देवनागरी
Roman
Press F12 to toggle

ताप

ताप शुक्रवार, २० ऑगस्ट २०१०, १२:१६ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

काल मी बर्याच दिवसांनी आजारी पडलो. त्याचे काय झाले, मी परवा आमच्या कंपनीत एक नवीन कॅन्टीनमध्ये दुपारी जेवण केले. जेवणातील भाजीने पोट खराब केले. मग काय, व्हायचे ते झाले. पोटात काहीच राहत नव्हते. आणि त्यामुळे अशक्तपणा आला. त्यामुळे आजोबांच्या पेक्षा जास्त वाईट अवस्था. हात पाय गळून गेलेले. रात्री खूप थंडी वाजायला लागली. सकाळी लवकर उठून देखील अंग दुखत असल्यामुळे पळायला गेलो नाही. पण ...

ताप बुधवार, १० मार्च २०१०, १३:२२ (+०५:३०)

JaguarNac मुक्ताफळे

पावसानं खरंच वैताग आणलाय. काल थोडासा काय भिजलो आणि रात्री लगेच हुडहुडी भरून अंग दुखून कसकस जाणवायला लागली. मग काय, गपचूप झोपलो क्रोसीन घेऊन. घरापासून इतकं दूर असताना बरं नाहीसं वाटण्याचा हा माझा पहिलाच अनुभव. आई आणि आजीची फार आठवण आली. आज दिवसभर घरीच होतो, त्यात दुपारी एक मस्त भयाण स्वप्न पडलं… मज्जा आहे.

आज दिवसभर तरी बरं वाटलं. दुपारी थोडं काम केलं, थोडी विश्रांती घेतली आणि ...

पुन्हा हि चूक घडणार नाही मंगळवार, १५ सप्टेंबर २००९, ००:०४ (+०५:३०)

hemant athalye हेमंत आठल्ये

मागील दोन दिवसांपासून मी सर्दी आणि तापाने आजारी पडलो होतो. पण चिंतेचे आता काही कारण नाही. आज सकाळी ताप असल्याने मी कंपनीत काही गेलो नाही. परवा मी जेव्हा पुणे विद्यापीठातून येत होतो त्याचवेळी शंका आली होती. कारण मला कधी नव्हे एवढा थकवा जाणवला होता. बॉसला सुट्टी मागताना खर तर खूप लाज वाटत होती. पण तरी देखील मी फोन करून सुट्टी मागितली. आणि त्याने मोठ्या मनाने दिली देखील. ...

डुक्कर ताप बुधवार, १२ ऑगस्ट २००९, १४:०० (+०५:३०)

sonalw मनाचिये गूंति

आई डुक्कर: अरे किती वाजले बघ. उठ. …अरे डुकरा उठ.
बाल डुक्कर: (आळोखे पिळोखे देत) अग मला डुक्कर काय म्हणतेस? माणसं एकमेकांना डुक्कर कुत्र वगैरे म्हणतात. तू मला माणुस म्हणत जा.
आई डुक्कर: कळला तुझा शहाणपणा. चल उठ. शाळेला उशीर होईल.
बाल डुक्कर: आज सुट्टी आहे पण.
आई डुक्कर: कसली आता सुट्टी?
बाल डुक्कर: आता दहा दिवस सुट्टी आहे. डुक्कर तापाची साथ चालु आहे.
आई डुक्कर: त्यात ...

काहीतरी विचित्रच! सोमवार, १५ जून २००९, १३:३५ (+०५:३०)

आल्हाद alias Alhad आल्हादक प्रतिबिंब!

सालं गेले काही दिवस फार विचित्रच चाल्लेत. म्हणजे धड ना आजारी अन्‌ धड ना धडधाकट; काहीतरी मधलंच. नाहीतर या अशा दिवसात भर दुपारी कोणीतरी बिना पंख्याचं बसेल का? शिवाय आवाज तरी असा काही खर्जात गेलाय की बोलता सोय नाही! साधारणतः नाना पाटेकर, ओम पुरी, नसीरुद्दीन शाह, अमिताभ बच्चन वगैरे आजारी पडली तर अश्याच काहीश्या आवाजात बोलत असावीत. पण त्यांच्या नरड्यात मज्जाय हो, माझं काय? ...