देवनागरी
Roman
Press F12 to toggle

महिला

भुलाबाईची गाणी : ग्रामीण संस्कृतीचे वास... बुधवार, २७ जुलै २०११, १७:३६ (+०५:३०)

Gangadhar Mute शेती आणि कविता - गंगाधर मुटे

भुलाबाईची गाणी : ग्रामीण संस्कृतीचे वास्तवदर्शन

भुलाबाईची गाणी ही तत्कालीन सामाजिक संस्कृतीचे दर्शन घडवितात. काही गाणी सामाजिक आणि आर्थिक शोषणाला नकळतपणे प्रतिबिंबित करून जातात. या गीतांचे गेयता आणि आशय हेच बलस्थान असल्याने त्यात रचनाशैली, खोटा समाजाभिमुख बेगडीपणा, आलंकारिक शब्दरचना वगैरे कृत्रिमरित्या अनावश्यकपणे घुसडण्याची त्या महिला गीतरचनाकारांना ...

भोंडला, हादगा आणि भुलाबाईची गाणी : महिल... बुधवार, १३ जुलै २०११, १०:२९ (+०५:३०)

Gangadhar Mute शेती आणि कविता - गंगाधर मुटे

भोंडला, हादगा आणि भुलाबाईची गाणी : महिलांच्या व्यथा

              बालपणीच्या अशा फारच कमी आठवणी असतात की ज्या माणसाच्या आयुष्यभर सावलीसारख्या सोबत-सोबत चालतात. जीवनाने कितीही रंग बदललेत, आचार-विचारांच्या संरचनेत कितीही बदल झालेत तरीही त्या आठवणी मात्र वास्तवाचे कायम स्मरण करून देत असतात. एका अर्थाने ह्या आठवणी माणसाला “डोळस दृष्टी” प्राप्त करून देत असतात आणि सामाजिक ...

रावेरी –सीतामंदीर सोमवार, ०४ जुलै २०११, ०७:५९ (+०५:३०)

Gangadhar Mute शेती आणि कविता - गंगाधर मुटे

रावेरी – सीतामंदीर

रावेरी, त.राळेगाव जि. यवतमाळ येथे भुमीकन्या सीतामाईचे मंदीर असून हे सीतामाईचे देशातले एकमेव मंदीर आहे.
प्रभूरामचंद्राने सीतामाईचा त्याग केल्यानंतर याच दंडकारण्यात सीतामाईचे वास्तव्य होते.

लवकुशाचा जन्म होऊन अश्वमेघ यज्ञाचा घोडा अडवेपर्यंत याच रावेरी गावात सीतेचे वास्तव्य होते.

अयोध्यास्थित राममंदीरासाठी संपूर्ण ...

महिला दिन मंगळवार, ०८ मार्च २०११, १५:१२ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

आज खरोखरच महिला दिन आहे, याची प्रचीती येत आहे. सकाळी रस्त्यात एक आजी आडव्या आलेल्या. इतका भला मोठा डिव्हायडर कसा ओलांडला हाच मी अजून विचार करतो आहे. किती होर्न वाजवला. मिनिटभर मी माझ्या बाईकचा होर्न वाजवत होतो. आजींना ऐकू नसेल येत. पण दिसत तर होते ना. पार जवळ गेल्यावर अगदी फुटभर अंतर उरल्यावर आजींनी माझ्याकडे पाहण्याचे कष्ट घेतले. पाहून त्यांना धक्का बसण्या ऐवजी मलाच बसला. माझीच ...

गाय,वाघ आणि स्त्री शनिवार, २९ जानेवारी २०११, १०:१९ (+०५:३०)

Gangadhar Mute शेती आणि कविता - गंगाधर मुटे

गाय,वाघ आणि स्त्री

बाईत आणि गायीत मला नेहमीच एक साम्य आढळत आले आहे.

दोघीही शारिरीक अंगाने अबलाच.स्वबळावर स्वसंरक्षणास असमर्थ.

निसर्गाने सर्व सजीवांना नैसर्गीक मृत्यू येईपर्यंत स्वबळावर स्वसंरक्षण करून प्राण वाचविण्यासाठी काही जन्मजात काही ‘हत्यारे आणि ढाली’ दिल्या आहेत.

