फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला स्वातंत्र्य आणि समता असे दोन मंत्र दिले. आणि आधुनिक इतिहासात बहुतांश देशातले अर्थकारण-राजकारण हे याच दोन मुद्द्यांभोवती फिरत राहिले. इंग्लंड-जर्मनी-रशिया सारख्या पूर्वापार स्वतंत्र बलाढ्य देशांपासून भारतासारख्या पारतंत्र्यात असलेल्या देशांपर्यंत सगळ्यांचे राजकारण प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पद्धतीने याच ...
गांधीजी म्हणतात, विवेकानंद वाङ्मयाच्या वाचनाने माझ्या देशभक्तीत एक हजार पटीने वाढ झाली. नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणतात, आज स्वामी विवेकानंद असते, तर मी त्यांची गुरुस्थानी स्थापना केली असती. जवाहरलाल नेहरू म्हणतात की, विवेकानंद हे अध्यात्म आणि विज्ञान यांचा समन्वय करणारे महापुरुष होते. स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांच्यापासून ते जमशेटजी टाटा ...
माझ्या हिंदुस्थाना ! तुला धोका आहे तो इथेच. पाश्चात्यांच्या अंधानुकारणाचा तुला एवढा मोठा शाप आहे की, एखादी गोष्ट चांगली की वाईट हे बुद्धीच्या, विवेकाच्या किंवा शास्त्राच्या सहाय्याने तू ठरवतच नाहीस. गोरी माणसे जे रीतीरिवाज पाळतात, ज्या कल्पना मनाशी बाळगतात, त्याच चांगल्या; त्यांना जे आवडत नाही ते ते सारे वाईट ! अरेरे, बुद्धीभ्रष्टतेचा, मूर्खपणाचा याहून ...
(’साप्ताहिक विवेक’च्या २०११च्या दीपावली विशेषांकात प्रसिद्ध झालेल्या लेखाचा हा उत्तरार्ध. पहिल्या भागात स्वयंसेवी संस्थांच्याबदलत्या स्वरूपाचा आढावा आपण घेतला. आता या दुस-या भागात विचार करू ’बिगर सरकारी संस्था’आणि संस्था –कार्यकर्ते यांच्यातल्या नात्याचा.)
बिगर सरकारीसंस्थाज्या सामाजिक संस्थासरकारी मदतीवर ...
’विचारांचे घाऊक व किरकोळ व्यापारी. येथे फक्त स्वच्छ आणि सुंदरच विचार मिळतील.’
“हे काय आहे ? नाही, मी पाटी वाचली आहे… पण अर्थ कळला नाही.”
“जे लिहिलं आहे नमकं तेच. आम्ही विचार आणि त्याच्या accessories विकतो. तुम्हाला हवा आहे एखादा? ”
“No, thanks. पण कुतुहल म्हणून… काय भावाने विकता हो हे, ’विचार’ ? ”
“ते अनेक गोष्टींवर अवलंबून आहे. सर्व प्रथम म्हणजे तुमची बौद्धिक दिवाळखोरी किती... ...
मागे एकदा एक अप्रतिम ई मेल वाचला होता:
पुढील पैकी कोणता मनुष्य तुम्हाला नेता म्हणून आवडेल?१) हा माणूस रोज दारू, प्रचंड सिगारेट. रात्र रात्र जागरणं तर रोजचीच.
२) हा माणूस दारू पितो शिवाय अनेक बायकांशी याची लफडी असल्याची सातत्याने चर्चा. शिवाय सत्ता जाऊ नये यासाठी धडपड.
३) हा माणूस कधीच दारू पीत नाही. सिगारेटला तर शिवतही नाही. एकच प्रेयसी, जिच्याशी लग्न. ...
(’साप्ताहिक विवेक’च्या २०११च्या दीपावली विशेषांकात प्रसिद्ध झालेला लेख.)
संस्था, सामाजिक काम,कार्यकर्ते, विकास ....हे सगळे शब्द माझ्या आयुष्यात खूप उशीरा आले .. पण एकदा आलेते राहिले सोबत.
अनेक वर्ष वेगवेगळ्यासामाजिक संस्थांशी, सामाजिक कामांशी वेगवेगळ्या भूमिकांतून जोडले गेले आणि याविषयावर विचार ...
“अनिवार्य”
आज सकाळी झोपेतून जागी होत असतानाकुठून कोण जाणे पण हा शब्द मानगुटीवर येऊन बसला.
मी पूर्वी कधीतरी लिहिल आहे कीमला असंख्य स्वप्न पडतात – इतकी जास्त की खर काय आणि स्वप्न कोणत याबाबत अनेकदा माझागोंधळ होत राहतो. त्यामुळे हा ’अनिवार्य’ शब्दबहुतेक स्वप्नातला असावा अशी मी स्वत:ची समजूत घातली आणि रोजच्या कामाला लागले. पण तास दोन ...
आपले राष्ट्रगीत हे खरंच राष्ट्रपुरुष-अधिनायक असे डोळ्यासमोर ठेऊन लिहिले आहे की अन्य कोणाला अधिनायक असे संबोधून लिहिले आहे हा प्रवाद आहे. ‘भो पंचम जॉर्ज’ अशा मानसिकतेतून हे ‘जन-गण-मन’ लिहिले गेले असे मी बरेचदा पिकल्या पानांकडून ऐकले आहे. तुम्हीही ऐकले असेल. पण मी लेखनसीमेस्तव आणि विषयांतराच्या भीतीने त्यात जाणार नाही. सर ही पदवी इंग्रजांना परत करणाऱ्या ...