी पहिला सल्ला अण्णा हजारे यांनी एका राजकीय पक्षाच्या सुपरिचित पुढार्याला दिला आहे. या पुढार्याची एकूण वक्तव्ये बघता अण्णांचा सल्ला काही फारसा चूक आहे असे म्हणता येणार नाही. मात्र दुसरा असाच एक सल्ला, भारतातल्या एका मोठ्या राज्याच्या मुख्य मंत्र्यांनी दिला ...