देवनागरी
Roman
Press F12 to toggle

इच्छा

पुन: हरी ब्लॉग शनिवार, ०८ ऑक्टोबर २०११, १४:३९ (+०५:३०)

हेमंत आठल्ये

कशी सुरवात करू तेच समजत नाही आहे. अनेक दिवसांनी, पुन्हा: एकदा ब्लॉग सुरु करतो आहे. खर तर काय बोलावं, आणि कशी वाक्यरचना करावी यातच घोळ होतो आहे. खूप दिवसांनी बोलतोय म्हणून कदाचित अस घडत असेल. पण, मनात आनंद मात्र नक्की होतोय. मध्यंतरी मी, एक-दोन ब्लॉग सुरु करून पाहण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यात मन नाही रमलं. आजकाल ...

इच्छा मंगळवार, ०१ मार्च २०११, १४:०५ (+०५:३०)

आल्हाद alias Alhad आल्हादक प्रतिबिंब!

थकून तुझ्या पायरीवर बसताना फरशीवरून पाय निसटला आणि डोक्याला खोक पडली. भळाभळा रक्त वाहू लागलं; त्यात तुझ्यासाठी सांडलेल्या घामाचा आणि तुझ्या शेवंतीसम कांतीचा सुवास होता. डोळ्यातून अश्रू आले. तुझ्या गालाच्या खळीत जाऊन साचले. लहानपणी शुभम्‌ करोती म्हणताना समईवर काजळी साठायची तसे. या रक्ती ...

फेडअप गुरुवार, २८ ऑक्टोबर २०१०, ००:५१ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

खुपंच खजील झाल्याप्रमाणे वाटत आहे. काल देवाने इतकी चांगली संधी दिली. आणि मी ‘नेहमीप्रमाणे’ गाढवपणा केला. तिने काल स्वतःहून मला पिंग केलेलं. याआधी एकवीस सप्टेंबरला, म्हणजे मागील महिन्यात माझ्याशी मोकळेपणाने बोलली होती. त्यानंतर काल. आणि त्यावेळेसही माझ्यातील चुका समोर आलेल्या. आणि कालही. कालचा दिवस कसा गेला म्हणून सांगू. माझ्या फ्लोरवर जातांना कॅन्टीनमध्ये ती दिसली. तो लाल ...

काममय एवायं पुरुष इति।स यथाकामो भवति ... मंगळवार, २६ ऑक्टोबर २०१०, १६:०६ (+०५:३०)

आश्लेषा संस्कृतानुभव

काममय एवायं पुरुष इति।
स यथाकामो भवति तत्क्रतुर्भवति।
यत्क्रतुर्भवति तत्कर्म कुरुते।
यत्कर्म कुरुते तदभिसंपद्यते॥

- तुमच्या मनात खोलवर रुजलेली जी इच्छा असते ...

स्वप्नाहून सुंदर गुरुवार, २१ ऑक्टोबर २०१०, ००:०८ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

आजचा दिवस काय बोलू? आज तिचे हसणे. आणि तीचा चेहरा आठवतो आहे फक्त. आज तिने मला स्वतःहून पिंग करून गुड मॉर्निंग केले. किती दिवसांपासून ही इच्छा होती. आणि आज दुपारी एक चॉकलेट सुद्धा दिले. आणि तिचे ते हसणे. तीचा तो गोड आवाज. अजून कानात तोच घुमतो आहे. आज ती काय दिसत होती म्हणून सांगू! बस्स!! आता तीच हवी फक्त. कालचा दिवसाबद्दल न बोललेलं बर. कारण, मी ‘हरलो’ असंच वाटायला लागलेलं. मला सर्वजण ...

काय करू काय नाही बुधवार, १३ ऑक्टोबर २०१०, ०१:१२ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

काय करू आणि काय नाही हेच कळत नाही आहे. एकीकडे ती इतकी आवडते ना! की तीच हवी हवीशी वाटते. पण तिला हे सांगायला भीती वाटते. मी रोज रोज हाच विचार करतो की, तिच्याशी काय बोलायचे. आणि मन कसं मोकळ करायचे तिच्यासमोर. पण मग ती दिसली की, श्वास नीट घेता येत नाही. घसा कोरडा पडून जातो. ‘प्रपोज’ करणे फार मोठी गोष्ट नाही. म्हणजे ही माझी पहिलीच वेळ आहे, पण मी तिला प्रपोज करू शकतो. फक्त तीच्या नकाराची भीती ...

डियर मंगळवार, १२ ऑक्टोबर २०१०, १४:४९ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

नाचावस वाटत आहे. काहीच सुचत नाही आहे. कालचा तो दिवस ‘वाळवंट’. आणि आज काय बोलू ‘धबधबा’. आज तिने माल गुड मोर्निंगचा मेल केला. आणि मी पिंग करून गुड मोर्निंग केल्यावर ‘हाय डियर, गुड मोर्निंग’ केल. बस अजून विश्वासच बसत नाही आहे. म्हणजे ती मित्र म्हणून म्हटली असेल कदाचित. पण काही का असेना. आज ती इतकी छान दिसते आहे म्हणू सांगू. बस तिलाच पहाव अस वाटत आहे. काल कसला गेला. रात्र देखील बेकार. ...

झोप सोमवार, ११ ऑक्टोबर २०१०, १६:४२ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

आज कामाच्या दिवशी साडेनऊला उठण्याचा भीम पराक्रम केला. त्यामुळे कंपनीची लेट मोर्निंगची बस देखील चुकली. आता रात्री तीन वाजता झोपल्यावर लवकर कशी जाग येणार? मला खरंच काहीच सुचेनासे झाले आहे. गेल्या महिन्यापासून मला तीन वाजेच्या आत झोपच येत नाही. त्यामुळे सकाळी उठल्यावर खूप आळस येतो. आणि आता माझा चेहरा काळवंडून गेला आहे. ओठ देखील तसेच. दिवसा मी झोपत नाही. तरी सुद्धा रात्री तीन ...

इच्छा सोमवार, ११ ऑक्टोबर २०१०, ०१:१२ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

इच्छा ही गोष्ट अशी आहे की जी कधीच संपत नाही. एक संपली की दुसरी, चालूच. लहानपण मला कधीच आवडले नाही. कारण कोणतीच इच्छा माझी लहानपणी पूर्ण झाली नाही. खेळणी माझ्या लहान भावाला. मी मागितली की, मी त्याच्यापेक्षा मोठा म्हणून मला माझे आई वडील रागवायचे. तसे लहानपणी, सर्वच मला या ना त्या कारणाने रागवायचे. असो, मुंबईला आलो त्यावेळी ‘नेक्स्ट’मध्ये एक संगणक पहिला. आणि मला तो खूप आवडला. तो विकत ...

हेडफोन गुरुवार, २९ जुलै २०१०, ०१:०९ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

कानातले घातल्याशिवाय आजकाल कोणी कुठेही जात नाही. म्हणजे ‘हेडफोन’ अस म्हणायचे होते. रोज सकाळी बसमध्ये जवळपास सर्वच ‘बुजगावणे’ ते कानातील घालून असतात. आज माझ्या शेजारी बसलेली सुद्धा! आणि बाईकवरील हिरो आणि होंडाना पर्याय नाही म्हणून की फॅशन म्हणून त्यांनाच माहित. माझे मित्र आहेत ना काही, बाईकवर रस्त्याच्याकडेला गप्पा मारतांना सुद्धा ते कानातील काढणार नाहीत.

आता हे ‘मोबाईल ...