देवनागरी
Roman
Press F12 to toggle

मुक्तक विचार जीवन

काबीज... गुरुवार, ०९ फेब्रुवारी २०१२, ०२:४२ (+०५:३०)

भानस Sardesaies

अहोरात्र ओसंडून वाहत असलेली लोकल तिच्या नसानसातही सकाळ-संध्याकाळ रक्तासोबत समांतर वाहत असे. किती कप्प्यात विभागलो गेलोय आपण. पोळं वाढत चाललंय. आडवंतिडवं फुगत चाललंय. पोळ्यातली काही मधानं ...

स्वत:साठीही जग गं ..... बुधवार, २७ एप्रिल २०११, २०:१८ (+०५:३०)

भानस Sardesaies

तू नेहमीच मनस्वी वागायचीस. स्वत:वर आसुसून प्रेम करायचीस. अगदी लहान होतीस तेव्हांही आणि आता ’ सरलं किती - उरलं किती ’ चा हिशोब स्वत:च वारंवार मांडू लागलीस, तरीही. तुझा अट्टाहासी, झोकून देण्याचा स्वभाव ...

प्रेममयी... मंगळवार, १५ फेब्रुवारी २०११, ००:५० (+०५:३०)

भानस Sardesaies

मैत्रीण आलेली. गेल्या वेळच्या मुक्कामात ही पठ्ठी स्वत:च भटकंती ला गेल्याने गाठभेट होऊ शकली नव्हती. त्यामुळे आम्ही दोघींनी दंगा मांडलेला. तोच, एकेकाळी रोज गाठभेट होणार्‍या एका ओळखीच्यांचा फोन आला. " कधी आलीस? कशी आहेस? मुक्काम किती? यावेळी जमलं तर भेटूयात आपण. पुढच्या वेळी येशील तेव्हां न जाने हम अल्ला को प्यारे... " असे म्हणत नेहमीचे त्यांचे गडगडाटी हसणे. भरभर प्रश्न विचारणे आणि ...

ठण्ण.... ठण्ण.... बुधवार, १२ जानेवारी २०११, ०३:१३ (+०५:३०)

भानस Sardesaies

आजही झोपायला साडेबारा झालेच. गेले कित्येक दिवस, महिने ठरवतेय की बाराचे ठोके, पाठीला अंथरुणाच्या स्वाधीन करून ऐकायचे. पण, ती हवीहवीशी दिवसाची सांगता होतच नाही. साडेपाचचा गजरही एकही दिवस वाजायचा विसरत नाही. निदान रविवारचा तरी अपवाद. दुधाला विरजण लावता लावता रेवा दिवसाचा ताळमेळ जुळवत होती. तेवढ्यात नवऱ्याचा नित्याचा कुचकट शेरा कानावर आदळला.

" ये की आता इकडे. रात्रभर ...

चिवट.... शुक्रवार, २६ नोव्हेंबर २०१०, ००:५२ (+०५:३०)

भानस Sardesaies

चाळींचे स्वतःचे खास रसायन असते. आताशा ' असायचे ' असेच म्हणावे लागेल. इतक्या अशक्य वेगाने उभ्या राहणाऱ्या गगनचुंबी सदनिका पाहून माझी मातीला नमन - णारी, चुंबणारी पावले दचकू लागतात. तिने डोळे वटारून माझ्याकडे पाहून म्हटले तर, " बेमुर्वत... तेरी इतनी मजाल की मेरे सोने देह पे तेरे इतने मलिन पैर.... तौबा... तौबा!! कोई बचाए मुझे इन मन, प्यार, स्नेह के पुजारीओंसे. अभी तक माझी चाळ, माझी माणसे, ...

तो.... गुरुवार, १६ सप्टेंबर २०१०, ०५:४२ (+०५:३०)

भानस Sardesaies

काठाशी निष्प्राण पडलेले दगड उचलून उचलून तो तळ्यात फेकत होता
एका मागून एक.... यंत्रवत,
हात - दगड - पाणी - डुबुक..... तडफड,
पाण्याचे ते तडफडणे निरखत होता...... पुन्हा पुन्हा.....

