देवनागरी
Roman
Press F12 to toggle

things I love..

एक भन्नाट दुपार ! मंगळवार, ०८ जून २०१०, ०३:३२ (+०५:३०)

Bhagyashree माझे विचार...

शनीवार उजाडला.. उजाडला कसलं उलटलाच म्हटले पाहीजे, तेव्हा आम्ही जागे झालो व आता कुठेतरी गेलेच पाहीजे भटकायला असे विचार सुरू झाले.. आधी विचार केला मस्त आवरून मालिबूला जाऊ, बीचवर वेळ घालवू व तेथील नेपच्युन’स नेट मध्ये जेवून भटकत भटकत परत येऊ.
जसा प्लॅन तयार होईल तोच प्लॅन एक्झीक्युट करणे म्हणजे आमच्या दृष्टीने पाप असल्यासारखे वागतो आम्ही दोघं! बाहेर ...

ल्हानपण देगा देवा ! गुरुवार, २५ मार्च २०१०, ०३:१८ (+०५:३०)

Bhagyashree माझे विचार...

आज मी खरंतर क्म्प्लीट वेगळ्या विषयावर लिहायला बसले होते. पॅशन्स, आवड्निवडी , माझी नाटकं, ऍक्टींग, डान्स, बॅडमिंटन, थ्रोबॉल.. हे सगळं आठवता शाळा आठवली.. मग अर्थातच माझे लहानपण असा आवडता विचार सुरू झाला..  मनातल्या मनात विचार करायचा कंटाळा आला, एकट्यानेच किती बडबडायचे ना? त्यामुळे म्हटलं (खोटा/व्हर्चुअल का असेना) कागद बराय. निदान मोनोलॉगच्या ऐवजी डायलॉग्स ...

आह.. साझ ! शुक्रवार, १९ मार्च २०१०, १०:३१ (+०५:३०)

Bhagyashree माझे विचार...

Wow !! मला काय लिहावं सुद्धा सुचत नाहीये ! भयंकर आनंद झालाय!
गेली कित्येक वर्षं मी शोधत असलेल्या सई परांजपेच्या ’साझ’ पिक्चरची गाणी निदान युट्युबवर का होईना सापडली!
आत्ता तेच वाजतंय – क्या तुमने है कहे दिया.. क्या मैने है सुन लिया.. तुम ही कहो, अब मै कहू.. क्या!

किती वर्षं मागे गेले मी एका गाण्यात! हा पिक्चर – १९९७ चा. त्याचसुमारास तो टीव्हीवर लागला होता. आय ...

गुढी.. गुरुवार, १८ मार्च २०१०, ०४:५० (+०५:३०)

Bhagyashree माझे विचार...

सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा!!

ही आमची गुढी! प्रचंड उत्सुकता होती, कारण या ...

तो पाऊस.. हा पाऊस.. गुरुवार, २१ जानेवारी २०१०, ०४:३० (+०५:३०)

Bhagyashree माझे विचार...

फार सुंदर, अप्रतिम, संततधार, मुसळधार, धोधो वगैरे पाऊस पडतोय.
रवीवारपासून शुक्रवार पर्यंत.
रस्त्यावर तळी साचली आहेत..
जस्ट पुण्यातून परतल्यामुळे मला होमसिक वाटू नये म्हणूनच की काय असा पाऊस पडतोय.

मी .. खिडकीपाशी बसून .. ते सर्व पाहतीय.. गेले ३ दिवस.. आणि पाहीन पुढील ३ दिवस..

पाऊस.. !

का मला वेड लागतं पाऊस पाहून काही कळत नाही!
माझ्या जीटॉकवर असणार्‍यांनी ...

अमेरिका पूर्वरंग –वॉशिंग्टन मॉन्युमेंट शनिवार, २४ ऑक्टोबर २००९, ०५:३७ (+०५:३०)

Bhagyashree माझे विचार...

