देवनागरी
Roman
Press F12 to toggle

प्रवासात...

मुंबईचा पाउस शनिवार, २७ जून २००९, ११:०० (+०५:३०)

Mahendra Kulkarni काय वाट्टेल ते...

काल  मुंबईला पहिला पाउस पडला. तसा नाही म्हणायला थोडे फार शिंतोडे उडवुन जातोय दोन दिवसांपासुन, पण “पाउस पडला” असं जे म्हणतो तसा आजच पडला. पाउस  पण काय लिहायचा विषय आहे कां? छे.. आधिच इतक्या कविता, लेख  लिहिल्या गेले आहेत ( अगदी पुर्वी पासुन) की  आता त्यावर नविन काही लिहायला उरलंच नाही.

गरिबाची झोपडी, किंवा, घरात पाणि शिरणं..हे सगळं नेहेमीप्रमाणेच सुरु आहे. आज सकाळी मालाड ...

द्वारका - ओखा पोर्ट शनिवार, १८ एप्रिल २००९, ०५:४९ (+०५:३०)

Mahendra Kulkarni काय वाट्टेल ते...

आता मी द्वारकेहुन निघालो आहे . टॅक्सी मधे बसुन हे पोस्ट लिहितोय. ओख्याचं काम संपवुन आता जामनगर ला निघालॊ आहे. ओखा म्हणजे एक दोन ते अडिच किलोमिटरचा अरबी समुद्रात घुसलेला एक पट्टा. तिन्ही  बाजुनी समुद्र .हवा पाणि एकदम मस्त!

ह्याचं महत्व केवळ हा भाग  गुजरातच्या एक्स्ट्रिम साईडला  पाकिस्तान जवळ आहे म्हणुन! म्हणतात इथुन पाकिस्तानला जायला३-४ तास खुप झालेत. खरं तर या ...

फोर्ट ग्वालियर बुधवार, १५ एप्रिल २००९, ०६:०५ (+०५:३०)

Mahendra Kulkarni काय वाट्टेल ते...

ब्लॉग लिहितांनाच एक पक्कं केलेलं होतं की काहिही झालं तरिही प्रवासवर्णन लिहायचं नाही. मला स्वतःला   प्रवासवर्णन वाचण्यात फारशी मजा येत नाही. कारण काय? तर प्रवास वर्णनात लोकं अगदी आज सकाळी कितिवाजता निघालो,काय खाल्लं, कुठे जेवलो, किती जेवलो, आणि किती वाजता परत आलो, असे निरर्थक डिटेल्स देतात, की जे वाचायला कंटाळवाणे होतात.

हे प्रवास वर्णन नाही, फक्त मला आवडलेल्या  ...

इट कॅन हॅपन इव्हन इन इंडिया… रविवार, २९ मार्च २००९, ०३:०० (+०५:३०)

Mahendra Kulkarni काय वाट्टेल ते...

काल दुपारी गोदावरी एक्स्प्रेस ने नाशिक ला गेलो होतो. गाडी अगदी लेकुरवाळी. जास्तित जास्त कोच हे अन रिझर्ड. चेअर कार मधे रिझर्वेशन होतं . गाडीमधे प्रवेश केला. आपल्या सिटवर स्थानापन्न झालो. तेवढ्यात खाली पायाशी काहि तरी वळ वळ करतांना जाणवलं, म्हणुन खाली पाहिलं तर एक पिटुकला उंदिरमामा माझ्या कडे टूकु टूकु पहात होता. जोरात पाय आपटला, तर तो पळुन गेला. अगदी सेल फोन च्या ब्लू ...

जेट एअर वेज फुल सर्व्हिस एअर लाइन्स... रविवार, ०८ मार्च २००९, ०९:४५ (+०५:३०)

Mahendra Kulkarni काय वाट्टेल ते...

एखादा दिवस इतका वाईट निघतो की त्या दिवशी जेवणाचे नुसते हाल होतात. खिशामधे कितिही पैसे असले तरिही जेवायला वेळ मिळत नाही किंवा जे काही मिळतं ते ’~नॉट टु युवर टेस्ट’ असतं.
गुरुवारी सकाळी सकाळी औरंगाबादला जेट एअरवेज ने गेलो होतो. जेट म्हणजे हल्ली नुसती नावालाच फुल सर्व्हीस एअर लाइन्स राहिली आहे. सकाळि ७-१५ ची फ्लाइट होती.धावत पळ एअर पोर्ट ला पोहोचलो तर ४ पैकी३ किऑस बंद ...

मुंबई लोकल ऍक्सिडॆंट व्हिडीओ. मंगळवार, २४ फेब्रुवारी २००९, १५:०९ (+०५:३०)

Mahendra Kulkarni काय वाट्टेल ते...

रोज लोकलने तुम्ही प्रवास करता. न टाळता येण्यासारखी गर्दी. वेळेत ऑफिस ला पोहोचायचे , लेट मार्क चे टेन्शन, किंवा, कॉलेज ला वेळेत पोहोचायचे. ह्या सगळ्या परिस्थीती मधे इच्छा असो वा नसॊ, तुम्ही- आम्ही अशा परिस्थितीमधे प्रवास करण्यासाठी उद्युक्त होतो. तेंव्हा एकच टेन्शन असतं, वेळेत ऑफिस, कॉलेज ला पोहोचायचं. बरेचदा, दुपारच्या वेळेस पहाण्यात आलंय, की सगळा कोच रिकामा असतांना ...

पुन्हा मुंबई लोकल गुरुवार, १९ फेब्रुवारी २००९, ०७:२८ (+०५:३०)

Mahendra Kulkarni काय वाट्टेल ते...

आज परत लोकल ट्रेन चा पास काढला. रोज कारने ऑफिस ला जाउन वजन वाढलंय. तसा, रोज सकाळी योगा करतो २० ते २५ मिनिटे. पण घरुन ७-३० ला निघालो की ऑफिस ला पोहोचतो ८-१५ ला. लिफ्ट ने ४थ्या मजल्यावर गेलो, की सायंकाळी ५-४५ पर्यंत खाली येणे होत नाही.

आत्ताच , एक एल आय सी ची लॅप्स झालेली पॉलिसी रिइन्स्टेट करण्या करिता एल आय सी ने मेडिकल टेस्ट घेतली . त्या मधे सगळं काही चेक केलं.. अगदी ब्लड ...

कुच बिहार… गुरुवार, १२ फेब्रुवारी २००९, २१:५५ (+०५:३०)

Mahendra Kulkarni काय वाट्टेल ते...

साधारण २० एक वर्षापुर्वीची गोष्ट आहे. तेंव्हा माझं पोस्टींग कलकत्त्या ला होतं . कलकत्ता ऑफिस  मधे सर्व्हीस इंजिनिअर म्हणुन साधारणतः ७-८ महिने काढले. दार्जिलिंग डुवाट्स टी गार्डन चा एरिया ,असाम,  बिहार मधे टुर ला जावं लागयचं.

८ महिन्यांच्या पोस्टींग पैकी जास्तित जास्त वेळ मी सिलिगुडी लाच राहुन तो सगळा एरिया कव्हर करत होतो. अगदी धुला बाडी  हा नेपाळ बॉर्डर आणि ईंडॊ ...