माझ्या लहानपणी पुण्यातले बरेच रस्ते डांबरीकरण न झालेलेच होते. या रस्त्याने जेंव्हा केंव्हा एखादे मोटर गाडी सारखे वाहन जात असे तेंव्हा ते भरपूर धुरळा अडवत जात असे. असे असले तरी मोटर गाडीने उडवलेला धुरळा काहीच नाही, असे म्हणण्याची कधी कधी वेळ येत असे. सायकलवरून जात असताना अचानक रस्त्यावर पुढे प्रचंड धुरळा उडलेला दिसू लागे. झ्याक, झ्याक असा पुकाराही ऐकू .येऊ लागे. अशा वेळी ...
एखाद्या दिवशी सकाळी वृत्तपत्र उघडून ताज्या बातम्यांवर नजर फिरवली की मन उदासच होऊन जाते. खरे म्हणजे या सगळ्या बातम्यांशी आपला तसा जवळचा संबंध नसतो. पण तरीही मनाला काहीतरी खुटखुटत राहते. आज सकाळी तसेच झाले. आज सलग तिसर्या दिवशी पुणे -मुंबई जलद मार्गावर प्रवासी वाहतुक करणार्या आणखी दोन बसेसचा चेंदामेंदा झाल्याचे फोटो बघितले व मन अक्षरश: सुन्न झाले. अशा वेळी या आधुनिक ...
काही वर्षांपूर्वी मी व माझी पत्नी तमिळनाडू मध्ये पर्यटनासाठी गेलो होतो. आमच्या प्रवासात आम्हाला कांजीवरम हे गाव लागणार असल्याने तेथील प्रसिद्ध साड्या खरेदी करायच्या असा आमचा (म्हणजे माझ्या पत्नीचा), बेत साहजिकच होता. तेथे पोचल्यावर आम्ही एका दुकानात गेलो. साड्या बघितल्या. पण तिथल्या साड्यांच्या किंमती बघून आम्ही थक्क झालो. प्रवासात असताना जास्त रोख रक्कम घेऊन ...
पराठे, छोले, बटुरे या सारख्या पदार्थांना यशस्वी स्पर्धा जर कोणी केली असली तर ती दक्षिण भारतीय खाद्य पदार्थांनी! उत्तरेला कश्मिर पासून ते पार आसाम पर्यंत सगळीकडे इडली डोश्यांसारखे दक्षिण भारतीय खाद्य पदार्थ एकदम पॉप्युलर आहेत. परदेशात सुद्धा भारतीय पदार्थ मिळणार्या कोणत्याही उपहारगृहात हे पदार्थ मिळतातच. माझ्या लहानपणी हे पदार्थ बाहेर उपहारगृहात मिळत पण ते ...
20 डिसेंबर 2011 च्या संध्याकाळी एका निराळ्या पण थोड्याशा रम्य अशा अनुभवाला सामोरे जावे लागले. गतकालामध्ये प्रवास करून यावा असेही थोडे वाटले खरे! माझ्या घराजवळच भारत सरकार चालवत असलेली ‘फिल्म ऍन्ड टेलेव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ ही संस्था आहे. या संस्थेशी तसा माझा जवळचा संबंध एके काळी होता. मी या संस्थेच्या ध्वनी अभियांत्रिकी विभागात हंगामी प्राध्यापक म्हणून 2 ...
रोज सकाळी फिरायला जाताना, प्रथम काही अंतर, मला रस्त्याच्या कडेला असलेल्या एका पदपथावरून चालावे लागते. हा पदपथ म्हणजे एक संशोधनाचा विषय होऊ शकेल इतका रोचक आहे. या पदपथाचा रस्त्याच्या बाजूला असलेला जो हिस्सा आहे तो बहुतेक ठिकाणी मोकळा आहे परंतु या मोकळ्या भागाला सायकल मार्ग असे नाव दिलेले असल्याने एखादी सायकल जर कोणा धाडसी युवकाने येथून चालवण्याचे ठरवले तर तुम्ही त्या ...
खाद्यपेये, धान्ये, भाजीपाला, या सारख्या उपभोग्य, ग्राहकोपयोगी व जीवनोपयोगी वस्तूंची किरकोळ विक्री केवळ छोट्या व्यापार्यांच्या आणि भारतीय कंपन्यांच्याच हातात असावी की त्यात परदेशी बड्या कंपन्यांना शिरकाव करू द्यावा या गेली 5 वर्षे गाजत असलेल्या व त्यावर अनेक उलट सुलट विचार मांडले गेलेल्या मुद्यावर अखेरीस भारताच्या मंत्रीमंडळाने निर्णय घेतला आहे. काही अटीसह या क्षेत्रात ...
आज सकाळी पुण्यातल्या एका प्रमुख रस्त्यावर काही कामानिमित्त गेलो होतो. काम संपवून परत येत असताना एका बाजूला खाकी वर्दीतले पोलिस नेहमी पेक्षा जरा जास्त संख्येने उपस्थित आहेत असे वाटल्याने कुतुहल साहजिकच चाळवले गेले व मी माझा मोर्चा तेथे वळवला. तिथे रस्त्यावर दोन चार ट्रक्स, एक जेसीबी (फ्रन्ट एन्ड लोडर) मशीन व काही इतर कामगार मंडळी व पोलिस हे पुढच्या आदेशांची वाट पहात उभे होते. ...
परवा रात्री टीव्हीवर बातम्या बघत होतो. या बातम्यांत एक व्हिडिओ क्लिप वारंवार दाखवली जात होती. ती बघताना प्रथम माझा डोळ्यावर विश्वासच बसेना. सुप्रीम कोर्टात प्रॅक्टिस करणारे व अण्णा हजारे यांचे एक सहकारी मानले जाणारे श्री. प्रशांत भूषण यांना व्हिडिओ कॅमेरासमोर तीन गुंड मारहाण करताना त्या क्लिपमधे दिसत होते. बातमी ऐकल्यावर लक्षात आले की त्या वेळेस एका टीव्ही चॅनेलसाठी श्री. ...