देवनागरी
Roman
Press F12 to toggle

अनुभव-प्रकटन-गंमत

भोचकपणा नुसता..... शुक्रवार, १४ मे २०१०, ०२:४८ (+०५:३०)

भानस Sardesaies

कधी कधी आपण सहजच खूश असतो. म्हणजे खास काही कारण नसतेच. आतून अगदी छान, उमलून आल्यासारखे वाटत असते. अगदी साध्या साध्या गोष्टीही अशावेळी आपला आनंद वाढवत राहतात. नेहमीसारखाच गजर टाहो फोडून आक्रंदतो.... एरवी त्याचा गळा दाबणारी मी आज आधीच जागी झालेली असते. मिटल्या डोळ्यांनी अंथरुणाची न सोडवणारी उब अनुभवत पडून असते. आज झोपही पूर्ण झाल्यासारखी ..... तृप्त. गजर हलकेच बंद करते. खिडकीतून ...

साबुदाण्याची खिचडी रविवार, २५ एप्रिल २०१०, ०५:५४ (+०५:३०)

भानस Sardesaies

लग्नाच्या आधी स्वयंपाक करता येत असला तरी तो निव्वळ चौकोनी प्रकारातला. वरण-भात, भाजी व पोळी. म्हणजे कसे की वरण भात कुकरला आपसूक होतोय. एक वाटी तांदूळ घेतले की तीन वाट्या पाणी..... की आटोपला भाताचा कारभार . डाळीला पाणी घालताना... आईने सांगितलेले पक्के घोकलेले.... " अगं किती सोप्पयं.... डाळ धुतलीस नं की साधारण डाळीच्यावर अर्धे-पाऊण पेर पाणी तरंगेल इतपत ठेवायचे. आठवणीने हिंग, हळद व दोन थेंब ...

सहज घडलेला संवाद अन रेंगाळणारे प्रश्न .... मंगळवार, २३ फेब्रुवारी २०१०, ००:०६ (+०५:३०)

भानस Sardesaies

मायदेशी जाताना एकदा ऍमस्टरडॅमवर साडेचार तासांचा हॉल्ट होता. पहाटे साडेपाचला विमान पोहोचले तेव्हा विमानतळावर जरासा शुकशुकाटच होता. आमच्या फ्लाईटमधलेच बावीस-पंचवीस प्रवासी, ज्यांना पुढे मुंबईला जायचे होते त्यांचीच काय ती गर्दी आमच्या व आसपासच्या चार गेट्स मिळून होती. हळूहळू विमानतळ जागा होऊ लागला तोवर थोड्या ओळखी करून घेऊन तीनचार ग्रुप्स तयार झाले. गप्पांना रंग चढू ...

लोकलच्या गमतीजमती - व्यक्ती तितक्या प्र... गुरुवार, २८ जानेवारी २०१०, ०३:४३ (+०५:३०)

भानस Sardesaies

लोकलच्या इतक्या वर्षांच्या प्रवासात अनेक बरेवाईट अनुभव-घटना सामावलेल्या. प्रवास करायचा म्हणजे तिकीट-पासही आलाच, मागोमाग टिसीही आलेच. आता इतकी मोठी यंत्रणा चालवायची म्हणजे नियम बनवायला हवेतच शिवाय जर कोणी ते तोडत असतील तर त्यांना दंडही करायलाच हवा ना. पण रोजच कोणी आपला पास तपासू लागले की संताप येणारच. त्यातून नेमका एखादे दिवशी पास संपलेला असावा आणि एरवी दाखवते तरी नको ...

निक्कीजी त्वाडा जवाब नही....... बुधवार, २३ डिसेंबर २००९, ०२:३२ (+०५:३०)

भानस Sardesaies

लेक ताहो

समर मध्ये सॅन फ्रॅन्सिस्कोला मित्र-मैत्रिणीकडे गेलो असता ' लेक ताहोला ' जाण्याचा योग आला. अतिशय सुंदर रमणीय ठिकाण. डोळ्यांचे पारणे फेडणारा निसर्ग. अथांग पसरलेले निळेशार पाणी. समर असल्याने पाणी कोमट होते. मग मस्त डुंबलो.....लोळलो, खेळलो. ' लेक ताहोला ' पोचलो तेव्हां दिवस कलला होता. पटकन हॉटेल वर पोचून सामान टाकून लेकवर पळायचे ...

