भारताच्या ईशान्येला असलेली तिबेट बरोबरची सीमा ही एक नैसर्गिक भौगोलिक सीमा असल्याने ती ओलांडणे हे फक्त या सीमेवर असलेल्या पर्वत शिखरांच्या रांगांच्या मधे मधे असलेल्या काही खिंडीतून किंवा ही सीमा ओलांडून वाहणार्या तीन किंवा चार नद्यांच्या खोर्यांमधून व नदी पात्राला लागून असलेल्या पायवाटांनीच फक्त शक्य आहे. या अशा नैसर्गिक संरक्षणामुळे व 1959 साला पर्यंत या सीमेबद्दल ...