देवनागरी
Roman
Press F12 to toggle

History इतिहास

1143 वर्षांपूर्वीचे छापील पुस्तक- वज्र ... गुरुवार, १२ जानेवारी २०१२, ०९:३८ (+०५:३०)

अक्षरधूळ

In the ancient and medieval times, the cultural and commercial interaction between countries like China, Persia and India from Asia and European nations on the Mediterranean sea coast, mainly took place through a 7000 mile long caravan route. Traders, monks and preachers, nomadic tribes and soldiers on campaigns, travelled on this very same caravan route. Even though the caravans carried all kind of goods, bulk of the trade was of the items like silks, musk, perfumes, jewels and decorative glass. Because of this, the caravan route became known as the ‘Silk Route’. This route was in use for at least three millennia. The main silk route started from Xian in Chaina and reached the borders of the Roman empire through Kazakhstan, Iran and Iraq. Another subsidiary or feeder road came to India via Iran and Afghanistan. Number of taverns and water points were built on this route for the convenience of the caravans.
A famous Archaeological explorer of ...

भगवान बुद्धांचे भिक्षा पात्र; Buddha’s ... सोमवार, ०२ जानेवारी २०१२, ०९:३१ (+०५:३०)

अक्षरधूळ

इ.स.1880-81 मध्ये भारतीय पुरातत्व विभागाचे तत्कालीन मुख्य, मेजर जनरल ए. बकिंगहॅम यांनी बिहारच्या उत्तर व दक्षिण भागांचा एक दौरा केला होता. या दौर्‍यात बकिंगहॅम यांनी त्या वेळेस बेसार (Besarh) या नावाने ओळखल्या जाणार्‍या एका गावाला भेट दिली होती. हे गाव म्हणजे प्राचीन भारतीय इतिहासातील प्रसिद्ध असलेले वैशाली नगर आहे हे बकिंगहॅम यांनी लगेच ओळखले होते. वैशाली येथे जरी ...

पानिपत मोहिमेचा खर्च 900 कोटी रुपये; Th... मंगळवार, २७ डिसेंबर २०११, १६:०४ (+०५:३०)

अक्षरधूळ

भारताच्या व मराठ्यांच्या इतिहासाच्या दृष्टीने निर्णायक ठरलेल्या पानिपतच्या लढाईचा एकूण खर्च किती आला असेल असे वाटते? आतापर्यंत, या लढाईत किती शूर वीर मराठ्यांनी गमावले याची माहिती आपण इतिहासात नेहमीच वाचतो. परंतु ही एवढी मोठी व दीर्घ काल चाललेली मोहिम करण्यासाठी पेशवे दरबारला एकूण किती खर्च आला याचा निश्चित आकडा कोणासच माहीत नव्हता.
अहमद शाह अबदाली दिल्लीवर चालून ...

वृक्षकपि आणि मृग नक्षत्र गुरुवार, ०६ ऑक्टोबर २०११, १६:४१ (+०५:३०)

अक्षरधूळ

काही दिवसांपूर्वी श्वान दिन या नावाचे एक ब्लॉगपोस्ट मी प्रसिद्ध केले होते. त्यावेळेस कॅनिस मेजर तारका समूह व मृगशीर्ष नक्षत्र या संबंधी थोडी चर्चा झाली होती. त्या चर्चेत, मी ऋग्वेदात यासंबंधी एक ऋचा असल्याचे म्हटले होते. ही ऋचा 23 श्लोकांची आहे व समजण्यास अतिशय दुर्बोध आहे. त्यामुळे मूळ संस्कृत श्लोकांचा विचार न करता त्याचा अनुवाद फक्त आपण बघूया. या ऋचेत इंद्र, त्याची पत्नी ...

सा रम्या नगरी! सोमवार, २६ सप्टेंबर २०११, ११:०३ (+०५:३०)

अक्षरधूळ

भारतीय द्वीपकल्पात आर्य किंवा वैदिक संस्कृतीचा प्रसार इ.स.पूर्व 1300 पासून सुरू झाला असे आता सर्वसाधारणपणे मानले जाते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या द्वीपकल्पाच्या वायव्येला असलेल्या व हिंदुकुश पर्वतराजींच्या पलीकडच्या बाजूस या वैदिक संस्कृतीची सख्खी बहीण शोभेल अशी एक संस्कृती किंवा एक धर्म याच सुमारास उदयास येत होता. सध्याच्या इराणचा पूर्वेकडचा भाग व अफगाणिस्तानचा ...

