भारताच्या उत्तर सीमेवरील लडाख हा भाग झान्स्कर, लडाख व काराकोरम या तीन पर्वतराजी व यांच्या मध्ये असलेल्या नद्यांची खोरी यांचा मिळून बनलेला आहे. विमानाने लेह विमानतळावर उतरताना या भौगोलिक परिस्थितीची चांगली कल्पना येते. परंतु प्रत्यक्ष लडाखमधे, स्वाभाविकपणे सगळी गावे, नदी खोर्यांच्यात वसलेली असल्याने, आजूबाजूला बघितले तर फक्त त्या खोर्याला लागून असलेले ...