दिवसभराच्या उपासाने आता थोडेसे दमला असाल, काहींना उपास लागलाही असेल. फळे, दूध, ज्यूस इत्यादींनी पोटाला आधार मिळतो पण जिभेचे चोचले पुरवले जातच नाहीत. उपासाच्या दिवशी अगदी पहाटेपासून अर्धवट झोप व जागेपणाच्या सीमारेषेवर घुटमळणारे माझे मन इतकी अनाप शनाप स्वप्ने पाहते..... .. कसली ते कळले ना....... . एरवी ज्या पदार्थांकडे मी आवडीने सोडाच पण नाईलाजाने तरी खावा असेही पाहणार नाही तेही ...