एका साम्राज्याच्या शोधात- नाणेघाट –भा... सोमवार, २७ जून २०११, ११:०४ (+०५:३०)

chandrashekhara अक्षरधूळ

वैदिक संस्कृतीचे आधारस्तंभ म्हणून जे ग्रंथ मानले जातात, त्यात वेद, उपनिषद, ब्राह्मणे या बरोबरच, अठरा पुराणांचे स्थानही महत्वाचे समजले जाते. कली युग सुरू झाल्यानंतर, ज्या राजवंशांनी भरत वर्षात राज्य केले, त्या राजवंशातील राजांची नावे, मत्स्य, वायू, ब्रह्मानंद, विष्णू, भगवत, गरूड व भविष्य या पुराणांच्यात दिलेली आढळतात.^7 अर्थात या सर्व पुराणांमध्ये, या बाबत कोणतीही एकवाक्यता ...

ह्युएन त्सांगचा महाराष्ट्र- राजधानीचे श... गुरुवार, १२ मे २०११, १६:१८ (+०५:३०)

chandrashekhara अक्षरधूळ

कोकणपूर मधला मुक्काम आटोपून ह्युएन त्सांग व त्याच्या बरोबरचे सहप्रवासी पुढे वायव्य दिशेला प्रवासाला निघाले. या पुढच्या प्रवासाबद्दल ह्युएन त्सांग लिहितो,

“From this going north-west, we enter a great forest wild, where savage beasts and bands of robbers inflict injury on travellers. Going thus 2400 or 2500 li, we come to the country of Mo-ho-la-ch’a (Maharashtra).”

” या नंतर वायव्येकडे जात असताना आम्ही एका विशाल व मनुष्य वस्तीचे कोणतेही चिन्ह नसलेल्या अरण्यात शिरलो. या अरण्यात फक्त हिंस्त्र ...

ह्युएन त्सांगचा महाराष्ट्र –कोंकणपूर- भ... रविवार, ०८ मे २०११, १७:१९ (+०५:३०)

chandrashekhara अक्षरधूळ

द्रविड देशातील कांचीपुरम येथून निघालेल्या ह्युएन त्सांगने परतीच्या प्रवासासाठी उत्तर दिशेला प्रयाण केले व आपला पुढचा मुक्काम कोंकणपुर या गावात केला हे आपण आधीच्या भागात बघितले. या प्रवासाबद्दल ह्युएन त्सांगने स्वत: काय लिहून ठेवले आहे ते आपण प्रथम पाहूया.

“Leaving the country of Ta-lo-pi-ch’a (Dravida) and travelling northwards, we enter a forest wild, in which are a succession of deserted towns, or rather little villages.

Brigands, in concert together, wound and capture (or delay) travellers. After going 2000 li or so we come to ...

ह्युएन त्सांगचा महाराष्ट्र –माहिती थोडी... शुक्रवार, ०६ मे २०११, १४:५४ (+०५:३०)

chandrashekhara अक्षरधूळ

ह्युएन त्सांग ( शुएनझांग XuenZang ) या प्रसिद्ध चिनी भिख्खूने इ.स. 629 ते इ.स. 645 या कालामध्ये चीन पासून सुरूवात करून दक्षिण भारतापर्यंत व तेथून परतीचा केलेला खुष्कीच्या मार्गाने प्रवास व त्या प्रवासाचे त्याने लिहून ठेवलेले प्रवासवर्णन हे सर्वश्रुत आहे. आपला परतीचा प्रवास त्याने तमिळनाडू मधील कांचीपुरम पासून सुरू केला होता. कांचीपुरम ते गुजरातमधील भडोच या त्याच्या प्रवासाच्या ...

चिरेबॉन किनार्‍याजवळचा खजिना रविवार, ०९ जानेवारी २०११, १५:३३ (+०५:३०)

chandrashekhara अक्षरधूळ

चिरेबॉन(Cirebon) हे इंडोनेशिया मधल्या जावा बेटावर असलेले एक मध्यम आकाराचे शहर आहे. सुमारे 3 लाख लोकसंख्या असलेल्या या शहराचे महत्व इतकेच आहे की पूर्वी येथे एका सुलतानाचे राज्य होते. इ.स.1705 मधे हा सुलतान डच वसाहतवाद्यांच्या हाताखालचा मांडलिक बनला व त्याचे स्वतंत्र अस्तित्व संपले. इंडोनेशियाला स्वातंत्र मिळाल्यावर हे शहर इंडोनेशियाचा एक भाग बनले. या शहराचे स्थान मात्र अगदी ...