देवनागरी
Roman
Press F12 to toggle

स्वर-संगीत-आनंद

चिडचिडलेला दिवस अन घुसमटलेली, विकल रात्... बुधवार, १४ जुलै २०१०, १२:५९ (+०५:३०)

भानस Sardesaies

कालपासून नुसते चाकावर गरगरतो आहोत. सकाळपासून एका मागोमाग एक लागलेल्या कामांचा फडशा पाडत शेवटी कसेबसे आम्ही संध्याकाळी पाचाला घर सोडले. शिकागो गाठेतो दहा वाजून गेले. सडक बांधकामाने तर अगदी पागल बनवून सोडलेय. पाच मिनिटाचा रस्ताही सरळ नेटका दिसत नाही. पाहावे तिथे केशरी पिंपे मन मानेल तशी घुसखोरी करत उभारलेली असतात. काही वेळा अगदी निगुतीने चादरीला टीप घालावी तशी एका रेषेत ...

जिया धडक धडक..... मंगळवार, ०८ जून २०१०, ०१:२० (+०५:३०)

भानस Sardesaies

शौमित्रने गायलेले अजून एक गाणे ऐकवत आहे. चित्रपटातील मूळ गाण्याचा प्रसंग तोच मात्र आवाज शोमूचा आहे.

राहिले ओठांतल्या ओठांत..... शुक्रवार, ०७ मे २०१०, ११:१९ (+०५:३०)

भानस Sardesaies

काही गाणी अगदी मनात रुतून बसतात. आपलीच होऊन जातात. कधीही आणि कितीही वेळा ऐकली तरी तितकीच भावतात. त्यातले शब्द, संगीत, स्वर सारेच वेड लावणारे. हे गाणेही असेच..... बोल आहेत श्री. वा. रा. कांत यांचे तर संगीत दिलेय श्री. श्रीनिवास खळे यांनी आणि गायलेय माझ्या आवडत्या डॉ. वसंतराव देशपांडे यांनी.
राहिले ओठांतल्या ओठांत वेडे शब्द माझेभेट होती आपली का ती खरी, कीं स्वप्न माझें ...

काळाच्या ओघात लुप्त झालेली काही रत्ने -... बुधवार, २८ एप्रिल २०१०, ०५:१९ (+०५:३०)

भानस Sardesaies

गेले काही दिवस १९७५ ते १९९० या कालावधीतील, त्यातही ७५ ते ८२-८३ पर्यंत अगदी सारखी ऐकलेली काही गाणी मनात घोळत आहेत. १९७५ च्या आधीही ही कानावर पडत होतीच. आमच्या आईचा गळा अतिशय सुरेल. तिच्या ऐन उमेदीच्या दिवसात नाशकामध्ये ती - पूर्वाश्रमीची सिंधू भट आणि माझी कै.सौ.मंदामावशी प्रती " लता व आशा " म्हणून प्रसिद्ध होत्या. आईने अनेक नाटकातही कामे केलेली.( १९५२ ते १९६२ ) पुढे लग्न होऊन ती मुंबईस ...

मौला मेरे मौला मेरे.... सोमवार, १९ एप्रिल २०१०, ०८:५० (+०५:३०)

भानस Sardesaies

शौमित्रने गायलेले अजून एक गाणे ऐकवत आहे. चित्रपटातील मूळ गाण्याचा प्रसंग तोच मात्र आवाज शोमूचा....

पापणीला तुझा रंग येतो...... बुधवार, ३० सप्टेंबर २००९, २१:०८ (+०५:३०)

भानस Sardesaies

हे गाणे पहिल्यांदा ऐकले तेव्हांच या बोलांनी-संगीताने व अप्रतिम सुरांनी जबरदस्त मोहिनी घातली. बरेचदा आपल्या मन:स्थितीनुसार ह्या आवडीनिवडी बदलतात. परंतु या बोलांमधली आर्तता, विरह, प्रिय व्यक्तीची चाहूल जरी नुसती लागली तरी कंपणारे हृदय. धृवपदच इतके बोलके आहे, जिथे मनीचे गूज व्यक्त करताना शब्द पुरे पडत नाहीत तिथे एक स्पर्श ते सगळे भाव शब्दांच्या पुढे जाऊन देऊन जातो. समोर ...

तू ही मेरी शब हैं...... बुधवार, २३ सप्टेंबर २००९, ०८:३० (+०५:३०)

भानस Sardesaies

तू ही मेरी शब हैं......
माझा लेक - शौमित्रने गायलेले गाणे सादर करीत आहे. ऑगस्टमध्ये एका आठवड्याच्या सुटीवर आलेला असताना आम्ही दोघेही त्याने गावे यासाठी त्याच्या मागे लागत होतो. पण तो काही दाद देईना, शेवटी कॉलेजला परतायच्या आदल्या दिवशी बाबाने ...

रंजीश ही सही....... शुक्रवार, ११ सप्टेंबर २००९, २१:४४ (+०५:३०)

भानस Sardesaies

आज सकाळपासून मनात हीच गझल घुमते आहे. काही काही गाणी, गझला, बोल, शब्द, प्रसंग, स्थळ अनेकदा तर लकबी, देहबोली, पाऊस, पिवळट मातकट चमत्कारिक संधिप्रकाश, दुरावलेले तरीही आपल्या मनात खोलवर रुतून बसलेले जीवलग............ यातले काहीतरी मनात पावलांचा आवाजही न येऊ देता सारखे समोर येऊन उभे ठाकते आहे. काहीसे दूर मात्र हृदयाशी कवटाळलेले आठवणींची आवर्तनांवर आवर्तने उठवते आहे. अन मग रंजीश ही ...

तू हैं सबका शिखर... गुरुवार, ०९ एप्रिल २००९, २१:४३ (+०५:३०)

भानस Sardesaies

आजकाल हाताच्या बोटावर मोजता येईल इतकीच चांगली गाणी वर्षभरात ऐकू येतात. गाणी गाजणे आणि ती मनात रुतून बसणे ह्याचा ताळमेळ जमणारच नाही. जुन्या गाण्यांची मोहिनी, जागा अबाधित आहे आणि राहीलच. तरीही क्वचित अपघाताने काही सुंदर रचना जन्माला येते, हे गाणे असेच आहे.

नीले नीले आसमाँ मे तू हैं
नाजूक सी कलियों मे तू हैं
धरती की हलचल मे तू हैं
जीवन के हर पल मे तू हैं

हे ईश्वर तू जाने ...

लिखे जो खत तुझे .... बुधवार, ०१ एप्रिल २००९, ०१:१० (+०५:३०)

भानस Sardesaies

आज सकाळी सकाळी शशीकपूर-आशा पारेख- "कन्यादान " मधील हे मधुर गाणे एकले,

लिखे जो खत तुझे, वो तेरी याद मे
हजारो रंग के, नजारे बन गयें
सवेरा जब हुआं, तो फूल बन गयें
जो रात आयी तो, सितारे बन गयें

अप्रतिम कल्पना. शब्द साधे सहज तरीही भाव हृदयाला हात घालणारे. मन प्रफुल्लित होऊन गेले. नीरज यांचे सुंदर शब्द व रफीचा मनात उतरत जाणारा स्वर.शंकर-जयकिशनचे संगीत. यांचा मिलाप ...