‘अर्थ क्विक’ आल्याप्रमाणे चौहान ऑफिसातून धावत उपमुख्यमंत्र्यांच्या ऑफिसकडे निघाले. ऑफिसचा दरवाजा उघडणार, तेवढ्यात बाजूला असलेला शिपाई ओरडला ‘साहेब मिटींगमध्ये हायेत. अपोईमेंत घ्या’. चौहान शिपायाकडे बघून बोलला ‘तुमने मला ओळखा नाही क्या?’. शिपाई कान साफ करीत बोलला ‘तू असेल तुझ्या घराचा मुख्यमंत्री. मग मी काय करायचं? तुला काय मॅनर्स हाय का नाय. आपल उद्धटपणे घुसू राहिलास. ...