[खूप दिवसांनी वळले परत प्रवासवर्णनांकडे . ]

अमेरिकेच्या पहिल्या President – अमेरिकेच्या राष्ट्रपित्याची आठवण म्हणून बांधलेले हे वॉशिंग्टन मॉन्युमेंट. तसे ते कुठूनही दिसतच होते आम्हाला. मात्र त्याच्या जवळ गेल्यावर, त्याच्या पायथ्याशी उभे राहील्यावर त्याची भव्यता कळली. पॅरिसचा आयफेल टॉवर होण्याआधी हेच मॉन्युमेन्ट जगातील सर्वात उंच स्ट्रक्चर असे बिरूद मिरवत होते. ...

लॉंग ड्राईव्ह.. ! शनिवार, ०१ ऑगस्ट २००९, ०४:५३ (+०५:३०)

Bhagyashree माझे विचार...

काल स्टारबक्सला भेट द्यावी म्हणून बाहेर पडलो.. कॉफी घेतली, बरोबर कॉफी बेरी केकही घेतला.. आणि बाहेर खुर्च्यांवर गार वार्‍यात गप्पा मारत बसलो.. कॅलिफॉर्नियामधला उन्हाळा फारच सुंदर! जरा दुपारी दोन एक तास वाईट उकडतं खरं.. पण एरवी सुसह्यच! रात्री तर सुखद!! असंच इकडचं तिकडचं, दिवसभरातल्या गमतीजमती, ऑफीसमधली कामं तिथल्या गंमती, पुढचे व्हेकेशन प्लॅनिंग असं सर्वांगीण गप्पा ...

लॉंग ड्राईव्ह.. ! शनिवार, ०१ ऑगस्ट २००९, ०४:३० (+०५:३०)

admin माझे विचार...

काल स्टारबक्सला भेट द्यावी म्हणून बाहेर पडलो.. कॉफी घेतली, बरोबर कॉफी बेरी केकही घेतला.. आणि बाहेर खुर्च्यांवर गार वार्‍यात गप्पा मारत बसलो.. कॅलिफॉर्नियामधला उन्हाळा फारच सुंदर! जरा दुपारी दोन एक तास वाईट उकडतं खरं.. पण एरवी सुसह्यच! रात्री तर सुखद!!
असंच इकडचं तिकडचं, दिवसभरातल्या गमतीजमती, ऑफीसमधली कामं तिथल्या गंमती, पुढचे व्हेकेशन प्लॅनिंग असं सर्वांगीण गप्पा ...

माझी भटकंती - कशुमा लेक ( Cachuma Lak... मंगळवार, २३ जून २००९, १४:३० (+०५:३०)

Bhagyashree माझे विचार...

’माझी भटकंती’ या विषयावर लिहायचे अशी जोर्रात दवंडी पिटवूनही बरेच दिवस काही लिहीणे झाले नाही.. कारण: प्रसिद्ध व तीच ती ठिकाणे टाळणे.. अमेरिकेवर इतक्या लोकांनी , इतकं लिहीलंय की पुढे कोणीच काही नाही लिहीले तरी चालेल खरं.. त्यामुळे पर्याय कमी जरी नसले तरी दुर्मिळ/कमी-प्रसिद्ध पर्याय शोधावे लागतात..

बर्‍याच दिवसांपासून खास मीना प्रभू स्टाईल फिरण्यासाठी ( म्हणजे लिखाणासाठी ...

माझी भटकंती – कशुमा लेक ( Cachuma Lake ) मंगळवार, २३ जून २००९, १२:५६ (+०५:३०)

admin माझे विचार...

’माझी भटकंती’ या विषयावर लिहायचे अशी जोर्रात दवंडी पिटवूनही बरेच दिवस काही लिहीणे झाले नाही.. कारण: प्रसिद्ध व तीच ती ठिकाणे टाळणे.. अमेरिकेवर इतक्या लोकांनी , इतकं लिहीलंय की पुढे कोणीच काही नाही लिहीले तरी चालेल खरं.. त्यामुळे पर्याय कमी जरी नसले तरी दुर्मिळ/कमी-प्रसिद्ध पर्याय शोधावे लागतात..

बर्‍याच दिवसांपासून खास मीना प्रभू स्टाईल फिरण्यासाठी ( म्हणजे लिखाणासाठी ...