उदा :- उंदराला बिळात घुसता येते,मांजरीला बिळात घुसता येत नाही त्यामुळे ...

जात्यावरची गाणी शनिवार, ३० ऑक्टोबर २०१०, २१:३४ (+०५:३०)

Gangadhar Mute शेती आणि कविता - गंगाधर मुटे

जात्यावरची गाणी

झपाट्याने काळ पालटला आणि जातं, पाटा व वरूटा काळाच्या पडद्या आड गेला. डिझेल-विद्युतवर चालणारी चक्की,पीठ गिरणी आली आणि जात्यावर दळणाची गरजच संपून गेली.
तसा तो काळ फ़ार जुना नाही. अगदी १९८० पर्यंत ग्रामीण भागात दळणासाठी ’जाते’ हेच प्रमुख साधन होते. महिलांच्या कष्टात भर घालणारे पण त्यानिमित्ताने दळतांना ओव्या गाऊन आपल्या मनातल्या भावनांना मोकळी वाट ...

महिला विधेयक आणि झाशीची राणी सोमवार, २५ ऑक्टोबर २०१०, २२:५७ (+०५:३०)

vijayshendge रे घना

हा ही लेख तसा जुनाच. पण माझ्या नव्या वाचकांसाठी नव्यानं टाकतोय. संपलो वगैरे काही म्हणू नका. वेळेची खूपच अडचण होते आहे. एवढच.

**************************************************************************************

मागे संसदेत महिला विधेयक पास झालं आणि आमच्या गल्लीतल्या बायकांनी हत्ती घेवून साखर वाटली. हो ! हत्ती घेवूनच. हत्तीवरून नव्हे. कारण हत्तीवरून साखर वाटण्यासाठी हत्ती आणायला हवा होता. त्यासाठी पैसे हवे होते आणि ते ...

झिलपी बाई झिलपी रविवार, २४ ऑक्टोबर २०१०, १०:३१ (+०५:३०)

Gangadhar Mute शेती आणि कविता - गंगाधर मुटे

झिलपी बाई झिलपी

झिलपी बाई झिलपी
झिलपी बसली नाहाले
शंकर गेले पाहाले
असे शंकर भ्याले
फ़ूलं वेचत गेले
फ़ुलात पडली अंबाई
नाव ठेवले भिमाई
भिमाईच्या टोपल्या
ठाई ठाई गुंफ़ल्या
एक ठाई हारपली
मामा घरी सापडली
असे मामा चोर
खिडकी आंबा गोड
खिडकी आंबा कोणाचा

भुलाबाईचे सासरे कसे? मंगळवार, १९ ऑक्टोबर २०१०, २०:५८ (+०५:३०)

Gangadhar Mute शेती आणि कविता - गंगाधर मुटे

भुलाबाईचे सासरे कसे?

भुलाबाई भुलाबाई सासरे कसे गं सासरे कसे?
कचेरीत बसले हे वकील जसे गं वकील जसे

भुलाबाई भुलाबाई सासू कशा गं सासू कशा?
कपाळभर कुंकू पाटलीन जशा गं पाटलीन जशा

भुलाबाई भुलाबाई भासरे कसे गं भासरे कसे?
हातामध्ये घडी मास्तर जसे गं मास्तर जसे

भुलाबाई भुलाबाई जाऊ कशी गं जाऊ कशी?
हातामध्ये लाटणं स्वंयपाकीन जशी गं स्वंयपाकीन जशी

भुलाबाई ...

हंग्रेज अध्यक्षांची मुलाखत रविवार, ०५ सप्टेंबर २०१०, ०९:५० (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

सुरवातीला अभिनंदन करतो, आपण सलग चौथ्यांदा अध्यक्ष झालात त्याबद्दल. आणि आभार मानतो आपण मुलाखतीला वेळ दिल्याबद्दल. तर सुरवात करूयात?
अध्यक्ष- इश्श..
मी- काय झालं?
अध्यक्ष- काय झालं काय, भारतीय महिला अस खूप आनंदी झाल्यावर असंच करतात ना?
मी- हो, पण..
अध्यक्ष- पण काय? मला तर आजी नेहमी भारतीय महिलांचे वागण्याच्या पद्धती सांगत असतात.
मी- अच्छा.
अध्यक्ष- माझी साडी कशी आहे?
मी- ...