मराठी माणसाला धंदा करता येतो का? शनिवार, १२ डिसेंबर २००९, ०४:१७ (+०५:३०)

भानस Sardesaies

खरेच मराठी माणसाला धंदा करता येतो का? मी दादरची असल्याने आजूबाजूला मराठी वातावरण खूपच होते. अगदी गिरगाव इतके नसले तरी होतेच. त्यातून त्यावेळी गिरण्याही सुरू होत्या. तशा आजही तुरळक आहेत. पण ७५-७६ सालात दबदबा होता. दादर पूर्व आणि पश्चिम, नायगाव मग पुढे हिंदमाता, भारतमाता...... करत करत पार भायखळ्या पर्यंत आपले लोक होतेच. त्यामुळे बरीचशी मराठी माणसांची दुकानेही होतीच. सगळी चालत अशातला ...

रंगांची मनमुक्त उधळण...... रविवार, ०६ डिसेंबर २००९, ०९:४४ (+०५:३०)

भानस Sardesaies

गेली तिनचार वर्षे रंग फारसे आलेच नाहीत. गेल्या वर्षी सुरवात चांगली झाली होती. आता पंधरा दिवसात अप्रतिम नजारा दिसेल असे वाटत असतानाच पुन्हा एकदा तापमान उष्ण झाले. चढू लागलेले रंग थबकले. हिरव्या रंगाचा साज पुन्हा पानांवर दिसू लागला अन एक दिवस रात्री अचानक पारा घसरला. एकदम कडाक्याची थंडी पडली. भरीत भर दोन दिवस जोराचा पाऊस मध्येच हलकीशी गारपीट व सोसाट्याचा वारा यांमुळे झाडे ...

ढुंढो ढुंढो रे साजना, तशात दुपटीची भर... मंगळवार, १७ नोव्हेंबर २००९, ०१:३४ (+०५:३०)

भानस Sardesaies

अरुंधती आज नेहमीपेक्षा जरा लवकरच उठली. सेक्शनचे हळदीकुंकू होते. नेहमीचा तो पंजाबी नको बाई, आज जरा साडी नेसीन. मनासारखे आवरून निघायचे तर घरातली कामे आवरून स्वतःसाठी अर्धा तास तरी हवाच ना. आयत्यावेळी काहीतरी उदभवते म्हणून अजून थोडा वेळ असू दे हाताशी म्हणून अजूनच लवकर उठून आवरायला सुरवात केली. डबेडुबे झाले. बाईही वेळेवर आली. लेकीची रिक्षाही आज पाच मिनिटे लवकरच आली. नवऱ्याला आज ...

वा ग वा! तुझा की माझा....... शुक्रवार, ०६ नोव्हेंबर २००९, ००:५४ (+०५:३०)

भानस Sardesaies

सकाळी सकाळीच नम्रताचा फोन आला..... तिने जी पंजाबमेल सोडली ती शेवटी तिच्या स्वरयंत्राने तिच्या संतापाची-त्राग्याची साथ सोडल्यावर नुसताच फुसफुसाट होऊ लागला तशी जरा कुठे ती थांबली. " अग, हो हो... जरा हळू गं. किती संतापशील? आणि हा असा त्रागा करून तुझ्या जीवाला होणाऱ्या त्रासात फक्त भर पडतेय. तेव्हा दम खा आणि शांतपणे सांग मला. " हे माझे वाक्य ऐकले अन पुन्हा ही उसळली, " म्हणे शांतपणे.... तुझे काय ...

नको म्हटले होते ना, तरीही...........सफळ... शनिवार, २४ ऑक्टोबर २००९, ०४:५० (+०५:३०)

भानस Sardesaies

कालच्या धावपळीने सगळेजण अतिशय दमले होते तरीही सकाळी सातसव्वासातला उठले. आता फक्त दीड दिवस उरला होता. उद्या रात्री घरी जायला निघायचे होते. हैदराबादमध्ये अनेक ठिकाणे पाहायला हवीच या यादीत मोडणारी असल्याने वेळाचे नियोजन करणे जरूरीचे होते. चारमिनार, सालारजंग म्युझियम, नेहरू झूऑलॉजिकल पार्क व ’ लाद ’ नावाने प्रसिध्द -बांगड्या व मोत्यांचाबाजार हे पाहायचेव वेळ उरलाच तर मग अजून ...