आजकाल बरेचदा तो इथे येतो, वेळी.... अवेळी,
तडफडणार्‍या पाण्यात प्रत्येकवेळी त्याला तोच दिसतो,
एकाकी.... घुसमटलेला

ऊन रणरणते तापलेय रे, जरासा सावलीत थांब की
रस्त्यावर अजूनही जीव बचावून उभे ते झाड, त्याला ...

वाटणी... शनिवार, ०४ सप्टेंबर २०१०, ०२:२९ (+०५:३०)

भानस Sardesaies

" अगं, एकटीने खाऊ नकोस. वाटून खावे नेहमी. किती वेळा सांगायची तीच गोष्ट? राणू, असा अप्पलपोटेपणा कधी करायचा नसतो बरं. आपल्याला कितीही थोडंसं जरी मिळालं नं तरीही त्यातला काही भाग दुसर्‍याला द्यावा. त्यामुळे काय होतं माहीत आहे तुला? असं बघ, एक लाडू मी तुला दिला तर तुला त्या क्षणापासून तो पोटात गडप होईतो किती छान वाटतं. पण एकदा का तो खाऊन संपला की पुढच्या पाच मिनिटात त्याचं मनातलं ...

' पहिला खो ' गुरुवार, ०२ सप्टेंबर २०१०, ०९:४३ (+०५:३०)

भानस Sardesaies

विभीने, ' पहिला खो ' देऊन जवळपास महिना किंवा जास्तच दिवस लोटले. अनेक गाणी, कविता, गझला अगदी मनाच्या जवळ असूनही अनुवाद करायला गेल्यावर जीव घाबरा होऊ लागला. इतक्या सुंदर शब्दांची, त्यांच्यातल्या भावार्थाची तोडफोड तर होत नसेल....... बऱ्याच गाण्यांचे अर्धवट अनुवाद झाले पण मनात कायमचे घर करून गेलेली एक कविता सारखी समोर येऊ लागली. सरतेशेवटी हार मानून मी तिच आज टाकतेय. कवितेतला आशय तितकाच ...

शब्दांच्या पलीकडले, काही मूक संवाद...... शुक्रवार, २० ऑगस्ट २०१०, ०७:२९ (+०५:३०)

भानस Sardesaies

आज शाळेतल्या जीवलग मैत्रिणीचा फोन आला. जवळजवळ वीस वर्षांनी आम्ही एकमेकींचा आवाज ऐकत होतो. ती म्हणाली, " ओळख बरं, कोण बोलतंय ते? " क्षणात माझ्या तोंडून गेले, " साधना..." आम्ही खूप वेळ व अनेक आठवणी काढून भरभरून बोलत राहिलो. दोघींनाही किती अन काय काय बोलू असे झालेले. मन भरून आलेले. इतकी वर्षे कोंडलेले आभाळ अचानक बरसत होते.

फोन ठेवला अन जाणवले हा सारा संवाद होत असतानाच त्याला समांतर, ...

खीर... शनिवार, ३१ जुलै २०१०, ०१:३८ (+०५:३०)

भानस Sardesaies

तिचे हात एक एक टाका सफाईदारपणे घालत होते. झरझर. एकसारखा. टपोरा. लवकरात लवकर तिला ही दुलई पुरी करून द्यायची होती. शक्य झाले तर आजच. त्या बदल्यात मिळणार्‍या शंभर रुपयात तिच्या जागोजागी फाटलेल्या संसारात निदान मीठ-मिरची-तेलाचे ठिगळ लागले असते. दोन्ही पोरींच्या तोंडात चार दिवस दोन घास पडले असते.

दिवसभर मान मोडून पाठीचा काटा पुरा ढिल्ला करून एकदाची दुलई पुरी झाली. जोरदार झटकून ...