एखादी वस्तू, पदार्थ, स्वर-आवाज, रंग, रूप थोडक्यात सांगायचे तर ( जे मला कधीच जमत नाही. थोडक्यात सांगणे हो.... ) चिवचीव आवाज ऐकला चिमणी. बटाटेवड्याचा विचार मनात यायचा अवकाश......., काय होते हे सांगायला हवे का? सिनेमाला जायचे म्हटले की ' ए वनचे समोसे ' पाऊस म्हटला की उगीच शोभेची का होईना पण छत्री अन मनात हुळहुळणाऱ्या-तरल तर कधी फजिती झालेल्या आठवणी - चिंब भिजून खाल्लेला भुट्टा - जागोजागी ...